Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

"Health Tips" : दररोज सकाळी १० - १५ मिनिट चालण्याचे फायदे

"Health Tips" : दररोज सकाळी १० - १५ मिनिट चालण्याचे फायदे: आरोग्यवर्धक :- आज जाणून घेऊयात दररोज सकाळी १० - १५ मिनिट चालण्याचे फायदे. चालणे हा सहज सोपा सर्वांना सहज होईल असा व्यायाम आहे. कोणत्याही साहित्या शिवाय करता येणारा असा हा व्यायाम आहे. दररोज सकाळी १० -१५ मिनिट चालण्याने शरीर तंदुरुस्त आणि चपळ होण्यास मदत मिळते. सकाळी चालण्याने शुध्द वातावरणातील ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळया उन्हातून मिळते. सतत काम करून आलेला थकवा नाहिसा होऊन जातो. दररोज सकाळी चालण्याने चिडचिडे पणा आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. नियमित चालण्याने वजन संतुलित राहण्यास मदत मिळते. दररोज चालण्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत मिळते. नियमित चालण्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते. नियमित चालण्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. नियमित चालायची सवय असणाऱ्याना हृदयाविकार होत नाही. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते. दररोज चालण्याने फुफुस

न्यूज अपडेट : यंदा गरबा,दांडिया नाही; नवरात्रीसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर :

न्यूज अपडेट : यंदा गरबा,दांडिया नाही; नवरात्रीसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर : नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- गणेशोत्सवानंतर १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यावर्षी नवरात्रामध्ये गरबा किंवा दांडियाचं आयोजन करता येणार नाही. सार्वजनिक आणि घरगुती नवरात्र उत्सव, दुर्गापूजा साजरी करताना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. पाहुया काय आहेत मार्गदर्शक सूचना..? ● नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. देवीच्या घरगुती मूर्तीची उंची २ फूट तर सार्वजनिक मंडळामधल्या देवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा कमी असावी. ● देवीच्या आगमनाची वा विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. ● पारंपरिक मूर्तीऐवजी घरातील धातू वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शाडूच्या मातीची मूर्ती असल्यास तिचं विसर्जन घरच्या घरी करावं. ● विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावं. ● सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. ● महापालिका वा स्

न्यूज अपडेट : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश :

न्यूज अपडेट : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : नवी मुंबई (बातमी/पुणे-हिंजवडी) :- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करत चार इसमांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास पवार (वय २०, रा. हॉटेल ग्रॅन्ड मन्नत, येळवंडे वस्ती, हिंजवडी, पुणे. मूळ रा. सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांना माहिती मिळाली की, हिंजवडी फेज एक येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे.पोलिसांनी सुरुवातीला तिथे बनावट ग्राहक बनवून एकाला हॉटेलवर पाठवले आणि माहितीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या चार तरुणींची सुटका केली. या तरुणींना रेस्क्यु फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्

न्यूज अपडेट : मोदी सरकारच्या ‘त्या’ विधेयकांना संघ परिवारातून विरोध; दिला आंदोलनाचा इशारा..।।।

न्यूज अपडेट : मोदी सरकारच्या ‘त्या’ विधेयकांना संघ परिवारातून विरोध; दिला आंदोलनाचा इशारा..।।। नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- काँग्रेससह सर्वच विरोधकांनी कृषी विधेयकांवरून देशभरात आंदोलनाचा बडगा उचलला आहे. तर अनेक शेतकरी संघटना आक्रमक होत असतानाच काही शेतकरी नेत्यांसह भाजपने या विधेयकाच समर्थन केलं असून कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल यामुळे घडतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. कृषी विधेयकांपाठोपाठ दिनांक २३ सप्टेंबर रोजी मोदी सरकारने कामगार विधेयकं मंजूर केली. या विधेयकांसह कृषी विधेयकाला काँग्रेससह इतर काही पक्षांनी विरोध केला असतानाच कालच मंजूर झालेल्या कामगार विधेयकांना थेट संघ परिवारातून विरोध असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून एकाच विचारधारेचे दोन घटक समोर आल्याने हा पेच कसा सुटणार? याकडे लक्ष लागले आहे. भारतीय मजदूर संघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अविभाज्य घटकांपैकी एक आहे. या कामगार विधेयकांमुळे देशातील औद्योगिक शांतता भंग होईल असा घरचा आहेर देतानाच आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. विधेयकं नव्याने आणताना स्थायी समितीच्या शिफारशी सरकारने दुर्लक्षित के

न्यूज अपडेट : कोव्हिशील्ड लसीच्या चाचणीची सुरुवात; तीन स्वयंसेवकांना यशस्वीरित्या देण्यात आला: 

न्यूज अपडेट : कोव्हिशील्ड लसीच्या चाचणीची सुरुवात; तीन स्वयंसेवकांना यशस्वीरित्या देण्यात आला:  ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोव्हिड-१९ बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीची शनिवारी दुपारी किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात सुरूवात झाली. नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोव्हिड-१९  बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीची शनिवारी दुपारी किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात सुरूवात झाली. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी २० ते ४५ वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांचा भाग म्हणून इंट्रामस्क्युलर डोस दिला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन निरोगी स्वयंसेवकांपैकी दोन उद्योजक आहेत, तर त्यातील एक सरकारी संस्थेतील संशोधक आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या प्रशासनाने गोपनीयतेचे कारण सांगून स्वयंसेवकांची ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे.  केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणाले की तिन्ही स्वयंसेवक सुदृढ आहेत आणि त्यांच्यात कोणत्याही कोमॉरबिडीज किंवा कोणताही वैद्यकीय इतिहास नाही. ते कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले आहेत का हे तपासण्या

न्यूज अपडेट :- कामगार कायद्यांमधील बदल हा कामगारांसाठी नाही तर त्यांच्या कंपन्यांसाठी!!!

न्यूज अपडेट :- कामगार कायद्यांमधील बदल हा कामगारांसाठी नाही तर त्यांच्या कंपन्यांसाठी!!! नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वेतन संहिता २०१९ (WC) आणि व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा आणि कार्यस्थिती संहिता २०१९ (OHSC) अशा दोन विधेयकांसाठीचे ठराव लोकसभेमध्ये मांडले. WC मध्ये किमान वेतन, वेतन देणे, बोनस आणि समान मोबदला या चार कायदे एकत्र व दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. OHSC मध्ये हेच फॅक्टरी कायदा, कंत्राटी कामगार कायदा, आंतरराज्यीय स्थलांतर मजूर कायदा आणि बिडी कामगार, चित्रपट कामगार, बांधकाम मजूर, गोदी कामगार, मळे कामगार आणि मोटर वाहतूक कामगार, सेल्स प्रमोशन कर्मचारी आणि कार्यरत पत्रकार यांच्याबद्दलचे विशेष कायदे यांच्यासह एकूण १३ कायद्यांबाबत केले आहे. कायदे सोपे करण्याच्या नावाखाली, भाजप सरकार देशातील सर्व कामगारांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी कमी वेतन मिळणाऱ्यांपासून ते सर्वात जास्त वेतन मिळवणाऱ्यांपर्यंत, खेड्यामध्ये राहणाऱ्यांपासून ते महानगरांपर्यंत राहणाऱ्यांपर्यंत, अगदी छोट्या शेतात, घरात काम करणाऱ्यांपासून ते अत्याधुनिक कारखाने आणि कार्यालयांमध्ये

न्यूज अपडेट : फक्त एका कॉलवर रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती:

न्यूज अपडेट : फक्त एका कॉलवर रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती: कोरोना विषाणूवर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- कोरोना विषाणूवर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे, आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे. ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधून रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले

न्यूज अपडेट : एम.पी.सी.बी. कार्यालय व झायडस कंपनीत विशेष कोव्हीड-१९ तपासणी शिबीर आयोजीत..!!!

न्यूज अपडेट : एम.पी.सी.बी. कार्यालय व झायडस कंपनीत विशेष कोव्हीड-१९ तपासणी शिबीर आयोजीत..!!! नवी मुंबई (प्रतिनिधि) :- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही बंधने राखून व सुरक्षेच्या नियमांचे पालन करून विविध गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जात आहेत व आता उद्योग - व्यवसायांनाही सुरूवात झालेली आहे. या अनुषंगाने सर्वात मोठा औद्योगिक पट्टा मानल्या जाणा-या ठाणे-बेलापूर पट्टीतील विविध उद्योग सुरू झाले असून त्या ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्सींग, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर अशा सुरक्षात्मक बाबींची काळजी घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या उद्योग समुहांमध्ये काम करण्यासाठी आसपासच्या विविध शहरांतून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी दैनंदिन ये-जा करीत असून खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार एम.आय.डी.सी. भागातील विविध कंपन्यांमध्ये कोव्हीड-१९ तपासण्या करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. एम.आय.डी.सी. क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज अस

न्यूज अपडेट : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश; खाजगी रूग्णालयात देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्यात यावी:     

न्यूज अपडेट : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश; खाजगी रूग्णालयात देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्यात यावी:      नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोरोना विषाणू बाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रूग्णालयांनी महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या दिनांक २१ मे २०२० अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारावी याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना १० ऑगस्ट २०२० रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व २१ मे आणि ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन अधिसूचनेचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत असल्याने याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशा तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. याविषयी अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महा

न्यूज अपडेट : शहर स्वच्छतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव..।।

न्यूज अपडेट : शहर स्वच्छतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव..।। नवी मुंबई :- स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम व देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा  नावलौकीक आहे. यामध्ये दररोज शहर स्वच्छ ठेवून नियमित योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. त्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सन्मान करणारा हा कार्यक्रम मनाला समाधान देणारा असल्याचे मत मांडत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी यापुढील काळात आपण सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने आयोजित स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. यावेळी अतिवृष्टीमुळे मागील वर्षी कोल्हापूर भागात उद्भवलेल्या आपत्ती प्रसंगात चांगली कामगिरी करणा-या स्वच्छताकर्मींचाही

न्यूज अपडेट : "मी मराठी प्रतिष्ठान" तफेॅ जेष्ट पञकार मोहन वाघमारे यांचा प्रशंतीपञ देऊन सन्मान:

न्यूज अपडेट : "मी मराठी प्रतिष्ठान" तफेॅ जेष्ट पञकार मोहन वाघमारे यांचा प्रशंतीपञ देऊन सन्मान: नवी मुंबई (प्रतिनिधि) :-  नवी मुंबईतील जेष्ट पञकार मोहन आ. वाघमारे यांनी मी मराठी प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेतील उतम काव्य रचना म्हणून प्रशस्ति-पत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.                 महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : वृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात जमा;डॉ. उत्कर्ष शिंदे व शिंदेशाही च्या मागणीला अखेर यश:   

न्यूज अपडेट : वृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात जमा;डॉ. उत्कर्ष शिंदे व शिंदेशाही च्या मागणीला अखेर यश:    डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी या कलावंताच्या व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तसेच सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन कलावंताच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून सरकार समोर मांडल्या . नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- आज लाॅकडाऊन च्या काळात सर्व बंद असल्याने कलाकारांना जगणे मुश्किल झाले होते. यांसोबत महाराष्ट्र शासनाच्या " वृद्ध कलावंत उपास माराने दिवस काढत आहे त्याच बरोबर  मानधन योजना " यामध्ये नोंदीत वृद्ध कलावंत यांना ही शासनाच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची देण्यारी रक्कम कोरोना संकटामुळे शासनाकडून बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सर्व कलावंतानी आपली व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डाॅ उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या कडे मांडल्या व डाॅ उत्कर्ष आनंद शिंदे यांनी ह्या कलावंताच्या व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट च्

न्यूज अपडेट : जम्बो कोव्हीड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग:

न्यूज अपडेट : जम्बो कोव्हीड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग: नवी मुंबई (पुणे/प्रतिनिधि) :- पुणे येथील जम्बो कोविड केअर सेंटरमधील दोन डॉक्टरांनी एक सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही डॉक्टरांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी एक २५ वर्षीय महिला डॉक्टर रुग्णसेवा करीत आहे. तिच्यासोबत डॉ. योगेश भानुशाला भद्रा आणि डॉ. अजय बागल कोट हे देखील अनेक दिवसापांसून येथे काम करीत आहेत. या दोघांनी तिला अनेक वेळा शरीर सुखाची मागणी केली होती. याविरोधात पीडित डॉक्टर महिलेने तेथील प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, आरोपी डॉक्टरांविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रार करुनही हे प्रकार थांबत नसल्याने सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित डॉक्टर महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून विनयभंगप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुर्ण तपास करीत आहेत.  

न्यूज अपडेट : कोरोनावर गुणकारी ठरत आहे ती म्हणजे आपली बाजरीची भाकर :

न्यूज अपडेट : कोरोनावर गुणकारी ठरत आहे ती म्हणजे आपली बाजरीची भाकर : नवी मुंबई: नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे. प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील टॉर्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे. तर पाहुया बाजरी पासुन होणारे फायदे: १) शक्ती वर्धक - बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. २) बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते. ३) हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत ४) कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झी

न्यूज अपडेट: रेस्टॉरंट सुरु करण्यास मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावरच पुढील निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे:

न्यूज अपडेट: रेस्टॉरंट सुरु करण्यास मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावरच पुढील निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी संवाद: नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधि) :- राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आजही कोव्हीड वर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोना सोबत जगताना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हीड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण आता ते एकेक

"Health Tips" : सततच्या येणाऱ्या खोकल्याचा तुम्हाला कंटाळा आलाय..!! तर हि पान चावून खाल्ल्यावर ५ मिनिटांत खोकला गायब..!

"Health Tips" : सततच्या येणाऱ्या खोकल्याचा तुम्हाला कंटाळा आलाय..!! तर हि पान चावून खाल्ल्यावर ५ मिनिटांत खोकला गायब..! आरोग्यवर्धक :- आज सर्वत्र वातावरण बदललं कि विविध आजार आपल्याला होत असतात. त्यामध्ये सर्वात सामान्य आजार आहे तो म्हणजे सर्दी, खोकला. अगधी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच हा आजार कधी न कधी होतच असतो. त्यामध्ये ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना वारंवार सर्दी खोकला हे आजार होत असतात. या वर आपण औषध उपचार जरी दवाखाण्यात जाऊन केला तरी याचा त्रास होत असतो. पण आज आपण एक असा आयुर्वेदिक उपचार जाणून घेणार आहोत ज्या मुळे अगदी ३ मिनिटातच तुमचा खोकला पूर्णपणे थांबेल. आणि ३ दिवस हा उपचार जर तुम्ही केलात तर वारंवार होणारा सर्दी खोकला हा पूर्णपणे नाहीसा होईल. खोकल्याचे २ प्रकार असतात कोरडा खोकला आणि ओला खोकला. कोरड्या खोकल्यामध्ये तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं आणि घशात तडतडत आणि त्यामुळेच खोकला येतो. ओल्या खोकल्यामध्ये तुमच्या छातीत कफ झालेला असतो. आणि आपले शरीर तो बाहेर फेकण्याचा तो प्रयंत्न करत असतो आणि खोकला येतो. यामध्ये कोणताही खोकला असेल तर

न्यूज अपडेट : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा, हिंद भारतीय जनरल कामगार सेने कडून जाहीर निषेध..।।

न्यूज अपडेट : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा, हिंद भारतीय जनरल कामगार सेने कडून जाहीर निषेध..।। नवी मुंबई (प्रतिनिधि) :- केंद्रातील मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर कामगार विरोधी धोरणे आखून त्या प्रकारचे कामगार विरोधी बिल आणून मालक धार्जिणे कायदे संसदेत पास करून घेतले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कायम कामगार असुरक्षित झाला असून केंद्र सरकारने कामगारांची सुरक्षा काढून घेतली आहे. कामगारांना वाऱ्यावर सोडून उद्योगपती मालकांच्या फायद्याचे पुरेपूर संरक्षण केले आहे. अशा कामगार विरोधी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.  तसेच, हा कामगार विरोधी लवकरात लवकर रद्द झाला पाहीजे व कामगारांच्या हिताचे आणि कामगारांचे हक्क त्यांना परत मिळाले पाहिजेत, कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळाले पाहीजे या साठी कामगारांनी संघटित होऊन या कायद्याला तीव्र विरोध केला पाहिजे. या अन्यायकारक, कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याचा कडाडून विरोध केला पाहिजे असे, मत हिंद भारतीय जनरल कामगार सेना नवी मुंबई उपाध्यक्ष, कामगार नेते व शिवसेना कामगार विभागाचे उप शहर प्रमु

"Health Tips" : आता मान दुखीवर करा घरगुती उपाय...!!!

"Health Tips" : आता मान दुखीवर करा घरगुती उपाय...!!! आरोग्यवर्धक :- एका विशिष्ट स्थितीत मान बराच वेळपर्यंत राहिल्याने आपली मान दुखायला लागते. या गोष्टीमुळे दुखु लागते आपली मान जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणे, जास्त वेळ मोबाइल चा वापर करणे ,जास्त वेळ लिहिणे, वाचणे यामुळे काही वेळेस मान फिरवणे देखील कठीण होउन जात म्हणुनच आज आम्ही घेउन आलो आहोत मान दुखीवर घरगुती उपाय चला तर जाणुन घेऊयात. ● मान दुखत असल्यास थोडेसे बर्फाचे तुकडे घ्या ते प्लास्टिकची पिशवी असल्यास त्यामध्ये ठेवा. अन ज्या ठिकाणी दुखत आहे त्या भागावर हलक्या हाताने २ मिनिटे फिरवा. थोड्या थोड्या वेळाने अस करा. यामुळे मान दुखीच्या वेदना कमी होतील. ● मान दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ टाकुन आंघोळ करा. सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ करताना एक काळजी अवश्य घ्या ती म्हणजे त्या पाण्याने आपले केस धूऊ नका. ● कॅल्शियम हा आपल्या शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे, जो स्नायूंच्या आणि हाडांच्या मजबूती साठी महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्या कमीमुळे सुद्द

न्यूज अपडेट : अनुदानित शिक्षकांकडून १० टक्के पगार दान; विनाअनुदानित शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ:

न्यूज अपडेट : अनुदानित शिक्षकांकडून १० टक्के पगार दान; विनाअनुदानित शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ: कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या शिक्षकांसाठी आता अनुदानित शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटीतील शिक्षकांचा उपक्रम. नवी मुंबई (बातमी/अंबरनाथ) :- कोरोनाच्या या महामारीच्या संकटामुळे शाळा बंद असल्यानं विनाअनुदानित शिक्षकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. या शिक्षकांच्या मदतीला अनुदानित शिक्षक पुढे सरसावले आहेत. अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेत हा आदर्श उपक्रम राबवला जात आहे. अनुदानित शिक्षकांकडून १० टक्के पगार दान करुन विनाअनुदानित शिक्षकांना मदत केली जात आहे. अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटी : शिक्षणसंस्थेच्या शहरात महात्मा गांधी विद्यालय, भाऊसाहेब परांजपे विद्यालय, शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, विद्याविहार शाळा अशा चार ते पाच शाळा असून त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे जवळपास एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील जवळपास अर्धे कर्मचारी हे विनाअनुदानित असून मुलांकडून येणाऱ्या फी मधून

न्यूज अपडेट : संगीतातील एक तारा निखळला; प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी  गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन:

न्यूज अपडेट : संगीतातील एक तारा निखळला; प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी  गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन: नवी मुंबई (बातमी/चेन्नई) :-  प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. कालांतराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होता. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. सकाळी मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त होते. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल.. एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती ९० च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फ

न्यूज अपडेट : महापालिकेचा अनदेखा कारभार; पनवेलच्या उड्डाणपुलावर बरेच मोठे खड्डे वाहतूक पोलिसांनी रेतीने भरले खड्डे :

न्यूज अपडेट : महापालिकेचा अनदेखा कारभार; पनवेलच्या उड्डाणपुलावर बरेच मोठे खड्डे वाहतूक पोलिसांनी रेतीने भरले खड्डे : पनवेल : नवीन पनवेलजवळील उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या रस्त्यावर बरेच मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हा प्रश्न लक्षात घेऊन पनवेल वाहतूक पोलिसांनी स्वता ते खड्डे रेतीने भरुन वाहतूक सुरळीत करण्याची एक चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. नवीन पनवेल उड्‌डाणपुलावरुन पनवेलला येणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे सर्वच वाहनचालकांना वाहनं चालवताना या त्रासचा सामना करावा लागत होता. तसेच खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही या ठिकाणी निर्माण होत असे. हीच बाब लक्षात घेऊन पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी काही क्षणाचाही विलंब न लावता जेसीबीव्दारे जवळील असलेल्या रेतीच्या सहाय्याने संपुर्ण खड्डे भरुन टाकले. त्यामुळे आता या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेल स

न्यूज अपडेट : शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची त्याच्या सावत्र भावाकडून गोळ्या झाडून हत्या :

न्यूज अपडेट : शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची त्याच्या सावत्र भावाकडून गोळ्या झाडून हत्या : नवी मुंबई (बातमी/ठाणे) :- ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करुन मृतदेह वाशीच्या खाडीत टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान माणिक पाटील यांच्या घरातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने देखील चोरीला गेले असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. ही हत्या माणिक पाटील यांच्या सावत्र मुलगा सचिन पाटील याने संपत्तीच्या वादातून केली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार माणिक पाटील यांच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्यानंतर उघडकीस आला असून मुख्य संशयित आरोपी सचिन पाटील फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राकेश माणिक पाटील (३४) असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे. शिवसेनेचे नगर सेवक माणिक पाटील हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहण्यास आहे. राकेश हा जवळच असणाऱ्या शिवसृ

न्यूज अपडेट : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अजित पवार भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ :

न्यूज अपडेट : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अजित पवार भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ : नवी मुंबई (बातमी/पुणे) :- भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी आज, शुक्रवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच प्रा. कुलकर्णी या राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाही ना, अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले. कुलकर्णी यांचे तिकीट कापल्याने त्या नाराज असल्याची कुजबुज सुरू आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी त्या इच्छुक आहेत. दरम्यान, आज अजित पवार यांची घेतलेली भेट ही राजकीय नव्हती. नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी ही भेट असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कुलकर्णी लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आताचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी या प्रबळ इच्छुक होत्या. त्यावेळी या दोघांनाही चांगले पद मिळणार असल्याचे आश

न्यूज अपडेट : "फी भरण्यासाठी आता कर्ज काढा", शाळाच म्हणू लागल्या:

न्यूज अपडेट : "फी भरण्यासाठी आता कर्ज काढा", शाळाच म्हणू लागल्या: नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे थेट परिणाम हे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर झाले. नोकरीवर गदा येण्यापासून मग त्याच्याशी निगडीत संपूर्ण साखळीच अशी काही गुंतली की, सारी गणितंच कोलमडून गेली. काहींना आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे, काहींच्या वेतनात कपात झाली आहे तर, काहींना नोकरी असूनही जवळपास गेले पाच- सहा महिने वेतनच मिळालेलं नाही. ही संकटं कमी म्हणून आता काही शाळांकडून पालक वर्गाला फी भरण्याची सक्ती करण्यात येत आहे ज्यामुळं आता नवी समस्या पालकांपुढे उभी राहिली आहे.  नवी मुंबईतील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल या शाळेनं तर, पालकांना एक नोटीसवजा पत्रच पाठवलं आहे. फी भरण्यासाठीचे पैसे नसल्याच एज्युकेशन लोन अर्थात शिक्षणासाठी कर्ज घेण्यासंबंधीचं पत्र पाठवलं आहे. यात भर घालणारं दुसरं उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना एज्युकेशन लोन घेण्यासाठी म्हणून बँकेचं नावही सुचवलं आहे.  हा संपूर्ण प्रकार पाहता पालकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आह

न्यूज अपडेट : कामगार कायद्यातील दुरुस्तीचा पहिला झटका; नाशिक मधील २० कामगार कामावरून तडकाफडकी कमी केले:

न्यूज अपडेट : कामगार कायद्यातील दुरुस्तीचा पहिला झटका; नाशिक मधील २० कामगार कामावरून तडकाफडकी कमी केले: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाने लोकसभेत मंजूर केलेल्या ३ श्रमसंहिता विधेयकामुळे कामगाराच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याने देशभरातील अनेक कामगार संघटना व लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षांनी विधेयकाला विरोध केला आहे. विधेयकाला राष्ट्रपती यांनी अंतिम मंजुरी देवू नये अशी मागणी केली जात असतानाच, औद्योगिक वसाहतीमधील मेमको इंजिनियरिग प्रा. लिमिटेड कंपनीतील २० कायम कामगारांना व्यवस्थापनाने २३ सप्टेंबर रोजी तडकाफडकी कामावरून कमी केले. एकूण वर्ष केलेले काम व बाकी असलेले निवृत्ती काळानुसार सरासरी ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाईचे धनादेश देवून उद्यापासून कामवरून येऊ नका, असे सांगण्यात आले आहे. यामुळे मेमको मधील कायम कामगारांना धक्का बसला असून कायमस्वरूपी बेरोजगार झाले आहेत. यामुळे विधेयकाला अंतिम मंजुरी मिळण्याअगोदरच देशातील नाशिकमधील औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना पहिला फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मेमको कंपनी नाशिक व पुणे मधील बॉश, क्रोम्ट

न्यूज अपडेट मान्सून : मुसळधार पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीला धक्का बसला, पण या पावसाळ्यात ओसंडून जाण्याची शक्यता कमी:

न्यूज अपडेट मान्सून : मुसळधार पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीला धक्का बसला, पण या पावसाळ्यात ओसंडून जाण्याची शक्यता कमी: पनवेल/रायगड (विशेष/प्रतिनिधि) :- येणार्या पुढील वर्षात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पाणी कपात होण्याची शक्यता नाही, कारण खालापूर येथे असलेल्या मोरबे धरणातल पाणी शहराला पुरवले जाते परंतु आता त्यामध्ये 92% पाणी भरले आहे.  गेल्या 2 दिवसांत होत असलेल्या मुसळधार पावसाने मोरबे धरणाच्या पातळीला मात्र धक्का दिला आहे. पण तथापि, धरण ओव्हरफ्लो (overflow) होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात अजुन किमान 300 मिमी जास्त पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. मोरबे धरण गेल्या तीन वर्षांपासून ओसंडून वाहत आहे आणि परिणामी त्यानंतर त्या भागात पाणी कपात झालेली नाही. खालापुरातील मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवार आणि गुरुवारी रात्री 84 मिमी पाऊस झाला.  धरणाची पातळी 88 मीटरच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत 86.5 मीटरपर्यंत पोहोचली. या धरणाची एकूण साठवण क्षमता 190.890 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) असल्याची माहिती मोरबे धरणातील अभियंता यांनी दिली.  23 सप्टेंबर पर्यंत, स्टोरेज 175.586 एमसीएम होते म्हणजे ते त्याच्या एकू

न्यूज अपडेट मान्सून : नवी मुंबईत 23 सप्टेंबर रोजी वाशी, खोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ आणि बेलापूरमध्ये सरासरी किती पाऊस झाला..!!!!

न्यूज अपडेट मान्सून : नवी मुंबईत 23 सप्टेंबर रोजी वाशी, खोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ आणि बेलापूरमध्ये सरासरी किती पाऊस झाला..!!!! नवी मुंबई(विशेष/प्रतिनिधि) :- रात्रभर मुसळधार पावसाने महानगरातील अनेक भागाचे कंबरडे खोल पाण्यावर सोडले आणि रेल्वे व रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.  या पावसाळ्याच्या शेवटच्या 24 तासांत मुंबईत सर्वाधिक पाऊस झाला आणि शहर व उपनगरामध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबर रात्रभर आणि बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे महानगरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आणि रेल्वे व रस्त्यांची वाहतूक देखिल  विस्कळीत झाली. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये (पश्चिम उपनगरात) 286.4 मिमी पाऊस बुधवारी सकाळी 08.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या दरम्यान झाला, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसालीकर यांनी दिली. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेने आज (एनएमएमसी) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी 08:30 ते बुधवारी सकाळी 08:30 वाजेपर्यंत एकूण 3202.74 मिमी पावसाची नोंद झाली.  एनएमएमसीच्या आकडेवारीनुसार बेलापूरमध्ये 278.40 मिमी, नेरूळ, वाश

न्यूज अपडेट मान्सून : अतिवृष्टी होण्याचा इशारा; मुंबईकरांनी रात्री घराबाहेर पडू नका..।।।।

न्यूज अपडेट मान्सून : अतिवृष्टी होण्याचा इशारा; मुंबईकरांनी रात्री घराबाहेर पडू नका..।।।। परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- मुंबई व इतर उपनगराला या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागान मध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये, परेल नाट्यगृहात आणि काही रुग्णालयात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांसह रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत पाच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत आहे. दरम्यान, झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झाले आहे. सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणा

न्यूज अपडेट : आजचे रेकॉर्ड ब्रेक; राज्यात एका दिवसात कोरोनाच्या ३२ हजार रुग्णांना डिस्चार्ज :

न्यूज अपडेट : आजचे रेकॉर्ड ब्रेक; राज्यात एका दिवसात कोरोनाच्या ३२ हजार रुग्णांना डिस्चार्ज : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद, एका दिवसात ३२ हजार रुग्णांना डिस्चार्ज राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवी मुंबई (प्रतिनिधि/मुंबई) :-  राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली आहे. आज ३२ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदवले गेले असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ नमुन्या