Skip to main content

न्यूज अपडेट : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश; खाजगी रूग्णालयात देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्यात यावी:     

न्यूज अपडेट : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश; खाजगी रूग्णालयात देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्यात यावी:     



नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोरोना विषाणू बाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रूग्णालयांनी महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या दिनांक २१ मे २०२० अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारावी याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना १० ऑगस्ट २०२० रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.


तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व २१ मे आणि ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन अधिसूचनेचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत असल्याने याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशा तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.


याविषयी अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील कोव्हीड-१९ उपचार करणा-या सर्व रूग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता ६ विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड रूग्णालयांमधील कोव्हीड-१९ चा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी केली जात आहे.


या पथकांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उपआयुक्त श्री. राजेश कानडे यांच्या समवेत विशेष आढावा बैठक घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पथकांना कालबध्द पध्दतीने विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व देयक तपासणीच्या त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती घेऊन त्यामध्ये सुधारणा सूचित केल्या.


कोव्हीड रूग्णांवर खाजगी रूग्णालयांमार्फत शासनाने निश्चित केलेल्या दरांमध्येच योग्य उपचार केले जावेत व त्यामध्ये रूग्णाची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक व्हायला नको हा उद्देश स्पष्ट करीत सर्व रूग्णालयांकडून तशा प्रकारचे बंधपत्र लिहून घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. या लेखा परीक्षण समितीचा उद्देश देयकांमध्ये आकारण्यात आलेल्या विविध बाबींची दर पडताळणी हा असून त्यानुसार काम करून दर आठवड्याला पथकनिहाय तपशील आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


पथकांना आत्तापर्यंत देयके तपासणी करताना आलेल्या अनुभवांची सविस्तर माहिती घेत आयुक्तांनी त्यामधील सुधारणांविषयी मार्गदर्शन केले व देयके तपासणी करताना वस्तुनिष्ठ काम होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. 



खाजगी रूग्णालयांमधील कोव्हीड-१९ विषयक उपचारांच्या देयकांबाबत नागरिकांना तक्रार दाखल करणे सोयीचे व्हावे याकरिता "कोव्हीड-१९ बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)" कार्यान्वित करण्यात आला आहे


022-27567389 हा हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.


खाजगी रूग्णालयात उपचार करताना ते शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क आहे. तरी नागरिकांनी खाजगी रूग्णालयातील कोव्हीड-१९ उपचारांच्या देयकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर करावी असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे