Skip to main content

न्यूज अपडेट : "फी भरण्यासाठी आता कर्ज काढा", शाळाच म्हणू लागल्या:

न्यूज अपडेट : "फी भरण्यासाठी आता कर्ज काढा", शाळाच म्हणू लागल्या:



नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे थेट परिणाम हे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर झाले. नोकरीवर गदा येण्यापासून मग त्याच्याशी निगडीत संपूर्ण साखळीच अशी काही गुंतली की, सारी गणितंच कोलमडून गेली. काहींना आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे, काहींच्या वेतनात कपात झाली आहे तर, काहींना नोकरी असूनही जवळपास गेले पाच- सहा महिने वेतनच मिळालेलं नाही. ही संकटं कमी म्हणून आता काही शाळांकडून पालक वर्गाला फी भरण्याची सक्ती करण्यात येत आहे ज्यामुळं आता नवी समस्या पालकांपुढे उभी राहिली आहे. 


नवी मुंबईतील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल या शाळेनं तर, पालकांना एक नोटीसवजा पत्रच पाठवलं आहे. फी भरण्यासाठीचे पैसे नसल्याच एज्युकेशन लोन अर्थात शिक्षणासाठी कर्ज घेण्यासंबंधीचं पत्र पाठवलं आहे. यात भर घालणारं दुसरं उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना एज्युकेशन लोन घेण्यासाठी म्हणून बँकेचं नावही सुचवलं आहे. 


हा संपूर्ण प्रकार पाहता पालकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेकदा उच्च शिक्षणासाठी कर्ज काढलं जातं. पण, आता नर्सरीपासूनच्याच शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ येते की काय, अशाच पेचात हे पालक पडले आहेत. संबंधित शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून मात्र याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सदर शाळांचं प्रशासन आणि कार्यकारिणी फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. 


लॉकडाऊन संपावं आणि विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी वसुली करावी अशीच या शाळांची भूमिका असून, पालक आणि विद्यार्थ्यांपुढे अडचण निर्माण करण्याचा हा पवित्रा पाहता पालक वर्गानं त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बरं, शाळेनं मागणी केलेल्या फी मध्ये ट्युशन, टर्म, लॅब इतकंच नव्हे तर प्रवासासाठीच्या फीचा सुद्धा समावेश आहे. परिणामी आमची परिस्थिती जाणून घ्या आणि त्यानंतर अशी कोणतीही मागणी करण्याचा विचार करा असा संतप्त सूर पालकांनी आळवला आहे. 


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे