न्यूज अपडेट : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा, हिंद भारतीय जनरल कामगार सेने कडून जाहीर निषेध..।।
न्यूज अपडेट : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा, हिंद भारतीय जनरल कामगार सेने कडून जाहीर निषेध..।।
नवी मुंबई (प्रतिनिधि) :- केंद्रातील मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर कामगार विरोधी धोरणे आखून त्या प्रकारचे कामगार विरोधी बिल आणून मालक धार्जिणे कायदे संसदेत पास करून घेतले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कायम कामगार असुरक्षित झाला असून केंद्र सरकारने कामगारांची सुरक्षा काढून घेतली आहे. कामगारांना वाऱ्यावर सोडून उद्योगपती मालकांच्या फायद्याचे पुरेपूर संरक्षण केले आहे. अशा कामगार विरोधी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
तसेच, हा कामगार विरोधी लवकरात लवकर रद्द झाला पाहीजे व कामगारांच्या हिताचे आणि कामगारांचे हक्क त्यांना परत मिळाले पाहिजेत, कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळाले पाहीजे या साठी कामगारांनी संघटित होऊन या कायद्याला तीव्र विरोध केला पाहिजे. या अन्यायकारक, कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याचा कडाडून विरोध केला पाहिजे असे, मत हिंद भारतीय जनरल कामगार सेना नवी मुंबई उपाध्यक्ष, कामगार नेते व शिवसेना कामगार विभागाचे उप शहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.