Skip to main content

न्यूज अपडेट : एम.पी.सी.बी. कार्यालय व झायडस कंपनीत विशेष कोव्हीड-१९ तपासणी शिबीर आयोजीत..!!!

न्यूज अपडेट : एम.पी.सी.बी. कार्यालय व झायडस कंपनीत विशेष कोव्हीड-१९ तपासणी शिबीर आयोजीत..!!!



नवी मुंबई (प्रतिनिधि) :- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही बंधने राखून व सुरक्षेच्या नियमांचे पालन करून विविध गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जात आहेत व आता उद्योग - व्यवसायांनाही सुरूवात झालेली आहे. या अनुषंगाने सर्वात मोठा औद्योगिक पट्टा मानल्या जाणा-या ठाणे-बेलापूर पट्टीतील विविध उद्योग सुरू झाले असून त्या ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्सींग, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर अशा सुरक्षात्मक बाबींची काळजी घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


या उद्योग समुहांमध्ये काम करण्यासाठी आसपासच्या विविध शहरांतून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी दैनंदिन ये-जा करीत असून खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार एम.आय.डी.सी. भागातील विविध कंपन्यांमध्ये कोव्हीड-१९ तपासण्या करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. एम.आय.डी.सी. क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन अशा विविध प्राधिकरण, संस्थाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.



एम.आय.डी.सी. क्षेत्रातील ही विशेष कोव्हीड तपासणी मोहीम राबविण्यासाठी उपआयुक्त श्री. राजेश कानडे यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली असून डॉ. सचिन नेमाने यांच्या नियंत्रणाखाली विशेष तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री. डी.बी.पाटील यांच्या पुढाकारातून मंडळाचे महापे येथील निर्मल कार्यालय तसेच झायडस कंपनी याठिकाणी कोव्हीड तपासण्या केल्या.


यामध्ये २०२ अधिकारी, कर्मचारी यांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सर्वांचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तथापि त्यामधील ४७ व्यक्तींची लक्षणे पाहून त्यांच्या आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात आल्या आहेत.


कोणतीही संशयित व्यक्ती कोव्हीड तपासणीपासून वंचित राहू नये ही आयुक्तांची भूमिका असून दररोज १ हजार आर.टी.-पी.सी.आर. चाचण्यांची क्षमता असणारी महानगरपालिकेची स्वत:ची अद्ययावत व स्वयंचलित प्रयोगशाळा आहे. त्यामुळे 'मिशन ब्रेक द चेन' मोहीमेअंतर्गत ट्रेस, टेस्ट, ट्रिट या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने ए.पी.एम.सी. मार्केट प्रमाणेच एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कंपन्या या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.


 


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे