Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

न्यूज अपडेट : पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी व महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड..!!!

न्यूज अपडेट : पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी व महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड..!!! पनवेेल (प्रतिनिधि/उमेश खांदेकर) :- पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजप नगरसेवक संतोष शेट्टी तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय प्रभाग समिती 'अ' सभापतीपदी अनिता पाटील, प्रभाग समिती 'ब' सभापतीपदी समीर ठाकूर, प्रभाग समिती 'क' सभापतीपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती 'ड' सभापतीपदी सुशील घरत यांची निवड झाली आहे.  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप-आरपीआय ची एक हाती सत्ता असल्याने या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार आज निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व प्रभाग समिती सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले. पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसूम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रृघ्न काकडे, संजय

न्यूज अपडेट : कोरोना लस; ऑक्सफर्ड - अस्ट्राझेनकाच्या लशी बद्दल लोकांना खुशखबर:

न्यूज अपडेट : कोरोना लस; ऑक्सफर्ड - अस्ट्राझेनकाच्या लशी बद्दल लोकांना खुशखबर: नवी मुंबई :- २०२१ च्या सुरुवातीला भारतामध्ये एकापेक्षा जास्त लशी उपलब्ध होऊ शकतील असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलंय. आता ऑक्सफर्ड विद्यापीठ- अस्ट्राझेनका मिळून तयार करत असलेल्या लशीच्या चाचण्यांमधून चांगली बातमी आली आहे. ऑक्सफर्डच्या लशीचं उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. या लशीसोबतच भारत सरकारने निर्माण केलेला टास्क फोर्स हा इतर औषध उत्पादक कंपन्यांसोबतही चर्चा करत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले आहेत. जगभरात विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसवरच्या लशीचं संशोधन सुरू आहे. यापैकी १० लशींच्या चाचण्या या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात आलेल्या आहेत. या लशी परिणामकारक आणि सुरक्षित आहेत का हे तिसऱ्या टप्प्यात सिद्ध होणं महत्त्वाचं आहे. लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहीम कशी राबवायची, यासाठीची योजना आखण्यात येत असल्याचंही हर्ष वर्धन यांनी म्हटलंय. सोबतच भारतामध्ये सध्या सुरू असणाऱ्या विविध लशींच्या चाचण्या आणि त्यांचे निकाल याची माहितीही आपण घेत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले आहेत. ऑक्सफर

न्यूज अपडेट : आदर पुनावाला यांचा धक्कादायक खुलासा;पुढील २० वर्षे तरी कोरोनाच्या लसीची गरज जगाला भासणार:

न्यूज अपडेट : आदर पुनावाला यांचा धक्कादायक खुलासा;पुढील २० वर्षे तरी कोरोनाच्या लसीची गरज जगाला भासणार: नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोरोना विषाणूची महामारी पुढील काही महिन्यात आटोक्यात येणार असं जर आपल्याला वाटत असेल तर हा आपला गैरसमज आहे. कारण कोरोनाचा विषाणू हा लवकर नष्ट होणार नाही असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे ज्या देशांमध्ये कोरोना आजार आटोक्यात आला होता त्यानंतर पुन्हा तिथे कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याचे दिसून आल आहे. जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन आदर पुनावाला यांनीही याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच, आदर पुनावाला म्हणाले की, जगभरात पुढच्या २० वर्षांपर्यंत कोरोना राहणार असून तोपर्यंत कोरोना लसीची गरज भासणार आहे. पूर्ण इतिहासात असे एकदाही घडले नाही की, एकदा लसीचा वापर झाला की पुन्हा लसीची गरज भासली नाही. फ्लू, निमोनिया, पोलियो, कांजण्या या आजारांवर लसी अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत. यातील कोणत्याही आजाराचे लसीकरण बंद करण्यात आलेले नाही. जरी लोकसंख्येतील १०० टक्के लोकांचे जरी लसीकरण करून झाले तरीही लसीची गरज आपल्याला

न्यूज अपडेट : सिडकोची नवीन योजना;सोडत प्रथा बंद..प्रथम येणा-यास प्राधान्य, दहा लाखांनी घरही झाली स्वत..!!

न्यूज अपडेट : सिडकोची नवीन योजना;सोडत प्रथा बंद..प्रथम येणा-यास प्राधान्य, दहा लाखांनी घरही झाली स्वत..!! नवी मुंबई (प्रतिनिधि) :- सिडकोने गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. आणि आता देखील त्यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. आता अर्ज मागवून सोडत काढण्याची पध्दत बंद करुन आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. जानेवारीपासून हे धोरण राबवले जाणार आहे. मागील दोन वर्षांतील सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. पैसे नसल्याने ग्राहकांनी ती परत केली आहेत. अगोदर आर्थिक पात्रता नसताना सुद्धा अनेक जण घरांसाठी अर्ज दाखल करत होते. यामुळे गरजूंना पात्रता असूनही घरापासून वंचित राहावे लागत होते. यामुळे सिडकोचे संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घर विक्रीच्या धोरणातच बदल करण्याचा निर्णय घेतला. आता सिडकोने आगामी काळात २ लाख १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच आता अर्ज करताना १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. जर घराची किंमत २५ लाख रुपये असेल तर अर्जासोबत अडीच लाख रुपये भरावे लागणार आहेत. या निर्णयाम

न्यूज अपडेट : परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास एफ.आय.आर. दाखल होणार..!!

न्यूज अपडेट : परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास एफ.आय.आर. दाखल होणार..!! नवी मुंबई (विशेष प्रतिनिधि) :- वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही  विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणा-या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. तथापि, अनेकदा अशाप्रकारची परवानगी  न घेताच वृक्ष तोड करणे अथवा वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते.  अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा (N.C.) नोंदविला जात होता. मात्र याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशाप्रकार

न्यूज अपडेट : हेमलता हरीचंद्र म्हात्रे यांची पनवेल महापालिकेच्या "क प्रभाग" समिती सभापतीपदी नियुक्ती:

न्यूज अपडेट : हेमलता हरीचंद्र म्हात्रे यांची पनवेल महापालिकेच्या "क प्रभाग" समिती सभापतीपदी नियुक्ती: पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) : - पनवेल महानगरपालिकेच्या क प्रभाग समिती सभापतीपदी हेमलता हरीचंद्र म्हात्रे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे .यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. मोनिका महानवर, अ प्रभाग समिती सभापतीपदी अनिता पाटील, ब प्रभाग समिती सभापतीपदी समीर ठाकूर, क प्रभाग, ड प्रभाग समिती सभापतीपदी सौ. सुशीला घरत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  पनवेल महानगरपालिकेतील महापौर व खासदार रामशेठ ठाकूर यांनी देखिल सभापतींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व तसेच गावातील प्रथम नागरिक ' क ' सभापती झाल्याने गावात आनंददाचे वातावरण सर्वत्र झाले आहे.       महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट स्पर्धेचे आयोजन..।।

न्यूज अपडेट : स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट स्पर्धेचे आयोजन..।। नवी मुंबई (प्रतिनिधि) :- स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान संपादन केलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करीता देशात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यादृष्टीने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. स्वच्छताविषयक कार्यात नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला सहभाग राहिल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने आपले मानांकन नेहमीच उंचावत नेलेले आहे. त्या अनुषंगाने या लोकसहभाग वाढीवर भर देण्यात असून त्याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या कोव्हीड 19 च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात असून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींग राखणे अशा आरोग्य सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी   नागरिकांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन

न्यूज अपडेट :- मास्क, सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणा-यांवर आता विशेष भरारी पथकांचा वॉच..।

न्यूज अपडेट :- मास्क, सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणा-यांवर आता विशेष भरारी पथकांचा वॉच..। नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोव्हीड 19 साथरोगावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुणे हीच बचावाची त्रिसूत्री असल्याने आरोग्य सुरक्षेच्या या नियमांचे पालन न करणा-या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या माध्यमातून दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना समज मिळावी ही भूमिका आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत ४८ लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब दिलासाजनक असली तरी कोरोना हा संसर्गातून पसरणारा रोग असल्याने जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत अतिशय जबाबदारीने काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये आगामी कालावधी हा उत्सवांचा आहे. विशेषत्वाने दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने नागरिक विविध प्रकारच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याचा संभव आहे. अशा गर

न्युज अपडेट : ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; घरगुती गॅसच्या किंमतीत घसरण या आहेत नवीन किंमती:

न्युज अपडेट : ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; घरगुती गॅसच्या किंमतीत घसरण या आहेत नवीन किंमती: नवी मुंबई (बातमी/कोल्हापुर) :- गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्या आहेत. सध्याची सिलिंडरची किंमत ५९७ रुपये आहे. तुम्हाला माहीत नसेल पण जर या किंमतीपेक्षा जास्त जर दर गेले तरच ग्राहकांना अनुदान दिले जाते. आणि यामुळेच चार महिने झाले अनुदान बंद करण्यात आले आहे अनुदान बंद का झाले? हे अजूनही काही जणांना माहीत नव्हते. देशात गॅसची किंमत कमी व्हावी म्हणून आंदोलने सुरू आहेत. गॅसचा मूलभूत दरही कमी झाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. अनुदान बंद का झाले? हे अजूनही काही जणांना माहीत नव्हते. देशात गॅसची किंमत कमी व्हावी म्हणून आंदोलने सुरू आहेत. गॅसचा मूलभूत दरही कमी  झाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. एप्रिलपासून गॅसच्या मूलभूत दरात वाढ झालेली नाही. सध्या गॅसचा दर ५९७ रुपये आहे. यापेक्षा जास्त जर दर झाला म्हणजे ७०० रुपये दर झाला तरच ग्राहकांच्या खात्यावर १०३ रुपये अनुदान जमा होते. ग्राहकांना वर्षाला १४.५ किलोच्या १२ सिलिंडरवर अनुदान दिले जाते. एखाद्याला त्याच्यापेक्षा जास्त गॅस लागत असेल तर त्यांना विनाअनु

न्यूज अपडेट :- अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचा नेरूळ विभागात अचानक पाहणी दौरा..!

न्यूज अपडेट :- अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचा नेरूळ विभागात अचानक पाहणी दौरा..! नवी मुंबई (प्रतिनिधि) :- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथीलता आणत विविध सेवांवरील निर्बंध खुले करण्यात आलेले असून नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी असा उत्सवी कालावधी लक्षात घेता संसर्गातून पसरणारा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी कमालीची सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अद्याप कोव्हीड 19 रोगावर कोणतीही लस अथवा औषध सापडलेले नसल्याने मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हीच खरी बचावाची ढाल आहे. तथापि नागरिकांकडून याबाबत तितकेसे गांभीर्य राखले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी प्रशासन व परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत नेरूळ विभागातील विविध ठिकाणच्या मार्केट भागाला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. अतिरिक्त

न्यूज अपडेट: सिडकोच्या दडपशाहीखाली; प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटतील का..!!!  

न्यूज अपडेट: सिडकोच्या दडपशाहीखाली; प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटतील का..!!!   • पोलिसांन कडुन कारवाई, प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणा करत सिडकोच्या विमानतळाच्या कामाला निषेध • सिडको प्रत्येक वेळेस असे आश्वासन देते लेखी काही देतच नाही • पनवेल तालुक्यातील १० बाधित गावांचा समावेश  • सिडकोच्या वतीने विमानतळबाधितांच्या प्रतिनिधीसोबत सोमवारी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली नवी मुंबई (प्रतिनिधि) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी सिडकोवर बेधडक घेराव मोर्चा काढण्यात आला. संतप्त ग्रामस्थांनी यावेळी सिडको कार्यालयाला चोहबाजुनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मोर्चेतील सर्व ग्रामस्थांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणा करत सिडकोच्या विमानतळाच्या कामाला निषेध केला. सिडको कडुन अजुनही कोणत्या प्रकारचे ठोस पावुल  उचलले जात नसल्याने मंगळवारी प्रकल्पग्रस्त आक्रमक होऊन व एकजुट होऊन त्यांनी सिडकोला घेराव घातला. यामध्ये पनवेल तालुक्यातील १० बाधित गावांचा सम

"Health Tips" : पायाना मुंग्या येत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय...!

"Health Tips" : पायाना मुंग्या येत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय...! आरोग्यवर्धक :- बराच वेळ बसून किंवा उभे राहिल्यास आपल्या पायांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटते का? काही घरगुती उपायांनी बराच काळ हात पायाना मुंग्या येण्याच्या समस्येवर आपण मात करू शकता. चला तर जाणून घेऊयात. एका टबमध्ये पाणी घ्या आणि त्यात 4 चमचे जाडे मीठ घाला. आता आपले हात व पाय त्या पाण्यात 20 ते 30 मिनिटे बुडवून ठेवा . आपण दररोज हे देखील करू शकता. हात पायाना मुंग्या येत असल्यास दही खा. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीज असत, जे रक्ताभिसरण सुधारून आपल्या शरीराच्या नसांचे कार्य सुधारण्यास मदत करत आणि हात पायांना मुंग्या येणे दूर करण्यास मदत मिळते. हात पायाना मुंग्या येत असल्यास मालिश थेरपी खूप उपयुक्त ठरते. मालिश केल्यास सतत मुंग्या येणे कमी होते. मालिश करण्यामुळे नसा उत्तेजित होतात आणि त्यांचे कार्य सुधारते. यामुळे रक्त परिसंचरण वाढते आणि आपले हात आणि पाय मुंग्या येणे देखील दूर होते. दालचिनीमध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे घटक असतात, जे आपले रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि हात, पायांच्या मुंग्या दूर करण्यास मद

न्यूज अपडेट : नेरूळ जेट्टी मार्च 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे...!!

न्यूज अपडेट : नेरूळ जेट्टी मार्च 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे...!! ● मांडवा ते नेरूळ आणि नेरूळ ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी नेरुळमधील जेट्टीचे सध्याचे काम पुढील वर्षी 2021 मार्च पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. ● 111 कोटी रुपयांच्या जेट्टीचे काम 2018 मध्ये सुरू झाले आणि ते 24 महिन्यांत पूर्ण होणार होते. नवी मुंबई (प्रतिनिधि) :- मांडवा ते नेरूळ आणि नेरूळ ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी नेरुळमधील जेट्टीचे सध्याचे काम पुढील वर्षी मार्च पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि शहर व औद्योगिक विकास चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सोमवारी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. हे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून ते मुंबई मेरीटाईम बोर्डाकडे (एमएमबी) ऑपरेशनसाठी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ठाणे खासदार राजन विचारे म्हणाले की, पुढच्या वर्षी ते सुरू झाल्यानंतर नवी मुंबईहून मुंबईला जाण्यासाठी 90 मिनिटांचा प्रवास वेळ कमी होईल. “जवळपास आठ महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे हे काम

न्यूज अपडेट : ग्राहकांना दिलासा; नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या भावामधे ३० रुपयांची घसरण:

न्यूज अपडेट : ग्राहकांना दिलासा; नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या भावामधे ३० रुपयांची घसरण: ● नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारा मध्ये आज १२५ गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी ७६ गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे. नवी मुंबई (प्रतिनिधि) :-   नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाऊक बाजारात आज १२५ गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी ७६ गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे पाहाला मिळाले. गेल्या सात दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. कांदा हा ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आज मार्केटमध्ये कांदा ६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्याने कांद्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली असल्याचे काही व्यापारी सांगतात. ३० वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले की, “काही व्यापारी अनधिकृतपणे कांद्याची साठवणूक करून दरवर्षी दसरा-दिवाळी सणाच्या वेळी कांद्य

न्यूज अपडेट : आर्थिक फायद्याची दुर्बल घटकांना अपेक्षा; घरांच्या किमती कमी करणार का सिडको..!!

न्यूज अपडेट : आर्थिक फायद्याची दुर्बल घटकांना अपेक्षा; घरांच्या किमती कमी करणार का सिडको..!! नवी मुंबई (प्रतिनिधि) :- ऐन दसरा-दिवाळीत घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. सिडको भविष्यात घरांच्या किमती करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल ईडब्लूसी (EWS) आणि अल्प उत्पन्न गट एलआयजी (LIG) गटातील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेची पूर्तता करण्यासाठी सिडकोने २ लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १ लाख घरांच्या बांधकाम निविदादेखील देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी या कंत्राटदारांना आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. सिडकोच्या या १ लाख घरांचा विकास आराखडा तयार असून इतर घरांसाठी जमिनीचा शोध घेतला जात आहे. महागृहनिर्मिती तसेच राज्य सरकारच्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभी करण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेला केलेल्या आर्थिक मदतीमुळे सिडकोची गंगाजळी तळ गाठू लागली आहे. महागृहनिर्मितीशिवाय सिडकोसमोर विमानतळ, रेल्वे, मेट्रो यांसारखे प्रकल्प आहेत. त्यामुळे सिडको महाग

न्यूज अपडेट :कोरोनाशी लढताना भारताने गाठला मैलाचा दगड; नक्की काय आहे महाराष्ट्राची परिस्थिती:

न्यूज अपडेट :कोरोनाशी लढताना भारताने गाठला मैलाचा दगड; नक्की काय आहे महाराष्ट्राची परिस्थिती: नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- कोविडशी लढ्यात भारताने मैलाचा दगड गाठला आहे. देशातील उपचार घेत असलेल्या (सक्रीय) रुग्णांची संख्या एक ते दीड महिन्यात प्रथमच ८ लाखांच्याही खाली आली आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या आज ७,९५,०८७ एवढी आहे. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १०.७०% आहे. याआधी १ सप्टेंबरला सक्रीय रुग्णसंख्या ८ लाखाहून कमी (७,८५,९९६) नोंदवली गेली होती. दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण रोगमुक्त होत आहेत. यामुळे भारताचा सक्रीय रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट होत आहे. भारतात बरे होणाऱ्याची संख्या मोठी आहे. या संख्येने ६५ लाखांचा (६५,२४,५९५) टप्पा ओलांडला आहे. उपचार घेत असलेली (सक्रीय) रुग्णसंख्या आणि बरे झालेले रुग्ण यांच्या संख्येतील फरक सातत्याने वाढत आहे आज तो ६७,२९,५०८ एवढा राहिला. गेल्या २४ तासात ७० हजार ८१६ पेशंट रुग्ण बरे झाले तर नवीन रुग्णांची संख्या ६२ हजार २१२ एवढी नोंदवली गेली. राष्ट्रीय पातळीवरील रिकव्हरी दर ८७.७८% वर पोहोचला. केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेश/राज्य सरका

न्यूज अपडेट :- शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे तरी कोण..!!

न्यूज अपडेट :- शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे तरी कोण..!! खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे. नवी मुंबई (बातमी/भंडारा) :- महाराष्ट्र पोलिस अकादमीत नुकत्याच झालेल्य उपनिरिक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या यशस्विनीसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा- अभिमानाचा ठेवा ठरलाच तसाच तो अनेकांना प्रेरणा देणारा क्षण होता, तो अनुभवण्यासाठी तिने प्रचंड संघर्ष केला त्याचीच ही सुखद परिणती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे २४ हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची १०८ वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक १,५४४ फौजदार दिले आणि त्यात १२० महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीला यांचा दहा वर्षांतील प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे. मुळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे यांचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी दहा वर्षांपूर्व

न्यूज अपडेट: "Mind Blowing Lady" अशी शक्कल लावली की वीजबिल झाले झटक्यात कमी..!

न्यूज अपडेट: "Mind Blowing Lady" अशी शक्कल लावली की वीजबिल झाले झटक्यात कमी..! नवी मुंबई : - आज कालच्या या जीवन व्यवहारात वीज वापरणे दिवसेंदिवस महाग होत चालल आहे आणि विजेच्या उपकरणांशिवाय तर आपले पान देखील हलू शकत नाही हे ही तितकेच खरे आहे. सामान्य माणसाने महिन्याचे वीजबील बघितले तर एसीत देखील घाम फुटतो. पण आपल्या हातात वीज वाचवण्यापलीकडे काहीच नसते. खरं तर सौर ऊर्जेसारखा पर्यावरणपूरक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे पण फार कमी लोक ह्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करतात. आता वेळ आली आहे की आपण पारंपरिक नैसर्गिक संसाधनांवरचा भार हलका करून पर्यावरणपूरक इंधनाचा विचार केला पाहिजे. भारतात पावसाचे काही महिने सोडल्यास प्रचंड प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध असते आणि आपण ह्या शक्तीचा अमर्याद स्रोत वाया घालवतो आहोत. अर्थात लोकांमध्ये हळूहळू सौर ऊर्जेविषयी जागरूकता वाढत आहे आणि लोक सोलर हिटर, सोलर बल्ब, सोलर पम्पसारख्या पर्यायांकडे वळू लागले आहेत. मुंबईच्या फिजियोथेरपीस्ट आणि पिलाटीज ट्रेनर डॉक्टर रीमा ल्युईस ह्यांनी मात्र सौरऊर्जेकडे वळून त्यांचे विजेवरील अवलंबित्व खूप कमी केले आहे. त्यांनी त्यांच

न्यूज अपडेट :- हाथरस मधील वाल्मिकी समाजाचा निर्णय; ५० कुटुंबांनी स्वीकारला बौद्ध धर्म:

न्यूज अपडेट :- हाथरस मधील वाल्मिकी समाजाचा निर्णय; ५० कुटुंबांनी स्वीकारला बौद्ध धर्म: नवी मुंबई (बातमी/गाझियाबाद) :- संपूर्ण भारत देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनेचे तीव्र सामाजिक पडसाद उत्तर प्रदेशात पाहायला मिळत आहेत. गाझियाबादमधल्या करहेडामधल्या वाल्मिकी समाजातल्या ५० कुटुंबांनी धर्मांतर केलं आहे. एकूण २३६ जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू २ दिक्षा घेतली. हाथरस प्रकरणामुळे अतिशय दु:ख झाल्याची भावना बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या वाल्किमी कुटुंबांनी व्यक्त केली. 'आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. आर्थिक विवंचनेचा सामना करत असूनही प्रकरणांची सुनावणी घेतली जात नाही,' अशी व्यथा बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या कुटुंबीयांनी मांडली. या कुटुंबांना भारतीय बौद्ध महासभेकडून एक प्रमाणपत्र देण्यात आलं. आमच्या गावातल्या ५० कुटुंबांमधल्या २३६ जणांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याचं बीर सिंह यांनी सांगितलं. 'बौद्ध धर्म स्वीकारण्यांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. त्यांनी यासाठी कोणतंही शुल्क घेतले

न्यूज अपडेट :- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही..!!

न्यूज अपडेट :- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही..!! नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- अखेर भाजपमधील आणखी एका नाथाने पक्ष सोडून जाण्याचे जाहीर केले. खरं तर राजकीय पक्षाच्या जीवनात नेते जाणे-येणे सुरूच असते. मात्र खडसे यांचे भाजपातून जाणे रावसाहेब दानवे म्हणतात इतके सहज आणि सोपे घेण्यासारखे नाही. ही गोष्ट आज दानवे जाणून असले तरी त्यांना ती खुलेपणाने मान्य करणे शक्य नाही. कारण ते आज जरी सुपात असले तर उद्या जात्यात असतील, अशीच स्थिती आहे. असो. खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही, असा आव आणणारे केशव उपाध्ये यांचेच बघाना हेच उपाध्ये गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या आगेमागे करायचे. बरं या अशा नेत्यांची पार्श्वभूमी काय…त्यांनी पक्षासाठी किती आणि कुठे, कशी झीज केली, त्यांचा जनाधार काय या गोष्टींना भाजपात आता महत्व राहिले नाही. मुंबई वगळता ज्याची राज्यात कुठेही ओळख नाही, त्याला विधानपरिषद विरोधी पक्षनेता, ज्यांनी आयुष्यात कधीही थेट निवडणूक लढविली नाही ( कोथरूडचा अपघात वगळता ) अशा

"Health Tips" : श्वास नलिकेची सूज होईल क्षणात गायब; श्वास घेण्यास त्रास होत असेल तर उपयोगी पडतील हे घरगुती उपाय:

"Health Tips" : श्वास नलिकेची सूज होईल क्षणात गायब; श्वास घेण्यास त्रास होत असेल तर उपयोगी पडतील हे घरगुती उपाय: आरोग्यवर्धक : खरच तुम्हाला श्वास घेताना त्रास होत आहे का? यावर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्ही योग्य पद्धतीने केल्यास अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. श्वासा संबंधीचा सर्व त्रास हे उपाय केल्यास अगदी क्षणात गायब होऊन जाईल. काही लोकांना श्वासाचा त्रास असतो की एखादे छोटेसे घरी काम केले किंवा वीस-पंचवीस पायऱ्या चढत आले किंवा थोडेसे पळाले तरी देखील खूपच दम लागत असतो. श्वास खूपच जोरात घ्यावा लागतो. कधी थोडेसे सोपे शब्द काम केले तरीदेखील श्वासोश्वास वाढणे म्हणजेच कमजोर फुप्फुस असणे असा त्याचा अर्थ असा होतो. असे बरेचदा एखाद्या व्हायरल इन्फेक्शन मुळे देखील होत असते. आशा आजारांसाठी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे परंतु आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत ते देखील वापरवून बघा. अद्रकचा चहा करून पिणे: अद्रक का मध्ये एंटी-इम्प्लिमेंट्री, एंटी-व्हायरल आणि एंटी-बॅक्टेरीयल गुण असतात, ह्या चहाचे सेवन केल्यास तुमच्या श्वासनलिकेची

न्यूज अपडेट : राज्यात अति मुसळधार पाऊस कोसळणार या भागात; कमी दाबाच्या पट्ट्याचं सावट:

न्यूज अपडेट : राज्यात अति मुसळधार पाऊस कोसळणार या भागात; कमी दाबाच्या पट्ट्याचं सावट: राज्यावर कमी दाबाच्या पट्ट्याचं सावट, सर्वत्र मुसळधार पाऊसाचा इशारा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, आणि दक्षिण कोकण आणि गोवा ते अति मुसळधार पाऊस कोसळणार. नवी मुंबई (बातमी/अशोक वाघमारे) : बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा ताशी १७ किलोमीटर वेगाने पुढे सरकत असून, त्याचा परिणाम म्हणून बुधवार, गुरुवार दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. १४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस, कर्नाटकचा किनारी प्रदेश तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मराठवाडाच्या व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्

न्यूज अपडेट : चार वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातील इमारतीत:

न्यूज अपडेट : चार वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातील इमारतीत: नवी मुंबई (बातमी/रबाळे) :- रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील बाळाराम वाडी घनसोली येथे 18 सप्टेंबर रोजी एक अल्पवयीन मुलगा ओंकार वय 4 वर्ष हा राहत्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून सात ते आठ मिनिटांमध्ये हरविलेला होता. त्यानंतर दोन तासानी ओमकार याचा मृतदेह त्याच्या राहत्या इमारतीच्या पाठीमागे एका सुतळी गोणीमध्ये मिळून आला होता. त्याबाबत रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 263/2020 कलम 302, 363, 201भा. द. वि.  नोंद करण्यात आला आहे.  घटनास्थळी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे, तपासादरम्यानचे भौतिक पुरावे, वेळेचा तपशील, मयत मुलाच्या सवयी, इमारतीमधील झडती मध्ये मिळून आलेल्या संशयीत  वस्तू यावरून गुन्हयातील  मयत मुलाच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी वय वर्ष 17 हीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशय निर्माण झाला होता. सर्व तांत्रिक बाबी, भौतिक पुरावे परिस्थितीजन्य पुरावे हे ही नमूद अल्पवयीन मुलीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दर्शवत होते. परंतु नमूद अल्पवयीन मुलगी कोणतीही माहिती देत नव्हती. सदरचा गुन्हा घडल्यापास

न्यूज अपडेट :ऑनलाईन परीक्षेची नवी तारीख जाहीर;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली..!

न्यूज अपडेट :ऑनलाईन परीक्षेची नवी तारीख जाहीर;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली..! नवी मुंबई (बातमी/पुणे) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मंगळवारी ( 13 ऑक्टोबर ) होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता . त्यानंतर तांत्रिक अडचणी मिटल्या असून , रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी ( 17 ऑक्टोबर ) होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे . ( Savitribai Phule Pune University online exams problems ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली . परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचं दिसून आलं . त्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंळवारीसुद्धा ( 13 ऑक्टोबर ) परिस्थिती सारखीच राहिली . विद्यापीठाने मंगळवारी 5 विषयांच्या परीक्षेचे आयोजन केले होते . पण ऐनवेळी ओटीपी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला . त्यांना परीक्षेला बसता आले नाही . यावेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे परीक्षा रद्द

न्यूज अपडेट : नागपूर दीक्षा भूमीवरील ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यावेळेस साधेपणानेच साजरा:

न्यूज अपडेट : नागपूर दीक्षा भूमीवरील ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यावेळेस साधेपणानेच साजरा: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य सोहळ्यासह सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नवी मुंबई (बातमी/नागपूर) :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य सोहळ्यासह सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी दीक्षाभूमीचे सर्व गेट बंद राहतील. तेव्हा अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी करू नये, अशी माहिती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डाॅ. सुधीर फुलझेले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. १४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी दिनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता पूज्य महाास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून या वर्षी देखील येत्या २५ ऑक्टोबर रोजी अशोक विजयादशम