न्यूज अपडेट :ऑनलाईन परीक्षेची नवी तारीख जाहीर;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली..!
न्यूज अपडेट :ऑनलाईन परीक्षेची नवी तारीख जाहीर;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली..!
नवी मुंबई (बातमी/पुणे) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मंगळवारी ( 13 ऑक्टोबर ) होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता . त्यानंतर तांत्रिक अडचणी मिटल्या असून , रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी ( 17 ऑक्टोबर ) होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे . ( Savitribai Phule Pune University online exams problems )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली . परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचं दिसून आलं . त्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंळवारीसुद्धा ( 13 ऑक्टोबर ) परिस्थिती सारखीच राहिली . विद्यापीठाने मंगळवारी 5 विषयांच्या परीक्षेचे आयोजन केले होते . पण ऐनवेळी ओटीपी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला . त्यांना परीक्षेला बसता आले नाही . यावेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले . मंगळवारी ( 13 ऑक्टोबर ) रद्द केलेल्या परीक्षा आता शनिवारी ( 17 ऑक्टोबर ) होणार आहेत.
ऑनलाईन परीक्षेचा फज्जा पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ ऊडतोय . विद्यार्थ्यांना ऐनवेळी लॉगीन आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याचे प्रकार समोर आले आहेत. अचानक काही अडचण आली तर , विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिले आहेत . मात्र , फोन केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचं विद्यार्थांकडून सांगण्यात येत आहे .
पुणे विद्यापीठाने आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत . इंग्रजी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात आला . तर काही विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड उशीराने मिळाला . मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स विषयांच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना आकृत्या स्पष्ट दिसत नव्हत्या . त्यामुळे विद्यार्थ्यांना 10 प्रश्न सोडवता आले नाही . ऑफलाईन परीक्षेतही गोंधळ पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली . मात्र , पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झाल्याचं दिसलं.
विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट घेण्यासाठी आवश्यक असणारा ओटीपी न मिळाल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा ठप्प झाली . सकाळी 10 चा पेपर दुपारी 12 ला सुरु झाला . दरम्यान , राज्यभरात ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ उडाल्याचं दिसून आलंय . पुण्यासोबच , औरंगाबाद , मुंबई विद्यापीठातही सारखीच परिस्थिती आहे . त्यामुळे कोरोना महामारीत ऑनलाईन परीक्षेचे केलेले नियोजन पुरते बारगळल्याचे विद्यार्थी संघटनांकडून म्हटले जात आहे . तसेच पुणे विद्यापीठात परीक्षेच्या गोंधळाची चौकशी व्हावी , अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे .
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.