Skip to main content

न्यूज अपडेट :- अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचा नेरूळ विभागात अचानक पाहणी दौरा..!

न्यूज अपडेट :- अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचा नेरूळ विभागात अचानक पाहणी दौरा..!



नवी मुंबई (प्रतिनिधि) :- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथीलता आणत विविध सेवांवरील निर्बंध खुले करण्यात आलेले असून नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी असा उत्सवी कालावधी लक्षात घेता संसर्गातून पसरणारा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी कमालीची सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अद्याप कोव्हीड 19 रोगावर कोणतीही लस अथवा औषध सापडलेले नसल्याने मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हीच खरी बचावाची ढाल आहे. तथापि नागरिकांकडून याबाबत तितकेसे गांभीर्य राखले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत.


या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी प्रशासन व परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत नेरूळ विभागातील विविध ठिकाणच्या मार्केट भागाला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली.


अतिरिक्त आयुक्तांच्या या पूर्वसूचना न देता केलेल्या अचानक पाहणी दौ-यामुळे तेथील विक्रेते आणि नागरिकांची एकच गडबड उडाली. या दौ-यात मास्क न घालता वावरणा-या नागरिकांशी संवाद साधत अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांना मास्कचे महत्व सांगत समज दिली तसेच दुकानदारांनाही मास्क न घालता येणा-या नागरिकांना दुकानात प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याकडेही लक्ष देण्याचे सूचित केले.


सेक्टर 1 नेरूळ, शिरवणे मार्केट तसेच नेरूळ स्टेशन लगतच्या परिसरातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करीत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त श्री. अनुप डेरे यांना दूरध्वनी करून मार्केट परिसरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण आणणेबाबत त्वरित व नियमित कारवाईचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे मास्क, सोशल डिस्टिन्सींग असे सुरक्षेचे नियम न पाळता सार्वजनिक आरोग्य हिताला बाधा आणणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना केल्या. अशाच प्रकारच्या सूचना इतर सर्व विभाग अधिका-यांना द्याव्यात असेही अतिरिक्त आयुक्तांनी परिमंडळ उपआयुक्तांना सूचित केले.


सध्या उत्सव कालावधी असला तरी कोरोना प्रसाराचा धोका ओळखून नागरिकांनी उत्सव साजरे करताना आरोग्य सुरक्षेच्या बाबींचे काटेकोर पालन करावे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या आवाहनास अनुसरून आपल्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही याची नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करून काळजी घ्यावी असे या पाहणी दौ-यादरम्यान अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सूचित केले. 


 


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे