न्युज अपडेट : ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; घरगुती गॅसच्या किंमतीत घसरण या आहेत नवीन किंमती:
नवी मुंबई (बातमी/कोल्हापुर) :- गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्या आहेत. सध्याची सिलिंडरची किंमत ५९७ रुपये आहे. तुम्हाला माहीत नसेल पण जर या किंमतीपेक्षा जास्त जर दर गेले तरच ग्राहकांना अनुदान दिले जाते. आणि यामुळेच चार महिने झाले अनुदान बंद करण्यात आले आहे
अनुदान बंद का झाले? हे अजूनही काही जणांना माहीत नव्हते. देशात गॅसची किंमत कमी व्हावी म्हणून आंदोलने सुरू आहेत. गॅसचा मूलभूत दरही कमी झाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
अनुदान बंद का झाले? हे अजूनही काही जणांना माहीत नव्हते. देशात गॅसची किंमत कमी व्हावी म्हणून आंदोलने सुरू आहेत. गॅसचा मूलभूत दरही कमी
झाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
एप्रिलपासून गॅसच्या मूलभूत दरात वाढ झालेली नाही. सध्या गॅसचा दर ५९७ रुपये आहे. यापेक्षा जास्त जर दर झाला म्हणजे ७०० रुपये दर झाला तरच ग्राहकांच्या खात्यावर १०३ रुपये अनुदान जमा होते.
ग्राहकांना वर्षाला १४.५ किलोच्या १२ सिलिंडरवर अनुदान दिले जाते. एखाद्याला त्याच्यापेक्षा जास्त गॅस लागत असेल तर त्यांना विनाअनुदानित गॅस सिलिंडर घ्यावा लागेल. महिन्याला सुमारे ६ कोटींपर्यंत अनुदान मिळत होते पण गॅस सिलिंडरचे दरच कमी झाल्याने सध्या अनुदान जमा होत नाही.
मूलभूत दरापेक्षा गॅसची किंमती वाढल्या तरच अनुदान जमा होते. जेवढा दर वाढेल तेवढा दर हा ग्राहकांच्या खात्यात अनुदान म्हणून जमा होतो. गॅसचे दर वाढले तर अनुदान जमा होईल अशी माहिती एचपीसी गॅस विक्री अधिकारी आदित्य यांनी दिली आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.