Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

न्यूज अपडेट : आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थे अंतर्गत गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ:

न्यूज अपडेट : आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थे अंतर्गत गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ: पनवेल (रुपाली वाघमारे) :- लहानपणा पासुनच मुलांच्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि गड किल्ल्या विषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे दिवाळी निमित्त गडकिल्ले स्पर्धा विभाग व तालुका स्थरावर आयोजीत केल्या जातात . याचेच औचित्य साधून पनवेल नेरे - दूंदरे विभागातील गडकिल्ले बनविलेल्या स्पर्धकांना आज २९ नोव्हेंबर रोजी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस, भानघर येथे सन्मानित करण्यात आले . किल्ले स्पर्धेतील विजयी झालेले स्पर्धक: प्रथम क्रमांक  - केतन ईश्वर ढोरे (करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस, भानघर) द्वितीय क्रमांक - यश संदीप माळी (उमरोली) तृतीय क्रमांक - विनोद गंगाराम फडके (विहिघर) यावेळी उपस्तिथ मान्यवरांमध्ये संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. भारत दादा भोपी, पनवेल तालुका अध्यक्ष व युवा व्याख्याते कु. विवेक परशुराम भोपी, नेरे विभाग अध्यक्ष कु. प्रदीप पाटील, वावंजे विभाग अध्यक्ष प्रमेय फडके, विश्वास पाटील शिवनसई, काळुराम द

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरुन महिलेने मारली उडी..!!

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरुन महिलेने मारली उडी..!! नवी मुंबई (प्रतिनिधि/अक्षय तांडेल) :- रविवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:४० च्या दरम्यान वाशी खाडी पुलावरुन मध्यभागी एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे असा नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला. त्यावरून वाशी पोलिस ठाणे बीट मार्शल-१ चे कर्मचारी, वाशी चेक पोस्ट वरील पोउनि गुरव व कर्मचारी, सागरी सुरक्षा शाखेचे कर्मचारी यांनी लगेचच तत्परतेने स्थानिक मच्छीमार जीव रक्षक महेश अशोक सुतार वय ३७ वर्ष रा. वाशी गाव यांचे स्वतःच्या मालकीच्या फिशिंग बोटच्या मदतीने समुद्रात जाऊन पाण्यात बुडणाऱ्या महिलेस पाण्यात उडी मारुन महिलेस पाण्यातून वाचवून बोटीतून बाहेर आणले.  सदर महिलेकडे चौकशी करता तिचे नाव हिराबेन लक्ष्मीदास कटरमल (भानुशाली) वय ४५ वर्ष, रा. ठि. हिमालय सोसा. असल्फा, घाटकोपर असे सांगून तिच्या मुलीस वाशी येथे भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. सदर वेळी पुलावरून फुले टाकताना चक्कर आल्याने पाण्यात पडल्याचे सांगितले. सदर महिलेचे नातेवाईक हिरज कानजी कटारमल (भानुशाली) वय ४३ वर्ष पो.ठाण्यात हजर झाले असता त्यांनी सदर महिला त्यांच्याकडे को

न्यूज अपडेट : बृहन्मुंबई महानगरपालिके कडुन मास्कचा वापर न करणर्यान कडुन इतका दंड वसूल..!!!

न्यूज अपडेट : बृहन्मुंबई महानगरपालिके कडुन मास्कचा वापर न करणर्यान कडुन इतका दंड वसूल..!!! ● मास्क न घालता फिरणार्यावर बृहन्मुंबई महानगरपालिके कडुन कडक कारवाई करण्यात आली आहे.  ● १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल आणि दंड घेवुन एक मास्क विनामूल्य देण्यात आला आहे. नवी मुंबई (बातमी/ मुंबई) :- कोरोना विषाणू प्रादुर्भाव  रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक असल्याने या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, विना मास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोव्हिड-१९ संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे आणि

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील कोविड-१९ टेस्टिंग सेंटर मधे घोटाळा; डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आले:

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील कोविड-१९ टेस्टिंग सेंटर मधे घोटाळा; डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आले: नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पुढच्या तपासासाठी उपायुक्त योगेश कडूसकर नेतृत्वात एका तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. नवी मुंबई (प्रतिनिधि/रुपाली वाघमारे) :- नवी मुंबईतील कोविड-१९ ची टेस्टिंग सेंटरमधील घोटाळा प्रकरणी शहराचे कोविड-१९ टेस्टिंग इन्चार्ज डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ही कारवाई केली आहे. यासोबतच पुढील तपासनीसाठी  आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून उपायुक्त योगेश कडूसकर नेतृत्वात एका ३ सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोरोना विषाणूचा प्रतिदिन प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तो रोखण्यास

न्यूज अपडेट : रंगचित्रांतून साकारल्या नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पना..!!

न्यूज अपडेट : रंगचित्रांतून साकारल्या नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पना..!! नवी मुंबई (प्रतिनिधि/किरण पवार) :- स्वच्छतेमध्ये लोकसहभागाचे महत्व अनन्यसाधारण असून प्रत्येक माणसाने स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जगण्याची नियमित सवय करून घ्यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये नवी मुंबईकरांच्या स्वच्छताविषयक कलात्मक जाणीवांना भक्कम व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व भित्तीचित्र / म्युरल्स स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजात ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दोन्ही स्पर्धांच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.  वंडर्स पार्क नेरूळ येथे संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी माजी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे उपस्थित होते. वंडर्स पार्क येथील चित्रकला स्पर्धेत १० ते १५ वयोगटातील ५७ तसेच १५ वर्षावरील ९ स्पर्धकांनी सहभागी होत

न्यूज अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभा मतदार संघ वाराणसीमध्ये दाखल होणार:

न्यूज अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभा मतदार संघ वाराणसीमध्ये दाखल होणार: नवी मुंबई (बातमी/दिल्ली) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा मतदारसंघ वाराणसीत दाखल होणार आहेत आणि राष्ट्रीय महामार्गच्या हंडिया (प्रयागराज) - रजतलाब (वाराणसी) या सहा लेन रुंदीकरणाच्या प्रकल्पाला देशाला समर्पित करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान, पंतप्रधान देव दीपावलीला उपस्थित राहतील, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोर प्रकल्पाची साइट भेट घेतील आणि सारनाथ पुरातत्व साइटला देखिल भेट देतील. नव्याने रुंदीकृत आणि सहा लेन केलेल्या एनएच-१९ च्या ७३ कि.मी. क्षेत्राच्या एकूण खर्चात २,४४७ कोटी रुपये खर्च झाला असून प्रयागराज ते वाराणसी दरम्यानचा प्रवास एक तासाने कमी करण्याची अपेक्षा आहे. वाराणसीत प्रकाश आणि उत्साहाचा जगप्रसिद्ध उत्सव बनलेला देव दीपावली हा कार्तिक महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला साजरा केला जातो.  महोत्सवाची सुरूवात पंतप्रधानांनी वाराणसीच्या राज घाटावर दीया लावून सुरू केली असून त्यानंतर गंगा नदीच्या दोन्ही बाजूंना ११ लाख दिवे लावण्यात येणार आहेत.  या भेटीदरम्यान पंतप्रधान बांधकाम सुरू

न्यूज अपडेट : पनवेलने येथे ६१,६८,३२० किंमती गुटखा लक्झरी बस, टेम्पोसह हस्तगत करण्यात आला: 

न्यूज अपडेट : पनवेलने येथे ६१,६८,३२० किंमती गुटखा लक्झरी बस, टेम्पोसह हस्तगत करण्यात आला:  ● नशामुक्ती अभियानांतर्गत गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलने केली लक्झरी बससह टेम्पोवर कारवाई. ● ६१,६८,३२० किंमतीच्या गाड्यांसह गुटखा हस्तगत करण्यात आला. पनवेल (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्था विरोधात कठोर कारवाई करण्या बाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत केला आहे. महाराष्ट्र मध्ये गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री करणारी अंतराज्य टोळी बाबत माहिती गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलला प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड,  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे, पोलीस हवालदार सुनील साळुंखे, सचिन पवार, पोलीस नाईक सुनील कुदळे, चेतन जेजुरकर , इंद्रज

न्यूज अपडेट : नेरूळ येथील तुटलेल्या नाल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका; महापालिका आयुक्तांना दिले निवेदन:

न्यूज अपडेट : नेरूळ येथील तुटलेल्या नाल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका; महापालिका आयुक्तांना दिले निवेदन: ● नेरुळ येथे तुटलेल्या नाल्याचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर दुरुस्त करावे ● नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन विरेंद्र म्हात्रे यांनी दिले निवेदन नवी मुंबई (प्रतिनिधि/उमेश खांदेकर) :- नेरूळ येथील सेक्टर २० विभागामधील माजी नगरसेवक  नामदेव रामा भगत यांच्या ऑफिसच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर नाल्याची सद्यस्थितीत तुटलेल्या अवस्थेत आहे. या फुटपाथ वरून रोज नागरिकांची व लहान मुलांची ये-जा चालू असते वृध्द वेक्ती देखिल त्या रस्त्यावरुण येत जात असतात जर चुकून कोणत्याही नागरिकाचा तोल गेल्यास ती वेक्ती नाल्यात पडून गंभीर पणे जखमी होण्याची शक्यता पुढे नाकारता येत नाही. तरी पालिका प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देवून सदर नाल्याची दुरुस्तीचे आदेश संबंधितांना देऊन योग्य ती कारवाई करावी. तसेच, या बद्द्लचे विंनती काळजीचे निवेदन नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे.         महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या

न्यूज अपडेट : नवी मुंबईत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान:

न्यूज अपडेट : नवी मुंबईत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान: ● १ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीत “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान” नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार ● २९१ पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे, ● १,०१,६९८ घरातील ३,४२,६४५ लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार नवी मुंबई (रूपाली वाघमारे)  :- समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधून त्यांना उपचाराखाली आणणे तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने  केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीत “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान” नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर याच्या मार्गदर्शनाखाली, ही मोहीम राबविण्यात येत असून याकरिता २९१ पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. ही पथके १,०१,६९८ घरातील ३,४२,६४५ लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत तसेच कुष्ठरोग

न्यूज अपडेट : तुर्भे नवी मुंबईत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात  साजरी:  

न्यूज अपडेट : तुर्भे नवी मुंबईत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात  साजरी:   नवी मुंबई (प्रतिनिधि/सिमा धस) :-  राष्ट्रप्रेमी लोकांनी एकत्र येऊन मोठ्या थाटा माटात ब्रिटिशांन विरोधात लढा देणार्या टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळीस हिंदू, बौद्ध, मुस्लिम  बांधव उपस्तिथ होते. मान्यवरांनी यावेळेस सांगीतले सर्व बांधवानी एकत्रीत बंधुत्वाने राहुन जगात भारत देशाचे नाव गाजवुया हेच.       महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : रेल्वे स्थानकात कुल्हडमध्येच चहा ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल..!!

न्यूज अपडेट : रेल्वे स्थानकात कुल्हडमध्येच चहा ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल..!! नवी मुंबई (बातमी/जयपूर) :- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच चहा मिळणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. प्लास्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल, स्टेशनवर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद होणार असल्याचं ते म्हणाले. राजस्थानच्या अलवरमध्ये ढिगावडा-बांदीकुई रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण उद्घाटन सोहळ्यात गोयल यांनी ही घोषणा केली. सध्या देशात जवळपास ४०० रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधूनच चहा दिला जातो. येत्या काळात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधूनच चहाची विक्री केली जाईल, अशी योजना आहे. प्लास्टिक मुक्त भारतमध्ये रेल्वेचं हे योगदान असणार आहे. तसंच या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही गोयल म्हणाले. आधीच्या काळात रेल्वे स्थानकांत कुल्हडमधूनच चहा दिला जात होता. ज्यावेळी २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आलं, तोपर्यंत कुल्हड गायब झाले होते आणि प्लास्टिक कपमध्ये चहा देण्यास सुर

न्यूज अपडेट : पोलादपूर तुर्भे येथील नवसाला पावणारे लक्ष्मीनारायण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले:

न्यूज अपडेट : पोलादपूर तुर्भे येथील नवसाला पावणारे लक्ष्मीनारायण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले: नवी मुंबई (रुपाली वाघमारे) :- पोलादपूर तुर्भे येथील नवसाला पावणारे लक्ष्मीनारायण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे, आघाडी सरकारने दर्शनासाठी मंदिरे खुली केल्यानंतर नवी मुंबईहून समाजसेवक मिलिंद खारपाटील तसेच रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य- अरविंद पाटील हे पंढरपूर तसेच शिर्डी सारख्या प्रसिद्ध ठिकाणी दर्शनासाठी न जाता पोलादपूर तालुक्यातील तुर्भे (बुद्रुक )येथील नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असलेले श्री लक्ष्मी नारायण मंदिरास भेट दिली. यावेळी  संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे असे गाऱ्हाणे लक्ष्मीनारायण देवतेला घालण्यात आले. मिलिंद खारपाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानताना कोरोना महामारीमुळे आपल्यावर आलेले संकट आणि आपल्याला लक्ष्मी नारायण देवतेच्या नामस्मरनातून आलेली प्रचिती सांगताना सगळे भाविक भावुक झालेले दिसत होते. ग्रामस्थ जेष्ठ नागरिक हभप  चंद्रकांत दादा शिंदे, अमृता वाडकर, लक्ष्मी नारायण मंदिर कमिटी चे सेक्रेटरी माननीय  रत्नकांत शिंदे यांनी मंदिराचे महात्म्य आणि ग्राम

न्यूज अपडेट : मोदींच्या दो गज दूरी मंत्राला,भाजपा कडूनच वाटाण्याच्या अक्षता:

न्यूज अपडेट : मोदींच्या दो गज दूरी मंत्राला,भाजपा कडूनच वाटाण्याच्या अक्षता:   नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- गेल्या ८ महिन्यांच्या काळात संपूर्ण देशात कोरोना विषाणूने कहर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कोरोना संक्रमणाला संदर्भात चिंता व्यक्त करत आले आहेत.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या मनोगतात, दो गज की दूरी, बहुत है जरूरी, असे आवाहन देशवासीयांना सातत्याने करत असतात. गेल्या पंधरा दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दो गज दूरी मंत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे. बिहार निवडणुकीनंतर दिल्लीत भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या विजय  मेळाव्यात प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली, या मेळाव्याला स्वतः नरेंद्र मोदी उपस्थित होते. मात्र, त्यांना विजयोत्सव मेळाव्यात मोदींना दो गज दूरी मंत्राचा विसर पडला. आजही असाच प्रकार घडला आहे.हैदराबाद महानगरपालिकेच्या भाजप उमेदवार निवडणूक प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबादला आले.शहांच्या उपस्थितीत

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका..!!!

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका..!!! नवी मुंबई (प्रतिनिधि/रुपाली वाघमारे) :- मुंबईच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नियोजित असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाचे आदेश अखेर एमएसआरडीसीने दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर २०२३ पर्यंत असून यासाठी ७७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाला सुरुवातही झाली असून तीन वर्षांनंतर वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. हा पूल गेली अनेक वर्षे नियोजित होता. कामात अनेक अडथळे आल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नव्हते. सुरुवातीला कांदळवनाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पुलामुळे सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवन नष्ट होणार असल्याने पुलासाठी परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर तेवढेच कांदळवन दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वन विभागाने रस्ते विकास महामंडळाला  परवानगी दिली होती. त्यानंतर मार्गदर्शक सूचनांसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने १९ डिसेंबर रोजी परवानगी दिली होती. त्यानंतर कांदळवन लागवडीसाठी बोरीवली एरंगल येथे वन विभागाची जागा हस्तांतरित झाल्यानंतर या पुलाच

न्यूज अपडेट : सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी;कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण:

न्यूज अपडेट : सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी;कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण: ● उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली.  ● पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. नवी मुंबई (मुंबई-प्रतिनिधि/अशोक वाघमारे) :- राज्यात वाढीव वीज बिलावरुन विरोधकांनी रान उठवलं आहे. मनसे तर आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे. अशातचं एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया फोलो करणं आवश्यक होतं. तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचे वीज देयके कुणाला जास्त आले असेल तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर 2 टक्के सवलत देऊ अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचे

न्यूज अपडेट : मुंबई उच्च न्यायालयाने लक्ष्मी विलास सहकारी बँकेच्या विलनीकरनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली:

न्यूज अपडेट : मुंबई उच्च न्यायालयाने लक्ष्मी विलास सहकारी बँकेच्या विलनीकरनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली: नवी मुंबई (बातमी -मुंबई/प्रतिनिधि) :- आर्थिक संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास सहकारी बँकेच्या समभागधारकांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. आरबीआयचा निर्णय हा खातेधाराकांच्या हितासाठीच आहे, असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं. लक्ष्मी विलास बँकेचे सिंगापूरच्या डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विलनीकरणाला बँकेच्या समभागधारकांनी (प्रमोटर्स) हायकोर्टात आव्हान दिले असून विलनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं बँकेच्या प्रमोटर्सना दिलासा देण्यास नकार देत विलनीकरनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. आरबीआयने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचे आदेश दिले असून मंत्रीमंडळाने तसा निर्णयही घेतला आहे. मात्र बँकेच्या समभागधारकांनी याला विरोध दर्शवला हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या

न्यूज अपडेट : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवाळी नंतर पुन्हा वाढताना..।।

न्यूज अपडेट : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवाळी नंतर पुन्हा वाढताना..।। नवी मुंबई (प्रतिनिधि/अशोक वाघमारे) :- देशात दिवाळी नंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी संचारबंदी लावण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शाळा आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या पुन्हा कमी करण्यात आली आहे. सरकारने हळूहळू नियम शिथिल केले आहेत. मात्र, असे असले तरी मोठ्या प्रमाणात नागरिक लग्नसोहळ्यात सहभागी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता घेता प्रत्येक राज्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी दिली आहे. राजस्थानमध्ये कलम १४४ लागू:  राजस्थान सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २१ नोव्हेंबरप

न्यूज अपडेट : चक्रीवादळ संपलेल नाही; पृथ्वीवर आणखी दोन आधुनिक हवामान प्रणाली:

न्यूज अपडेट : चक्रीवादळ संपलेल नाही; पृथ्वीवर आणखी दोन आधुनिक हवामान प्रणाली: नवी मुंबई (बातमी/चेन्नई) :- चक्रीवादळ निवाराने आतापर्यंत हंगामात ३६% पेक्षा जास्त पाऊस पडला आहे, परंतु हवामानातील लोकांचे म्हणणे आहे की, डिसेंबर महिन्यात संपलेल्या ईशान्य पावसाळ्याचा सक्रिय टप्पा उरला नाही.  ते म्हणाले, बंगालच्या उपसागरात पुन्हा-पुन्हा-परत हवामान प्रणाली तयार होऊ शकते ज्यामुळे शहरात आणि राज्यातील बर्‍याच भागात जास्त पाऊस पडेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अंदाज दिला आहे की २९ नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. टीएन किनार्यावर धडक मारण्यापूर्वी ते चक्रीवादळाच्या वादळाच्या तीव्रतेने वाढण्याची शक्यता आहे.  त्यानंतर ११ डिसेंबरपर्यंत आणखी एक यंत्रणा तयार होऊ शकेल आणि ती राज्याच्या दिशेने जाईल.  गुरुवारी, आयएमडीने सांगितले की, २९ नोव्हेंबरच्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचे क्षेत्र तयार होईल. ते अधिक चिन्हे बनून पश्चिम दिशेने दक्षिण तामिळनाडूच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.  आयएमडी एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटरचे संचालक एन पुविरसन यांनी सांगितले की ते या विका

न्यूज अपडेट : नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय; एपीएमसीमध्ये कोविड -१९ ची सखोल चाचणी: 

न्यूज अपडेट : नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय; एपीएमसीमध्ये कोविड -१९ ची सखोल चाचणी: नवी मुंबई (प्रतिनिधि/सीमा धस) :- नवी मुंबई नवी मुंबई शहरातील एपीएमसीच्या सर्व बाजारपेठांमध्ये लवकरच सखोल कोविड -१९ चाचणी केंद्रे सुरू केली जातील. असे महानगरपालिकेने झालेल्या बैठकीत सांगण्यात आलेले आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले, “सर्व एपीएमसी विभागांमध्ये, विशेषत: भाजीपाला आणि फळांच्या बाजारपेठेत वाढती गर्दी झाल्याचे वृत्त आपल्याला प्राप्त होत असल्याने आम्ही सर्व एपीएमसी मार्केटमध्ये कोविड -१९ व ची सामूहिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.           महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : पनवेलकरांना दिलासा; तांत्रिक अडचणीत अडकलेला ४०८ कोटींचा अमृत पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा..!!

न्यूज अपडेट : पनवेलकरांना दिलासा; तांत्रिक अडचणीत अडकलेला ४०८ कोटींचा अमृत पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा..!! ● निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून महिन्याभरात कामाला सुरुवात होणार  ● कामाचा कालावधी ३० महिन्यांचा असल्याने पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना ‘अमृत’चे पाणी मिळणार ● २५ किलोमीटर लांबीच्या विविध जलवाहिन्यांमध्ये ९६५ व १९५० मीलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा करणार  पनवेल (प्रतिनिधि/प्रदीप पाटील) :- मागील ४ वर्षांपासून तांत्रिक अडचणीत अडकलेली ४०८ कोटींची पनवेलच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. या कामाचा कालावधी ३० महिन्यांचा असल्याने पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना ‘अमृत’चे पाणी मिळणार आहे. पनवेल शहरवासियांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी ४०८ कोटींच्या अमृत पाणी पुरवठा योजना पालिकेने आखली आहे. मात्र प्रत्यक्षात यायोजनेचे काम सुरू होत नव्हते. कधी कंत्राटदाराची पात्रता तर कधी निविदेची क्षमता एवढेच नव्हेतर विविध प्राधिकरण पनवेल व उरण

न्यूज अपडेट : भीमआर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेशचा अभिनव उपक्रम:

न्यूज अपडेट : भीमआर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेशचा अभिनव उपक्रम: पनवेल (प्रतिनिधि/दीपा वाघमारे) :- २६ नोव्हेंबर संविधान गौरव निमित्त महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात भीमआर्मी ने वेगवेगळे उपक्रम राबवले. त्याच वेळी मुंबई येथे चैत्यभूमी वर जाऊन भीमआर्मी महाराष्ट्र व मुंबई टिमने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भीमआर्मीचे महाराष्ट्र प्रभारी यांनी तिरंगा फडकावून "सशक्तभारत- जाती मुक्त भारत" या अभियानची सुरवात केली. चैत्यभूमी येथे भीमआर्मी महाराष्ट्र प्रभारी मा. दत्तू मेढे जी व महाराष्ट्र प्रदेश प्रमुख मा. नेहाताई शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मा. नेहाताई शिंदे यांनी संविधानातील  प्रास्ताविकेचे वाचन केले. मुंबई अध्यक्ष दिपक हनवते यांनी महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे जी यांना संविधान देऊन संपुर्ण टिमतर्फे त्यांचे स्वागत केले.    चैत्यभूमी वर उपस्थित असलेल्या महिला पोलिस कर्मचारी यांना महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे कोषाध्यक्षा मंगलाताई गायकवाड, मुंबई अध्यक्ष दिपक हनवते, प्रियांका वाघमारे यांनी संविधानातील उद्दे

न्यूज अपडेट : नवी मुंबईत आंतरराज्यीय वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, ५ जणांना अटक:

न्यूज अपडेट : नवी मुंबईत आंतरराज्यीय वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, ५ जणांना अटक: ● कॉर्पोरेट कंपनी व हॉटेल मध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने ती पारराज्यात परस्पर विक्री करुन वाहन मालकाची फसवनुक केली जात होती. ● या प्रकरणात सुमारे २ कोटी २० लाख किंमतीची वाहने जप्त केली आहेत आणि मुख्य आरोपींसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई (बेलापुर/रुपाली वाघमारे) :- २७ नोव्हेंबर रोजी बेलापूरमध्ये नवी मुंबई पोलिसांनी माध्यमांना संबोधित केले.  गुन्हे शाखेच्या केंद्रीय युनिटने १.२१ करोड किंमतीची २० वाहने जप्त केली आहेत तर ८१ लाख किंमतीची ९ वाहने गुजरात पोलिसांनी जप्त केली आहेत कारण ती विविध गुन्ह्यांमध्ये वापरली जात होती. (बच्चन कुमार /एचटी) आपण चित्रपटात जे पाहत आहात त्याप्रमाणेच, नवी मुंबई गुन्हे शाखेने एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला, ज्यात लोकांची वाहने कॉर्पोरेट घरे आणि हॉटेल्समध्ये भाड्याने देऊन त्यांची फसवणूक केली. या टोळीतील सदस्यांना सापळा रचण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या गृहनिर्माण संस्था आणि हॉटेलमध्ये भाडेकरू आणि वेटर म्हणून गुपित केले.  या टोळीने बोगस कंपन्या उ

न्यूज अपडेट : सातारा वडूजवरुन मुंबईकडे नीघालेल्या एस टी बसचा भीषण अपघात;१ ठार, १५ जखमी:

न्यूज अपडेट : सातारा वडूजवरुन मुंबईकडे नीघालेल्या एस टी बसचा भीषण अपघात;१ ठार, १५ जखमी: पनवेल (प्रतिनिधि/सूरज वाघमारे) :- पुणे-मुंबई एक्सप्रेस वे (Express Way) वर सातारा वडूज वरुण मुंबईकडे निघालेल्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला, तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत.  तसेच, हा अपघात मध्यरात्री २ च्या सुमारास झाला. अपघातग्रस्त बस सातारा येथून मुंबईच्या दिशेनं येत होती. पनवेल येथील कोन गावाजवळच्या एक्झिट मार्गावर असताना एका अवजड वाहनाने (Container) ने एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत बसचा एका बाजूचा पत्रा कापला गेला. अपघातातील मृत व्यक्ती हा मुंबईत बेस्टचा चालक असल्याची माहिती मिळत आहे. १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींममध्ये काही महिलां प्रवाशी यांचाही समावेश आहे.  अपघाताची माहिती मिळताच आयआरबीची यंत्रण व महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काहींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसटीचे पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर कर्मचारी रुग्णालय

न्यूज अपडेट :गूगल पे (Google Pay) सेवा जानेवारी 2021 पासून बंद; त्वरित पैसे हस्तांतरणासाठी शुल्क आकारले जाईल:

न्यूज अपडेट :गूगल पे (Google Pay) सेवा जानेवारी 2021 पासून बंद; त्वरित पैसे हस्तांतरणासाठी शुल्क आकारले जाईल: नवी मुंबई (प्रतिनिधि/रूपाली वाघमारे) :- गूगल आपल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल पे वरून पीअर-टू-पीअर पेमेंट सर्व्हिस (पी 2 पी पेमेंट सर्व्हिस) बंद करणार आहे.  ही सेवा जानेवारी 2021 पासून बंद केली जाईल. कंपनी या सेवेच्या बदल्यात इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम (आयएमपीएस) जोडेल, परंतु यासाठी वापरकर्त्यांना शुल्क भरावे लागेल.  मीडिया रिपोर्टनुसार कंपनीने या शुल्काबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.  सध्या, वापरकर्ते दोन्ही Google पे ॲप आणि pay.google.com प्लॅटफॉर्मच्या मदतीने पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम आहेत.  अशा परिस्थितीत आता गुगलने वापरकर्त्यांना नोटीस बजावली असून पुढील महिन्यात जानेवारीपासून त्याची वेब पेमेंट सेवा कार्य करणार नाही, अशी माहिती दिली आहे. तो म्हणाला, "2021 च्या सुरूवातीपासूनच, वापरकर्ते पे-जी. Com. प्लॅटफॉर्मवर भेट देऊन पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाहीत. त्यांना पैसे हस्तांतरित करण्यासाठी Google पे अ‍ॅप वापरावे लागेल." 3% डी 9t

न्यूज अपडेट : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा नक्की कोणाला इशारा; तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो"..!

न्यूज अपडेट : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा नक्की कोणाला इशारा; तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो"..! नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला असून संजय राऊत उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा या पलीकडे काय सांगणार असा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, ठिक आहे, हात धुतोय, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल असा इशारा त्यांनी या प्रोमोमधून दिलाय.  या प्रोमोमध्ये संजय राऊत मुख्यमंत्र्यांना हे सरकार आपल्या ओझ्यानं कोसळेल असे भाकीत अनेक ज्योतिषांनी वर्तवले आहे असा प्रश्न विचारतात. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैली वापरत सरकार पडेल असं म्हणणारांचे दात पडत आलेत असे उत्तर दिले. तुम्हाला सुड काढायचा असेल तर तुम्ही एक सुड काढा आम्ही दहा सूड काढतो असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी व

न्यूज अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार दाखल:

न्यूज अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार दाखल: नवी मुंबई (प्रतिनिधि/दीपा वाघमारे) :- कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचे जगभरात कौतुक होत आहे. भारतीय शास्त्रज्ञांची ही कौतुकास्पद कामगिरी पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी हजर राहणार आहेत. जगभरातील संशोधक शास्त्रज्ञ कोरोना महामारीवर मात करू शकणारी लस शोधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लस तयार झाली असून त्याच्या मानवावरील प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून, चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या संशोधनाचे कौतुक जगभरातून केले जात आहे. शनिवारी दुपारी १ ते २ दरम्यान पंतप्रधान मोदी कोविशिल्ड लसीचा आढावा घेणार आहेत. मात्र या भेटीमध्ये पंतप्रधानांसमवेत १०० देशांचे राजदूत उपस्थित राहणार नसून ते ४ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे. सर्व १०० राजदूत २७ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येऊन सीरम आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्यु

न्यूज अपडेट: एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबई:

न्यूज अपडेट: एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबई: नवी मुंबई (प्रतिनिधि/उमेश खांदेकर) :- मुंबई वगळता राज्यातील सर्व शहरांसाठी लागू करण्यात येणाऱ्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबई शहराला होणार आहे. सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव अडीच चटई निर्देशांक दिला होता. त्यात आणखी अध्र्या वाढीव एफएसआयने भर पडल्याने गेली २५ वर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे या इमारतींचा विकास करण्यास विकासक धजावणार आहेत. याशिवाय खासगी इमारतींनाही ही नवीन एकात्मिक विकास नियंत्रण निययावली लागू होणार असल्याने त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होत आहे. झोपडपट्टी पुनर्विकासही चार एफएसआयने होणार असून नवी मुंबईतील पूर्व बाजू ही झोपडपट्टीयुक्त आहे. नवी मुंबईत या तिन्ही प्रष्टद्धr(२२४)नाांचे घोंगडे गेली अनेक वर्षे भिजत पडले आहे. राज्यातील शहरांचे नागरीकरण वाढत आहे. त्यांचा विकास सुनियोजित होऊन एफएसआयची चोरी होऊ नये यासाठी राज्य सरकार गेली तीन वर्षे महानगरांसाठी एकात्मिक व