न्यूज अपडेट : नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय; एपीएमसीमध्ये कोविड -१९ ची सखोल चाचणी:
नवी मुंबई (प्रतिनिधि/सीमा धस) :- नवी मुंबई नवी मुंबई शहरातील एपीएमसीच्या सर्व बाजारपेठांमध्ये लवकरच सखोल कोविड -१९ चाचणी केंद्रे सुरू केली जातील. असे महानगरपालिकेने झालेल्या बैठकीत सांगण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले, “सर्व एपीएमसी विभागांमध्ये, विशेषत: भाजीपाला आणि फळांच्या बाजारपेठेत वाढती गर्दी झाल्याचे वृत्त आपल्याला प्राप्त होत असल्याने आम्ही सर्व एपीएमसी मार्केटमध्ये कोविड -१९ व ची सामूहिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.