न्यूज अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभा मतदार संघ वाराणसीमध्ये दाखल होणार:
नवी मुंबई (बातमी/दिल्ली) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा मतदारसंघ वाराणसीत दाखल होणार आहेत आणि राष्ट्रीय महामार्गच्या हंडिया (प्रयागराज) - रजतलाब (वाराणसी) या सहा लेन रुंदीकरणाच्या प्रकल्पाला देशाला समर्पित करणार आहेत.
या दौर्यादरम्यान, पंतप्रधान देव दीपावलीला उपस्थित राहतील, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोर प्रकल्पाची साइट भेट घेतील आणि सारनाथ पुरातत्व साइटला देखिल भेट देतील.
नव्याने रुंदीकृत आणि सहा लेन केलेल्या एनएच-१९ च्या ७३ कि.मी. क्षेत्राच्या एकूण खर्चात २,४४७ कोटी रुपये खर्च झाला असून प्रयागराज ते वाराणसी दरम्यानचा प्रवास एक तासाने कमी करण्याची अपेक्षा आहे.
वाराणसीत प्रकाश आणि उत्साहाचा जगप्रसिद्ध उत्सव बनलेला देव दीपावली हा कार्तिक महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला साजरा केला जातो. महोत्सवाची सुरूवात पंतप्रधानांनी वाराणसीच्या राज घाटावर दीया लावून सुरू केली असून त्यानंतर गंगा नदीच्या दोन्ही बाजूंना ११ लाख दिवे लावण्यात येणार आहेत.
या भेटीदरम्यान पंतप्रधान बांधकाम सुरू असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी साइट भेट देतील. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या सारनाथच्या पुरातत्व ठिकाणी लाइट अँड साऊंड चा शो देखील पाहण्यात येणार आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.