Skip to main content

न्यूज अपडेट : पनवेलने येथे ६१,६८,३२० किंमती गुटखा लक्झरी बस, टेम्पोसह हस्तगत करण्यात आला: 

न्यूज अपडेट : पनवेलने येथे ६१,६८,३२० किंमती गुटखा लक्झरी बस, टेम्पोसह हस्तगत करण्यात आला: 


नशामुक्ती अभियानांतर्गत गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलने केली लक्झरी बससह टेम्पोवर कारवाई.
६१,६८,३२० किंमतीच्या गाड्यांसह गुटखा हस्तगत करण्यात आला.



पनवेल (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्था विरोधात कठोर कारवाई करण्या बाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत केला आहे.


महाराष्ट्र मध्ये गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री करणारी अंतराज्य टोळी बाबत माहिती गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलला प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड,  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे, पोलीस हवालदार सुनील साळुंखे, सचिन पवार, पोलीस नाईक सुनील कुदळे, चेतन जेजुरकर , इंद्रजीत कानू, सचिन म्हात्रे, पोलीस शिपाई आजिनाथ फुंदे, प्रवीण भोपी आदींच्या पथकाला मध्य प्रदेश राज्य येथुन एका प्रवाशी लक्झरी ट्रॅव्हल्समधुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा वाहतुक करुन तो पनवेल मध्ये आणून विविध ठिकाणी टेम्पोद्वारे वितरीत केला जातो अशी खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने सदरबाबत अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जी.शेखर पाटील व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली गार्डन हॉटेल पनवेल येथे सापळा लावला असता  मध्यप्रदेश येथुन लक्झरी ट्रॅव्हल्समधुन आणलेला गुटखा घेवुन जाणारा टेम्पो मिळून आला. सदर टेम्पो मध्ये  एकूंण  ६,६८,३२०/- रु. किंमतीचा विमल व राजश्री  गुटखा मिळुन आल्याने गुटखा वाहतुक करणा-या इसमा कडे चौकशी करता ज्या प्रवाशी लक्सरी बस मधून सदरचा गुटखा मध्यप्रदेश वरून वाहतूक केला ती बस च. झ. ०९ झ. -. ०४५०ही सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे.  



आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजी.क्र. ४४५/२०२० अन्नसुरक्षा मानदे अधिनियम कलम २६,२७ भा.दं.वि. कलम १८८,२७२,२७३,३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपी इर्शाद सैजुद्दिन अन्सारी वय ३२ वर्षे रा. शाहबाज गाव, बेलापुर गुटखा मागिवणारा, टेम्पो चालक राज रामा साळुंखे, वय-38 वर्षे, रा. बेलापुर गाव, बस चालक अशपाक कालू खा. व्हिले दुधी ता. धर्मपुरी जि. दहाद म. प्र यांना अटक करण्यात आली आहे. लक्झरी बस व टेम्पोसह गुटखा मिळून एकूण ६१,६८,३२०/- किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.


 


 


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे