न्यूज अपडेट : नेरूळ येथील तुटलेल्या नाल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका; महापालिका आयुक्तांना दिले निवेदन:
न्यूज अपडेट : नेरूळ येथील तुटलेल्या नाल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका; महापालिका आयुक्तांना दिले निवेदन:
● नेरुळ येथे तुटलेल्या नाल्याचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर दुरुस्त करावे
● नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन विरेंद्र म्हात्रे यांनी दिले निवेदन
नवी मुंबई (प्रतिनिधि/उमेश खांदेकर) :- नेरूळ येथील सेक्टर २० विभागामधील माजी नगरसेवक नामदेव रामा भगत यांच्या ऑफिसच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर नाल्याची सद्यस्थितीत तुटलेल्या अवस्थेत आहे. या फुटपाथ वरून रोज नागरिकांची व लहान मुलांची ये-जा चालू असते वृध्द वेक्ती देखिल त्या रस्त्यावरुण येत जात असतात जर चुकून कोणत्याही नागरिकाचा तोल गेल्यास ती वेक्ती नाल्यात पडून गंभीर पणे जखमी होण्याची शक्यता पुढे नाकारता येत नाही.
तरी पालिका प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देवून सदर नाल्याची दुरुस्तीचे आदेश संबंधितांना देऊन योग्य ती कारवाई करावी.
तसेच, या बद्द्लचे विंनती काळजीचे निवेदन नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.