Skip to main content

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका..!!!

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका..!!!



नवी मुंबई (प्रतिनिधि/रुपाली वाघमारे) :- मुंबईच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नियोजित असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाचे आदेश अखेर एमएसआरडीसीने दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर २०२३ पर्यंत असून यासाठी ७७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाला सुरुवातही झाली असून तीन वर्षांनंतर वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


हा पूल गेली अनेक वर्षे नियोजित होता. कामात अनेक अडथळे आल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नव्हते. सुरुवातीला कांदळवनाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पुलामुळे सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवन नष्ट होणार असल्याने पुलासाठी परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर तेवढेच कांदळवन दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वन विभागाने रस्ते विकास महामंडळाला  परवानगी दिली होती. त्यानंतर मार्गदर्शक सूचनांसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने १९ डिसेंबर रोजी परवानगी दिली होती. त्यानंतर कांदळवन लागवडीसाठी बोरीवली एरंगल येथे वन विभागाची जागा हस्तांतरित झाल्यानंतर या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला होता. एल अँड टी (L&T) कंपनीने यासाठीची सुरक्षा अनामत रक्कम नुकतीच भरल्यानंतर रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या कामाचे आदेश दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर २०२३ पर्यंत असून त्यानंतर या तिसऱ्या खाडी पुलावरील वाहतूक सुरू होणार आहे.  हा पूल झाल्यानंतर टोल वसुलीसाठीही अतिरिक्त तीन तीन मार्गिका वाढविण्यात येणार आहेत.  



मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडी पुलावरील जुना पूल सध्या मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरला जात आहे. तर दुसरा खाडी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलावर मुंबईकडे जाण्यासाठी तीन तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी तीन अशा सहा मार्गिका आहेत. मात्र सातत्याने वाहनांची संख्या वाढत असल्याने या दुसऱ्या खाडी पुलावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


तिसऱ्या खाडी पुलाचे दोन भाग असून सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला एक व जुन्या खाडी पुलाकडील पहिल्या पुलाच्या बाजुला एक असा तीनपदरी दोन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. हे दोन्ही पूल १८३७ मीटर लांब व १२.७० मीटर रुंद असणार आहेत. या तिसऱ्या पुलाच्या कामासाठी ७७५ कोटी रुपये खर्च येणार असून ५५९ कोटींचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे.


हा तिसरा पूल पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजूला उड्डाण  पूल बांधण्यात येणार असून दोन्ही दिशेकडे प्रत्येकी तीन तीन मार्गिका वाढणार आहेत. त्यामुळे हा पूल खुला झाल्यानंतर वाहतूक क्षमता दुपटीने वाढणार असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही.
– एस. सोनटक्के; मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ


 


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे