न्यूज अपडेट : फेब्रुवारीपर्यंत 10 वी,12 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार नाही - केंद्रीय शिक्षणमंत्री:
न्यूज अपडेट : फेब्रुवारीपर्यंत 10 वी,12 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार नाही - केंद्रीय शिक्षणमंत्री:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- दहावी बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा येत्या फेब्रुवारीपर्यंत घेतल्या जाणार नसल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. पोखरीयाल यांनी देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनीमय केल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल.
परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे पोखरीयाल यांनी सांगितले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.