जाॅब अपडेट : नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; बी.एस्सी पदवीधारक उमेदवारांसाठी भरती सुरु :
नोकरी ऑनलाईन :- बी . एस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदल गोदीत नोकरीची संधी आहे . वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाने जागा काढल्या आहेत . जाहिरातीनुसार , उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे .
● पदाचे नाव- वैज्ञानिक सहाय्यक
● पात्रता भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्री विज्ञान ( ओशनोलॉजी ) यापैकी कुठल्याही विषयात विज्ञान पदवी ( बीएस्सी ) घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात .
● अनुभव उमेदवारांना धातू विश्लेषण , धातू तंत्रज्ञान किंवा यांत्रिक कंपने ( व्हायब्रेशन ) , त्याच्याशी संबंधित विश्लेषण तसेच तंत्रज्ञान किंवा वंगण रसायनशास्त्र अशा प्रकारच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे .
● वयोमर्यादा- कमाल ३० वर्षे
● भरती प्रक्रिया उमेदवाराची आधी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल . सामान्य इंग्रजी , अंकात्मक क्षमता व सामान्य बुद्धिमता यासाठी प्रत्येकी दहा गुण , विज्ञान व तंत्रज्ञानासाठी २० गुण तसेच संबंधित क्षेत्रावर आधारित ५० गुणांची ही परीक्षा असेल .
अर्जासंबंधीची माहिती केंद्र सरकारच्या http://employmentnews.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल .
जागांचा प्रवर्गनिहाय तपशील -
एकूण १४ जागा
प्रवर्ग जागा खुला ६
इतर मागासवर्ग ३
एससी २
एसटी २
आर्थिकदृष्ट्या मागास १
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.