न्यूज अपडेट : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने पनवेल परिसरातील निराधारांना ब्लॅंकेटची ऊब.
नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने मगंळवार दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता "सामाजिक उपक्रमांतर्गत" ज्यांची पांघरुण घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा गरजू नागरिकांना पनवेल बस स्थानक, तक्का परिसरात मायेची ऊब देण्यासाठी पांघरूण वाटप करण्यात आले.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम वेळोवेळी राबवले जातात मायेची ऊब उपक्रमाचे सर्व स्तरातून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कौतुक होत आहे. सदर उपक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष केवल महाडिक, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, सहखजिनदार अनिल कुरघोडे, सदस्य निलेश सोनावणे, अरविंद पोतदार, मयूर तांबडे, विवेक पाटील, मंदार दोंदे, ओमकार महाडिक, सुभाष वाघपंजे, शेखर भोपी, ऍड. मनोहर सचदेव, सुमेध वाघपंजे, प्रथमेश रेवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.