Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

न्यूज अपडेट : विकासक विमल शहा समोर या दलालांना पुढे करू नकोस;डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : विकासक विमल शहा समोर या दलालांना पुढे करू नकोस;डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- विकासक विमल शहा समोर ये महादलाल व भडवेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेऊ नकोस. अन्यथा वंचित झोपडी धारकांसह  तुझ्या घराचा ताबा घेऊ. अशी चेतावणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली आहे. वेळ आली आहे तुझी व तुझ्या महादलाल तथा मस्तवाल अधिकाऱ्यांना नागडे करण्याची, झोपडीपासून वंचित राहिलेल्यांना सदनिका कश्या मिळत नाहीत हे पाहून घेऊ, कायद्यासमोर तुझ्यासखे छप्पन आडवे झालेत. तू काय चीज आहेस, तुला कायद्याचा व खऱ्या आंबेडकरी वाद्यांचा बडगा दाखवतो. अश्या शब्दात डॉ राजन माकणीकर यांनी एम.आय.डी.सी प्रकल्पात चोरी झाल्याचे सांगून अश्या चोरास नागडे करणार असल्याचे संकल्प व्यक्त केला आहे. शासनाचा प्रकल्पात भडवेगिरी करून महाभ्रष्टाचार करणारे विकासक व एमआयडीसी अधिकारी दोघांची खैर नाही, वीस वर्षांपूर्वी पात्र केलेल्यांना पुन्हा दस्ताऐवजांच्या आधारावर अपात्र करून सदनिका गळपाटण्याचा विकासाकाचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही धडक मोर्चा घे

न्यूज अपडेट: शेतकऱ्यांचा पायी मोर्चा थेट 1 फेब्रुवारीला संसदेवर धडकणार..!!

न्यूज अपडेट: शेतकऱ्यांचा पायी मोर्चा थेट 1 फेब्रुवारीला संसदेवर धडकणार..!! सरकारला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपली ताकद दाखवून देण्यासाठीच त्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची जोरात तयार सुरु आहे. नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- दिल्लीच्या सीमेवर आज सलग 61 व्या दिवशी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 60 दिवसांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी उद्या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद सरकारला दाखवणार आहे. दरम्यान शेतकरी नेते दर्शनपाल सिंह म्हणाले, 1 फेब्रुवारीला संसदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये देशातील विविध भागातून शेतकरी सहभागी होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये आत्तापर्यंत 10 बैठका पार पडल्या, त्यानंतरही कुठला तोडगा निघू शकलेला नाही. कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्याची एक मोठी ऑफरही सरकारनं देऊन पाहिली. मात्र, कायदा मागे घ्या याच मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपली

न्यूज अपडेट : "गाव तिथे संविधान चौक व उद्देशिका स्तंभ" उभारण्यात यावेत;डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : "गाव तिथे संविधान चौक व उद्देशिका स्तंभ" उभारण्यात यावेत;डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- देशातील सर्व सुधारित शहरे व तालुक्यात शासकीय खर्चातुन किंवा श्रमदानातून संविधान चौक व उद्देशिका स्तंभाची निर्मिती करण्यात यावी, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव  डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संविधान माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात शिकवणी साठी स्वतंत्ररित्या समाविष्ट करावे यासाठी सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून मागील १० ते १५ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व सदिच्छा भेटीसाठी डॉ. माकणीकर सातत्याने भारतीय संविधान पुस्तिका भेट स्वरूप देत असतात 358 आजी माजी आमदार खासदार मंत्री यांना भारतीय संविधान व शिकवणीत समावेश करण्याचे निवेदन दिले आहे, १ लाखाच्या वर संविधान उद्देशिका फ्रेमचे वाटप करून संविधान प्रचार व प्रसारासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे. गोरेगाव येथील एस एस पाटकर महाविद्यालयात स्व:खर्चाने डॉ. माकणीकर यांनी संविधान उद्देशिका स्तंभ उभारून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूक

न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड तर्फे 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सव होणार साजरा:

न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड तर्फे 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सव होणार साजरा: नवीं मुंबई (बातमी/संतोष शिरावले) :-  जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे: महाराष्ट्रातील आपल्या संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सर्व जिल्हा अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना  आपणास आम्ही या पत्रकाद्वारे विनंती करत आहोत की दिनांक 31/01/2021 रविवार रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या ऑफिस  नं 736 से. 2 कोपरखैरणे नवी मुंबईच्या येथे साजरा करणार आहोत कार्यक्रमाची रूपरेषा ● सकाळी 10 ते 11 वाजता : जिजाऊ वंदना ● सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत : मोफत चष्मा शिबिर ● संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत :डॉ. बालाजी जाधव (शिव-व्याख्याते )यांचे व्याख्यान ● सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत : महिला हळदीकुंकू समारंभ व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती : मा. श्री बिपिन कुमार सिंह साहेब पोलीस आयुक्त  (भा. पो. से.) नवी मुंबई, मा. श्री अभिजीत बांगर साहेब, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त (भा.प्रे.से ) नवी मुंबई, शिवश्री  मा. ॲड. मनोजदादा आखरे सा

न्यूज अपडेट :- वाशी खाडी पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्थानिक मच्छिमारांनी वाचवले प्राण:

न्यूज अपडेट :- वाशी खाडी पुलावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्थानिक मच्छिमारांनी वाचवले प्राण: प्रेेयशीच्या झालेल्या किरकोळ वादातून तरुणाने वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक मच्छिमारांनी या तरुणाचे प्राण वाचविले. नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- नवी मुंबईतील वाशी खाडी पूल मुंबई लेन येथे एका तरुणाने वाशी खाडीपुलावरून पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कोळी बांधवांच्या सतर्कतेने या तरुणाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. प्रेयसीशी झालेल्या किरकोळ वादातून तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न: संबंधित तरुणाचे नाव रवी पप्पू रेड्डी असून, रवी आणि प्रेयसीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून रवीने वाशी खाडीपूलावरुन पाण्यात उडी मारली. उडी मारल्याचे पाहताच प्रेयसीचा आरडाओरडा -रवी याने खाडीत उडी मारल्याचे पाहताच त्याची प्रेयसीने आरडाओरडा केला असता तात्काळ स्थानिक मच्छीमार महेश अशोक सुतार व त्यांचा मित्र अभिषेक जैस्वाल हे वाशी खाडी पूल येथे तत्काळ आले व मच्छीमार महेश सुतार व अविनाश जैस्वाल यांनी बोटीने उडी मारलेल्या तरुणाचा शोध घेत असताना हा तरुण पाण्या

न्यूज अपडेट : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न/जीवनगौरव पुरस्कार सोहळा पडणार पार :

न्यूज अपडेट : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न/जीवनगौरव पुरस्कार सोहळा पडणार पार : नवी मुंबई (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि) नवी मुंबई यांच्या माध्यमातुन गेली 8 वर्षापासुन समाजरत्न पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडत असतो. तसेच या वर्षी हा पुरस्कार सोहळा कोविड-19 च्या महामारी मुळे शासनाने दिलेल्या निर्बधानुसार मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडत असुन सदर सोहळ्यात समाजरत्न /जीवन गौरव पुरस्काराने तर काहीना सन्मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात येणार आहे, हा पुरस्कार सोहळा 30 जानेवारी 2021 रोजी शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता एम.टी.डी.शी. रेसिडंशी प्लाँट.नं. 10 शिल्पचौक जवळ सेक्टर 12 खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख मार्गदर्शक आद. प्रविन मोरे, संस्थापक अदयक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप, संयोजक आद.प्रा.अनिल वानखेडे डाँ.बा.आं.सां.म.समिती. (कार्यादयक्ष), निमत्रंक आद.संदेश उघाडे डाँ.बा.आं.सां.म.समिती, समन्वयक आद.अग्नेश पाटणकर, आद.अजित रोकडे, निवेदक आद. मधुकर वारभुवन सर. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या,

न्यूज अपडेट : सा. आजची उद्योग नगरी वृत्तपत्राच्या संपादिका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड नवी मुंबई ग्रुप ने दिली विशेष भेट:

न्यूज अपडेट : सा. आजची उद्योग नगरी वृत्तपत्राच्या संपादिका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड नवी मुंबई ग्रुप ने दिली विशेष भेट: नवी मुंबई (बातमी/ संतोष शिरावले) :- आजची उद्योग नगरी साप्तहिक च्या संपादिका कु. रुपाली वाघमारे यांचा वाढदिवस होता. नवी मुंबईतील वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमीच सहभागी असतात स्वतःचं साप्ताहिक असल्याकारणाने परिसरातील महिलांचे व इतर सामाजिक घटकांचे प्रश्न समस्या त्या नेहमीच      आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. "पत्र नव्हे शस्त्र "या वाक्य नुसार वेळोवेळी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा त्या करतात त्यांचे स्वतःचे यूट्यूब न्यूज चैनल आणि जागरूक महाराष्ट्र या चैनल ला सुद्धा काम करत आहेत व तसेच दैनिक हिंदूसम्राट या वृत्तपत्रात पनवेल विभागाच्या प्रतिनिधी म्हणून देखिल काम करत आहेत. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या कार्याची प्रेरणा त्यांचे वडील श्री मोहन वाघमारे साहेब यांच्याकडून मिळाली आहे. श्री मोहन वाघमारे साहेब हे अग्रलेखाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या "नवाकाळ"

न्यूज अपडेट :"आगरी-कोळी सांस्कृतिक भवन" सुरू न केल्यास टाळे तोडणार; असा इशारा मनोज मेहेर यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिला:

न्यूज अपडेट :"आगरी-कोळी सांस्कृतिक भवन" सुरू न केल्यास टाळे तोडणार; असा इशारा मनोज मेहेर यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिला: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नेरूळ सेक्टर 24 येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन बंद असल्याने आगरी-कोळी समाजाला विवाहासाठी अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक होत आहे. 10 फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास टाळे तोडून आगरी-कोळी समाजाचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करण्याचा इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळेचे ग्रामस्थ मनोज मेहेर यांनी लेखी निवेदनातून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. कोरोना पर्व सुरू झाल्यापासून सिडकोने नेरूळ सेक्टर 24 येथील ‘आगरी कोळी सांस्कृतिक भवन’ बंदच ठेवले आहे. सध्या कोरोना आटोक्यात येत असून बाहेरील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. अन्य सर्व सांस्कृतिक भवन, विवाहाचे हॉल, अन्य हॉल, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह, इतकेच नाही तर महापालिकेचेही हॉल आता रहीवाशांसाठी सुरू झाले आहेत. तथापि सिडकोचे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन आजही बंदच आहे. स्थानिक आगरी-को

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील नेरुळ ‘रेल्वे स्टेशन’ कॉम्प्लेक्स झालंय ‘दारू’कामाचा अड्डा; याला जबाबदार कोण..??

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील नेरुळ ‘रेल्वे स्टेशन’ कॉम्प्लेक्स झालंय ‘दारू’कामाचा अड्डा; याला जबाबदार कोण..?? कोणाच्या आशिर्वादाने चालू आहेत हे प्रकार???  नवी मुंबई (प्रतिनिधी) :- बस स्थानकं, रेल्वे स्टेशन्स अशा सार्वजनिक ठिकाणी दारू विक्रीस परवानगी नसताना दारू विक्रीसोबतच खुलेआम दारू सेवनाचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानक कॉम्प्लेक्स मध्ये समोर आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम कडे काही दिवसांपूर्वी तक्रार आली होती. परंतू याकाळात जवळपास सारेच जग थांबले होते त्यामुळे आम्हाला सदर प्रकार पोलीस व सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आणता आले नाही. नुकतीच महाराष्ट्र वार्ता च्या टीम ने या ठिकाणी भेट देत हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. जेव्हा आमची टीम येथे पोहोचली तेव्हा या दारूच्या दुकानावर अपेक्षेप्रमाणे शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राजहंस वाईन्स नामक या वाईन शॉप ला लागूनच प्लॅटफॉर्म वरून बाहेर पडण्याच्या मार्गावर अनेक मद्यप्रेमी चक्क उघड्यावर पाणी व शितपेयांच्या बाटल्यांत तन-मन-धन लावून ‘रेडि

न्यूज अपडेट : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे अडथळा..!!

न्यूज अपडेट : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे अडथळा..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक कोटी दहा लाख डोस कोव्हिशिल्ड लशींचे आणि ५५ लाख डोस कोव्हॅक्सिनचे विकत घेतले आहेत. या दोन्ही व्हॅक्सिनविषयी सविस्तर माहिती प्रत्येक लसीकरण केंद्रावर तुम्हाला मिळेल. तशी ती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे परंतु या लसीकरणाच्या मोहिमेत गैरसमजुतीमुळे अनेक अडथळे येत आहेत.  भारतातील लोकसंख्येचा विचार करता सरकारने सगळ्यात आधी आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि आधीपासून एखादा गंभीर आजार असलेले लोक यांना आधी लस देण्याचं ठरवलं आहे. त्यानंतर ज्यांना गरज असेल अशा सगळ्यांना लस देण्यात येईल. कोरोना लसीमुळे नपुसंकत्व येते, नजर जाते ते थेट परत आपल्या शरीरात कोरोनाचे विषाणू जातात अशा अनेक अफवा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत व हाच एक मोठा अडथळा लसीकरणाच्या मोहिमेला ठरत आहे.  लसीकरण व लोकसंख्या हा अभ्यास करणारा विषय आहे कारण पोलियोचे लसीकरण करतानासुद्धा

न्यूज अपडेट : नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत; नागरिकांची गैरसोय, चोरीचे व घंधूल्याचे प्रमाण वाढले:

न्यूज अपडेट : नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत; नागरिकांची गैरसोय, चोरीचे व घंधूल्याचे प्रमाण वाढले: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- उद्याने ही शहराचे वैभव असल्याने उद्यान विभागातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम करावे व उद्यानांच्या स्थितीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी  सूचित केले होते. दरम्यान, सेक्टर 12 नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत या उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत असल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळेस खुप गडद अंधार होतो आणि याचाच फायदा घेऊन काही भुरटे चोर या प्रभागात चोरी करत आहेत त्यामुळे चोर्‍यांचे व   गर्दुल्यांचे प्रमाण देखील विभागात वाढत आहे तसेच या अपुऱ्या प्रकाशामुळे जेष्ठ नागरीक, लहान मुले व महिला वर्गाला ये-जा करण्यास होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर महापालिकेने गांभीर्याने लक्ष देवून लवकरात लवकर कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बनवून येथील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा. तसेच, या बद्दल लेखी निवेदन नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी आयुक्त श्री. अभिजीत

न्यूज अपडेट : प्रभाग ९३-९५ मधील अंर्तगत भागातही रंगरंगोटी करून त्यावर आगरी - कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करा:

न्यूज अपडेट : प्रभाग ९३-९५ मधील अंर्तगत भागातही रंगरंगोटी करून त्यावर आगरी - कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करा: नवी मुंबई (प्रतिनिधी/काशिनाथ नाईक) :- नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव परिसरातील अंर्तगत भागातही गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून  त्यावर आगरी व कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसकमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून नवी मुंबई शहरात सुशोभीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याअंर्तगत भिंतींची, पदपथाच्या खालील सिमेंटच्या ठोकळ्यांची, बाह्य भागातील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी सुरू आहे. त्यावर सुभाषिते तसेच वेगवेगळी चित्रे रंगविली जात आहेत.  प्रभागाचा बकालपणा घालविण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्वप्रथम  महापालिका आयुक्त व  महापालिका प्रशासनाचे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसकमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच  आभार मानले आहेत. नेरुळ गांव प्रभाग ९३-९

न्यूज अपडेट : नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालया समोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न..!!

न्यूज अपडेट : नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालया समोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न..!! ● मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतले. नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- राष्ट्रवादीच्या घणसोली येथील नितीन रांजणे या माथाडी कामगाराची विनयभंगप्रकरणी तक्रार करण्यात आलीय. मात्र मला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप करत थेट नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर त्या तरुणानं डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडालीय. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतले.  मला खोट्या विनयभंग प्रकरणात गोवत असल्याची तक्रार नितीन रांजणे यांनी केली होती. त्यानंतर त्यानं कोपरखैरणे पोलीस राजकीय दबावाखाली खोटी कारवाई करत असल्याची तक्रार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस एका मोठ्या नेत्याच्या दबावामुळे मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप त्या तरुणानं केलाय. पोलिसांवरही दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप मनपा निवडणुकीत अडसर नको म्हणून अडकवले जात असल्याचे नितीन रांजणेनं म्हटलेय. यामुळे नवी मुंबई पोल

न्यूज अपडेट : नवी मुंबई आमदार मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा:

न्यूज अपडेट : नवी मुंबई आमदार मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा: नवी मुंबई (प्रतिनिधी) :-  भाजपच्या बेलापुरमधील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस सानपाडा, प्रभाग ७६ मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त समाजसेवक व आ. मंदाताई म्हात्रे समर्थक असलेले भाजपा कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी विविध स्पर्धाचे तब्बल ७ दिवस आयोजन वाढदिवसानिमित्त केले होते. प्रभाग ७६ मध्ये सप्ताहभर चाललेल्या या वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने हळदीकुंकु समारंभाला स्वत: आ. सौ. मंदाताई म्हात्रेदेखील उपस्थित राहील्या होत्या. १४ व १५ जानेवारीदरम्यान ब्लॅक अॅण्ड ब्युटी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेसाठी काळ्या रंगाची साडी नेसून व सोन्याचे आभूषण घातलेला फोटो व्हॉटस अपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत २२ महिला सहभागी झाल्या, त्यातील ३ महिलांना पारितोषिकांनी गौरविण्यात आले. १६-१७ जानेवारी रोजी सानपाडा सेक्टर २ येथील खेळाचे मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रभाग ७६ मधील २४ संघ सहभागी झाले होते. यामध्ये सेक्टर ८ मधील संकल्प सोसायटीने व

न्यूज अपडेट : शासनाच्या प्रकल्पात चोरी करायला तुमच्या बापाचा प्रकल्प नाही. डॉ. राजन माकणीकर एमआयडीसी झोपूसुयो प्रकरण..!!

न्यूज अपडेट : शासनाच्या प्रकल्पात चोरी करायला तुमच्या बापाचा प्रकल्प नाही. डॉ. राजन माकणीकर एमआयडीसी झोपूसुयो प्रकरण..!! नवी मुंबई (प्रतिनिधी) :- प्रकल्पात चोरी करू देणार नाही, प्रकल्प काही तुझ्या बापाचा नाही, आम्ही येथील भूमिपुत्र, १५ वर्षाखाली उष्टी बिडी मागून पिणारा परप्रांतीय एवढा गडगंज कसा झाला? यासाठी याची व याच्या साथीदारांची वंशावळ संपत्तीची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्दी माध्यमाद्वारे व्यक्त केले आहे. प्रसंगी मरण आले तर बेहत्तर, मात्र: या महादलाला जेरबंद केल्याशिवाय राहणार नाही. सत्ता व संपत्तीचा माज उतरविणे अत्यंत गरजेचे आहे. जाती, जातीत तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणारी काका नामक रक्तपिपासू व्यक्ती तरुणांना व्यसनाच्या आहारी लावून स्वतःचा उल्लू सिधा करण्यात धन्यता मानते आहे. एमआयडीसी उद्योग सारथी झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात भाजपा कार्यकर्ता, खोटे जातीचे दाखले बनवून, निवडणूक लढवून नगरसेवक पद मिळवले व न्यालायातून दोषी ठरल्यानंतर महापालिकेने नगरसेवक पद काढून घेतलेल

न्यूज अपडेट : नेरूळ सेक्टर २० व २० अ तसेच नेरुळ गांव नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा;विरेंद्र म्हात्रे:

न्यूज अपडेट : नेरूळ सेक्टर २० व २० अ तसेच नेरुळ गांव नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा;विरेंद्र म्हात्रे: नवी मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- नेरूळ सेक्टर २० व २० अ तसेच नेरुळगांव नोडमध्ये मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ पालिका विभाग अधिकारी दत्तात्रेय  नांगरे यांच्याकडे केली आहे. महापालिका प्रभाग ९३ व ९५ मध्ये नेरूळ सेक्टर २० व २०अ  तसेच नेरुळ गांध नोडचा समावेश होतो. या ठिकाणी कोठेही बाह्य वर्दळींच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही पहावयास मिळत नाही. नेरूळ  सेक्टर विसमधील  तेरणा हास्पिटल ते नेरुळ सेक्टर विसमधील तलाव यादरम्यान  सकाळी व रात्री मोठ्या संख्येने मॉर्निग वॉकसाठी तसेच रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी  येत असतात. नेरुळ रेल्वे स्टेशन परीसरात रात्रीच्या वेळी मार्केट भरतो त्या मार्केट मध्ये रात्रीच्या वेळी भाजी व ईतर वस्तू घेण्यासाठी नागरिकांनची मोठ्या प्रमाणात गर्दी  असते. मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर वाहने विशेषत: द

न्यूज अपडेट : शेकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश; डेमोक्रॅटिक RPI ला राज्यात सर्वधर्मीयांकडून प्रचंड प्रतिसाद :

न्यूज अपडेट : शेकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश; डेमोक्रॅटिक RPI ला राज्यात सर्वधर्मीयांकडून प्रचंड प्रतिसाद : नवी मुंबई (प्रतिनिधी) :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून बंजारा व मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला. रिपब्लिकन ऐक्याची पहिली हाक देणारे नामांतर लढ्याचे अग्रणी नेतृव असलेले दिवंगत माजी आमदार पँथर टी एम कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील  स्थापन केलेल्या पक्षाला आज भरघोष प्रतिसाद मिळत आहे. बंजारा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते वंचित चे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष भाई शिवा राठोड यांनी नुकताच पक्षप्रवेश केला, त्यांना बंजारा सेल च्या महाराष्ट्र राज्य प्रदेशद्याक्ष पदी पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. तर शेकडो मुस्लिम बांधवांनी कनिष्क कांबळे यांचे नेतृत्व मान्य करून पक्षात प्रवेश बिनशर्त प्रवेश घेतला. उत्तर प्रदेश अध्यक्ष दबीर सिद्दीकी यावेळी उपस्तीत होते, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी त्यांनी योग्य अशी माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक

न्यूज अपडेट : काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोलेंची निवड निश्चित..??

न्यूज अपडेट : काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोलेंची निवड निश्चित..?? ● नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. नवी मुंबई (प्रतिनिधी/वीरेंद्र म्हात्रे) :- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. आता यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दिल्लीत राहुल गांधी पत्रकारपरिषद घेणार आहेत. यावेळी नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी? ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील

न्यूज अपडेट : महाविकास आघाडीच्या वतीने सफाई कामगार व गोरगरिबनागरिकांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले:

न्यूज अपडेट : महाविकास आघाडीच्या वतीने सफाई कामगार व गोरगरिबनागरिकांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले: नवी मुंबई (प्रतिनिधी/सीमा दस) :- महाविकास आघाडी नवी मुंबई व नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री गुरुनाथ नाईक , नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव श्री. विरेंद्र म्हात्रे,  बेलापूर विधानसभा चे अध्यक्ष मच्छिमार सेल श्री. प्रविण पाटील आणि तालुका अध्यक्ष ओ.बी.सी. सेलचे श्री. संदेश पाटील यांच्या तर्फे हेल्थ कार्ड शिबिर आयोजित केली होती. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेशसर चिटणीस  नवी मुंबई निरीक्षक मा.श्री प्रशांत भाऊ पाटील आणि सिने अभिनेत्री नयन ताई पवार, यांच्या हस्ते सफाई कामगार तसेच गोरगरिबनागरिकांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले.  तसेच, यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी श्री मिनानाथ वायकर साहेब जिल्हा उपाध्यक्ष, श्री संदीप सुतार माजी नगरसेवक, श्री संतोष घोसलकर उपजिल्हाध्यक्ष शिवसेना, श्री सचिन पाटील साहेब , श्री संतोष आहेर साहेब जिल्हा अध्यक्ष सेवा दल ,श्री बालू जरे जिल्हाध्यक्ष कामगार सेल ,विश्वासराव बोराडे विधानसभा अध्यक्ष, श्री नरेश का

न्यूज अपडेट : उलवे शहरात वटवृक्ष लागवडीकरिता आवश्यक जागेची सिडकोकडे मागणी :

न्यूज अपडेट : उलवे शहरात वटवृक्ष लागवडीकरिता आवश्यक जागेची सिडकोकडे मागणी : नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- वडाचे झाड अर्थात वटवृक्ष हा भारत देशाचा राष्ट्रीय प्रतिक आहे. कित्येक पक्षांच्या प्रजातींचा तो अन्नदाता आहे, १२ तासाहून अधिक काळ ऑक्सिजन देणारा अक्षयवट आहे. वटवृक्षांची नवी मुंबईचा संकल्प हाती घेतलेल्या उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने उलवे शहरातील प्रत्येक सेक्टर मधे विविध ठिकाणी फक्त पाच वटवृक्ष लावण्याकरिता सिडकोकडे जागेची मागणी केली आहे. ह्या मागणीचा संस्थेचा खास एकच उद्देश असा आहे की, जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी विवाहित स्त्रिया ह्या वडाची पुजा करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य मिळण्याकरिता वडाला धागा बांधून जन्मोजन्मी सोबत राहण्यासाठी सात फेरे घेतात. आज उलवे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वटवृक्षांची संख्या मात्र फारच कमी असल्याचे दिसुन येते. शिवाय उलवे सेक्टर २४,२५,२५ए मधे तर एकही वटवृक्ष नसल्याने यापुढे तेथील सुहासिनीना वटपौर्णिमेचा व्रत पुर्ण करण्यासाठी खुप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आह

ब्रेकिंग न्यूज अपडेट : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग..!!

ब्रेकिंग न्यूज अपडेट : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग..!! नवी मुंबई (बातमी/पुणे) :- पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे वृत्त समोर आले आहे. जेथे आग लागली आहे त्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप अजून समोर आलेले नाही. सध्या कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून देशभरात लसीकरणास सुरु झाले आहे. मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट आहे. आज दुपारी २ वाजता सीरम इंस्टीट्यूटच्या इमारतीला आग लागण्यची माहिती मिळत आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी कोरोना लसीकरणाचे मोहीम सुरु असतानाच ही घटना घडली. सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. या इमारतील को

न्यूज अपडेट : फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा; RPI डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा..!!!

न्यूज अपडेट : फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा; RPI डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा..!!! नवी मुंबई (मुंबई / प्रतिनिधी) :- मुंबई गोरेगाव फिल्मसिटी १ व २ क्रमांकाच्या स्टुडिओ मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून आर.पी.आय डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचीव डॉ. राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड पाठपुरावा करत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहिती नुसार फिल्मसिटी व्यवस्थापनाकडून फार मोठी चोरी केली असल्याचे निदर्शनात आले आहे. डॉ. माकणीकर व कॅ. गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार कलागार म्हणजेच स्टुडिओ क्रमांक १ आणि २ इमारतीचे स्ट्रक्चर चे ऑडिट डी डी कुलकर्णी आणि सरदार पटेल महाविद्यालयाने या दोन्ही स्टुडिओच्या इमारती धोक्याच्या असून या पाडुन नव्याने बांधण्यात याव्यात मात्र तसे न होता मंडळाद्वारे डागडुगी व दुरुस्ती करून नीला प्रोडक्शनला चाविण्याची परवानगी दिली आहे. सदर स्टुडिओ मध्ये AC प्लांट चालविण्यासाठी जागा असूनही दुसरीकडे देण्यात आली अस करण्यामागच कारण काय? शिवाय सदर इमारती या मोडकळीस आल

न्यूज अपडेट : बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके यांचे नवी मुंबई मधे वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचे मोठ्या थाटात उदघाटन सोहळा पार:

न्यूज अपडेट : बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके यांचे नवी मुंबई मधे वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचे मोठ्या थाटात उदघाटन सोहळा पार: ● बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके व सौ. अरुणा कटके यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे सिवुड मधे थाटामाटात उदघाटन सोहळा  ● सौ. अरुणा कटके यांनी   महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम  देखिल आयोजीत केला  ● वंचित बहुजन आघाडीचा झेंडा महापालिकेवर फडकावून व महापौर आमचाच असेल; महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई ठाकूर ● नवी मुंबई महापालिका निवडणूक स्व बळावर सर्वजागा लढवणार नवी मुबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात थोड्याच दिवसात सर्व समाजातील वंचित व तळागळात पोहचलेला व खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भुमिका वंचित समाज व  बहुजनांचे लोकप्रिय ज्ञानवंत नेते मा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी घराघरात पोहचली आसुन शहर व गावोगावी नविन जनसंपर्क कार्यालय होत आहेत. यामधे नवी मुंबई ही मागे नसून सिवुड नेरूळ येथे अशोक सोनवणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ तसेच महाराष्ट्रात रणरागिनी म्हणून प्रसिध्द असलेल्या मा. रेखाताई ठाकूर (

न्यूज अपडेट : महाविकास आघाडीच्या वतीने सफाई कामगार व गोरगरिबनागरिकांना हेल्थ कार्ड वाटप..!!

न्यूज अपडेट : महाविकास आघाडीच्या वतीने सफाई कामगार व गोरगरिबनागरिकांना हेल्थ कार्ड वाटप..!! नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महाविकास आघाडीच्या वतीने नवी मुंबई व नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री गुरुनाथ नाईक, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव श्री. विरेंद्र म्हात्रे,  बेलापूर विधानसभा चे अध्यक्ष मच्छिमार सेल श्री. प्रविण पाटील आणि तालुका अध्यक्ष ओ.बी.सी. सेलचे श्री. संदेश पाटील यांच्या तर्फे हेल्थ कार्ड शिबिर आयोजित केली होती.  या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेशसर चिटणीस नवी मुंबई निरीक्षक मा.श्री प्रशांत भाऊ पाटील आणि सिने अभिनेत्री नयन ताई पवार, यांच्या हस्ते सफाई कामगार तसेच गोरगरिब नागरिकांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी श्री मिनानाथ वायकर साहेब (जिल्हा उपाध्यक्ष), श्री संदीप सुतार (माजी नगरसेवक), श्री संतोष घोसलकर (उपजिल्हाध्यक्ष शिवसेना), श्री सचिन पाटील साहेब , श्री संतोष आहेर साहेब जिल्हा अध्यक्ष सेवा दल, श्री बालू जरे (जिल्हाध्यक्ष कामगार सेल) ,विश्वासराव बोराडे (विधानसभा अध्यक्ष), श्री नरेश काले

न्यूज अपडेट : खंडणी आणि किडनॅपिंग मर्ज करून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली; पालकमंत्री अस्लम शेख :

न्यूज अपडेट : खंडणी आणि किडनॅपिंग मर्ज करून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली; पालकमंत्री अस्लम शेख : ● आमचे संजय राऊत यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे खंबीर आहेत. ● काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका.  ● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान भाजप शिस्तबद्ध पद्धतीने संपवत आहे” ● ससून डॉक बंद होत आहे आपण त्याच बंदराचे स्थलांतरण नवी मुंबईत नवी मुंबई (प्रतिनिधी) :- 2021 च्या होणार्‍या आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा रविवारी 17 जानेवारी रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी नवी मुंबईच्या नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं  “खंडणी आणि किडनॅपिंग मर्ज करून जी पार्टी निर्माण झाली असेल तर ती भारतीय जनता पार्टी असेल. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनासोबत इतके वर

न्यूज अपडेट : नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली भंगार माफिया विरोधात उचलला बडगा:

न्यूज अपडेट : नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली भंगार माफिया विरोधात उचलला बडगा: ● बेकायदेशीर भंगार माफियांवर कडी नजर पनवेल (प्रतिनिधी) :- कलंबोळी स्टील मार्केट हे आशिया खंडातील सर्वांचे मोठे स्टील मार्केट असून करोडोंची उलाढाल रोज होत असते. अनेक उद्योजक, व्यावसायिक येते आपले काम प्रामाणिक पणे करत आहेत. पण काही भंगार माफिया या व्यवसायिकांना त्रास देत आहेत. आजूबाजूच्या परिसरात बांधकाम व्यवसाय जोरात सुरु आहे. त्यासाठी लागणारा लोखंडी रॉड या भंगार माफियांकडून कमी किंमतीत विकला जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून अवैध धंदे,भंगार माफिया, बेकायदेशीर दारू आणि गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा सुरु केला आहे.  कळंबोली मधील भंगार माफिया इम्तियाज शेख हा आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक काळापासून आपला काळाबाजर चालवत होता. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सध्या भंगार माफिया हद्दपार होतील अशी नागरिक व व्यापारी यांना अपेक्षा आहे. इम्तियाज व इतर भंगार माफिया पुन्हा आपले डोके वर

न्यूज अपडेट : गुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावर कारवाई करा; डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : गुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावर कारवाई करा; डॉ. राजन माकणीकर:  ● पवई पोलीस शिपाई मारहाण प्रकरण नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :-  कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर हाथ उचलणार्या कोणत्याही अश्या व्यक्तीला जेरबंद करून धडा शिकवल्याशिवाय सोडू नये व  गुंडांना शह देणाऱ्या आंमदरावरच करावी कारवाई अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे  राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली. भाजपा सरकार सत्तेत आल्या पासून बौद्ध, दिन-दलित, मुस्लिम, पिडीत, महिला, विद्यार्थी व आदिवासी जनतेवर अन्यायाची मोहीम चालू झाली आहे, बलात्कार, मारहाण, गुंडागर्दी चे प्रमाण वाढले असून संविधानाची पायमल्ली होत आहे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेला आहे.  सरकारी कर्मचारी पासून ते अधिकारी पर्यंत वातावरण भयभीत झाले आहे. पोलिसांचा धाक कमी होऊन पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हे हल्ले करणारे गुंड भाजप पक्षाचे असल्याचे निष्पन्न होत आहे. असाच एक प्रकार महाराष्ट्र मुंबई पवई पोलीस ठानेत घडला असून 3 भाजपा कार्यकर्त्यांनी कर्तव्यात असलेल्या पोलीस शिपायला रिक्षात डांबून बेदम मार दिला

न्यूज अपडेट :सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही; आरपीआय डेमॉक्रॅटिक:

न्यूज अपडेट :सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही; आरपीआय डेमॉक्रॅटिक: नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी स्व:खुशीने राजीनामा द्यावा अशी मागणी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे. नामदार धनंजय मुंढे हे करूणा शर्मा या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असतांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्ये आहे. या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वतःचे नाव लावले आहे, याच महिलेच्या बहिणीने म्हणजेच गायिका असलेल्या रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केले आहेत.  धनंजय मुंडे हे आधीपासून विवाहित आहेत. रेणू शर्माच्या मते धनंजय मुंढे यांनी तिच्या बहिणीशी लग्न केले आहे हे जर सत्य असेल तर मुंडे यांच्याकडून द्विभार्या प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सोबतच पहिल्या पत्नीची 3 अपत्ये आणि या पत्नीकडून 2 अपत्ये अशी 5 अपत्ये त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केले आहेत का?  आणि केले नसेल तर येथेही त्यांनी कायद्याचंच उल्लंघन केले आहे.

न्यूज अपडेट : नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव..!!

न्यूज अपडेट : नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव..!! पनवेल (प्रतिनिधी) :- स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९५ व्या जयंती निमित्त नवी मुबंई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव घेऊन तो सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे व ग्रामस्थ उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात व ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. दि.बा.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंती निमित्त विद्यालयात ऑनलाईन वक्तृत्व  ,निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांची भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ या फेडरेशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते विद्यालयाच्या व ग्रामस्थांच

न्यूज अपडेट : माजी नगरसेवकांच्या हस्ते नागरी विकास कामांचे उद्घाटन करू नये ; मनोज मेहेर :

न्यूज अपडेट : माजी नगरसेवकांच्या हस्ते नागरी विकास कामांचे उद्घाटन करू नये ; मनोज मेहेर : नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महानगरपालिकेच्या नागरी विकास कामांचे उद्घाटन माजी नगरसेवक – नगरसेविका यांच्या हस्ते न करता स्थानिक आमदार अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्याची लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.  नवी मुंबई महानगरपालिकेचे पाचवे सभागृह मे २०२० मध्ये संपुष्ठात आले आहे. त्यानंतर प्रशासकीय राजवट येवून प्रशासक म्हणून आपण स्वत: नवी मुंबईचा कार्यभार सांभाळत आहात. कोरोना काळामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडलेली आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना महामारीतून ओसल्यावर शहरातील प्रभागामध्ये नागरी कामांच्या उद्घाटनांचे पेव फुटले आहे. परंतु हे उद्घाटन माजी नगरसेवक / माजी नगरसेविका यांच्या हस्ते केले जात असल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले असून प्रशासकीय कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण  होवू लागले असल्याचा संशय मनोज यशवंत मेहेर यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.