न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड तर्फे 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सव होणार साजरा:
न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड तर्फे 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सव होणार साजरा:
नवीं मुंबई (बातमी/संतोष शिरावले) :- जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे: महाराष्ट्रातील आपल्या संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सर्व जिल्हा अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आपणास आम्ही या पत्रकाद्वारे विनंती करत आहोत की दिनांक 31/01/2021 रविवार रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या ऑफिस नं 736 से. 2 कोपरखैरणे नवी मुंबईच्या येथे साजरा करणार आहोत
कार्यक्रमाची रूपरेषा
● सकाळी 10 ते 11 वाजता : जिजाऊ वंदना
● सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत : मोफत चष्मा शिबिर
● संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत :डॉ. बालाजी जाधव (शिव-व्याख्याते )यांचे व्याख्यान
● सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत : महिला हळदीकुंकू समारंभ व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती :
मा. श्री बिपिन कुमार सिंह साहेब पोलीस आयुक्त (भा. पो. से.) नवी मुंबई, मा. श्री अभिजीत बांगर साहेब, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त (भा.प्रे.से ) नवी मुंबई, शिवश्री मा. ॲड. मनोजदादा आखरे साहेब, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, शिवश्री अण्णासाहेब सावंत साहेबप्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, शिवश्री संतोषजी गाजरे साहेब कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, शिवश्री सुहास राणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, शिवश्री डॉ. योगेश पाटील साहेब ठाणे विभागीय अध्यक्ष, शिवश्री डॉ. बालाजी जाधव शिव -व्याख्याते, शिवश्री संदीप बारड साहेब (माजी), ठाणे विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून आपणही सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
निमंत्रक : शिवश्री मारुती शंकर (खुटवड, जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री जनार्दन चंद्रकांत (शिरावले, महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई),श्री संतोष किसन शिरावले (जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड नवी मुंबई).
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.