Skip to main content

न्यूज अपडेट : गुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावर कारवाई करा; डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : गुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावर कारवाई करा; डॉ. राजन माकणीकर: 

● पवई पोलीस शिपाई मारहाण प्रकरण

नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर हाथ उचलणार्या कोणत्याही अश्या व्यक्तीला जेरबंद करून धडा शिकवल्याशिवाय सोडू नये व  गुंडांना शह देणाऱ्या आंमदरावरच करावी कारवाई अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे  राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.

भाजपा सरकार सत्तेत आल्या पासून बौद्ध, दिन-दलित, मुस्लिम, पिडीत, महिला, विद्यार्थी व आदिवासी जनतेवर अन्यायाची मोहीम चालू झाली आहे, बलात्कार, मारहाण, गुंडागर्दी चे प्रमाण वाढले असून संविधानाची पायमल्ली होत आहे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेला आहे. 

सरकारी कर्मचारी पासून ते अधिकारी पर्यंत वातावरण भयभीत झाले आहे. पोलिसांचा धाक कमी होऊन पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हे हल्ले करणारे गुंड भाजप पक्षाचे असल्याचे निष्पन्न होत आहे.

असाच एक प्रकार महाराष्ट्र मुंबई पवई पोलीस ठानेत घडला असून 3 भाजपा कार्यकर्त्यांनी कर्तव्यात असलेल्या पोलीस शिपायला रिक्षात डांबून बेदम मार दिला आहे. ही बाब पोलीस यंत्रणेला शरमेने मान खाली घालवणारि असून अश्या या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे असेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.

पोलिस शिपायांवर हल्ला केलेल्या त्या जात, धन आणि सत्तेचा माज चढलेल्या BJP कार्यकऱ्याला माणुसकीच्या दृष्टीने सोडून द्यावे असा फोन करणाऱ्या आमदार राम कदमांचा  तीव्र शब्दात जाहिर निषेध व्यक्त करून पोलिसांच्या समर्थनात RPI D उभा असल्याचेही माकनिकर यांनी सांगितले.

आमदार राम कदम अश्या गुंडांना घेऊन जर राजकारण करत असेल तर लवकरच आमदार साहेबाना आपला घाश्या गुंडाळावा लागेल. पोलिसांवर हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुंडांवर विशेष पथक नेमून गुंड व त्यांच्या समर्थकांना चांगला च धडा शिकविण्यात यावा अशी प्रतिक्रिया डॉ माकणीकर यांनी दिली.

 पोलीस शिपायाला संरक्षित करून गुंड व त्यांच्या समर्थकांना शासकीय कामात अडथळा करण्याचा गुन्हा नोंदऊन आंमंदार राम कदमावरही कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा डॉ. माकणीकर, कॅप्टन श्रावण गायकवाड व राजेश पिल्ले यांनी केली आहे.





महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे