Skip to main content

न्यूज अपडेट : नवी मुंबई आमदार मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा:

न्यूज अपडेट : नवी मुंबई आमदार मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- भाजपच्या बेलापुरमधील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस सानपाडा, प्रभाग ७६ मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त समाजसेवक व आ. मंदाताई म्हात्रे समर्थक असलेले भाजपा कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी विविध स्पर्धाचे तब्बल ७ दिवस आयोजन वाढदिवसानिमित्त केले होते. प्रभाग ७६ मध्ये सप्ताहभर चाललेल्या या वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने हळदीकुंकु समारंभाला स्वत: आ. सौ. मंदाताई म्हात्रेदेखील उपस्थित राहील्या होत्या.

१४ व १५ जानेवारीदरम्यान ब्लॅक अॅण्ड ब्युटी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेसाठी काळ्या रंगाची साडी नेसून व सोन्याचे आभूषण घातलेला फोटो व्हॉटस अपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत २२ महिला सहभागी झाल्या, त्यातील ३ महिलांना पारितोषिकांनी गौरविण्यात आले. १६-१७ जानेवारी रोजी सानपाडा सेक्टर २ येथील खेळाचे मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रभाग ७६ मधील २४ संघ सहभागी झाले होते. यामध्ये सेक्टर ८ मधील संकल्प सोसायटीने विजेतेपद तर सह्याद्री सोसायटीने उपविजेतेपद मिळविले. अविनाश जाधव यांच्या गुरूकृप्पा सोसायटीला तिसरा क्रमांक मिळाला. विजेत्यांना १० हजार रूपये व ट्राफी तर उपविजेत्यांना ५ हजार रूपये व ट्राफी देवून गौरविण्यात आले. १८ जानेवारी रोजी झालेल्या कॅरम स्पर्धेत ४८ पुरूष स्पर्धक तर १४ महिला स्पर्धक सहभागी झाले होते. १० ते १५ वयोगटातील स्पर्धेत ८ स्पर्धक सहभागी झाले होते. पुरूष गटात ३, महिला गटात २ तर लहान मुलांच्या गटात एकाला ट्राफी देवून गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेत २८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील ८ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मोठ्या मुलांच्या ग्रुपमध्ये ३ तर लहान मुलांच्या ग्रुपमधील ५ जणांचा समावेश आहे. वेशभुषा, अभिनय व पाककला स्पर्धाही उत्साहात पार पडली. यातही स्थानिक भागातील स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. फॅशन शोचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यातील विजेतीला मिस सानपाडा पुरस्काराने गौरविण्यात आले.

१० पैठणी, एक सोन्याची नथ, एक फ्रीज, तीन प्रेशर कुकर, ३ इस्त्री, ३ हेअर ड्रायर अशी लकी ड्राच्या माध्यमातून हळदीकुंकु समारंभात सहभागी झालेल्या भाग्यवंत महिलांना आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते देण्यात आले.

हळदीकुंकु समारंभात ७५०हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांशी सुसंवाद साधण्यासाठी बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे स्वत: या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे अडीच तासाहून अधिक काळ आ. मंदाताई म्हात्रे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सिनेकलाकार कमलाकर सातपुते, आशिष पवार (कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम), सुप्रिसध्द नृत्यांगणा व सिनेअभिनेत्री अस्मिता सुर्वे, सुप्रिया तहकर सहभाग झाले होते.

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल ७ दिवस आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यासमवेत भाजपाचे तालुका मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा सौ. आज्ञा गव्हाणे, भाजपा तालुका सचिव रमेश शेटे, तालुका महामंत्री निलेश वर्पे, महिला जिल्हा उपाध्यक्षा निता आंग्रे, महिला तालुका महामंत्री मंगल वाव्हळ, तालुका सचिव सुलोचना निंबाळकर, तालुका महामंत्री प्रियंका वडगाये, तालुका सदस्या प्रतिभा पवार, संचिता जोएल, दिशा केणी, समाजसेविका सौ. शारदा पांडुरंग आमले, सिध्देश आमले, शुभम आमले, अनिशा गव्हाणे, अंतरा गव्हाणे, संकेत पाटील यांनी परिश्रम घेतले

हळदीकुंकू, नृत्य स्पर्धा व, फॅशन शोचे आयोजन आर.नाईक इव्हेंटने (राकेश नाईक), सहनिर्माती अस्मिता सुर्वे या होत्या. फॅशन शोचे जज म्हणून मॉडेल अपूर्वा पाटील यांनी तर पाककलेचे जज म्हणून श्रीशपाल यांनी नियोजन केले होते. बेलापुर विधानसभा मतदारसंघात प्रभाग ७६ मध्ये आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस सर्वाधिक उत्साहात व कार्यक्रमांच्या आयोजनांनी साजरा झाला.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे