Skip to main content

न्यूज अपडेट : शासनाच्या प्रकल्पात चोरी करायला तुमच्या बापाचा प्रकल्प नाही. डॉ. राजन माकणीकर एमआयडीसी झोपूसुयो प्रकरण..!!

न्यूज अपडेट : शासनाच्या प्रकल्पात चोरी करायला तुमच्या बापाचा प्रकल्प नाही. डॉ. राजन माकणीकर एमआयडीसी झोपूसुयो प्रकरण..!!

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- प्रकल्पात चोरी करू देणार नाही, प्रकल्प काही तुझ्या बापाचा नाही, आम्ही येथील भूमिपुत्र, १५ वर्षाखाली उष्टी बिडी मागून पिणारा परप्रांतीय एवढा गडगंज कसा झाला? यासाठी याची व याच्या साथीदारांची वंशावळ संपत्तीची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्दी माध्यमाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसंगी मरण आले तर बेहत्तर, मात्र: या महादलाला जेरबंद केल्याशिवाय राहणार नाही. सत्ता व संपत्तीचा माज उतरविणे अत्यंत गरजेचे आहे. जाती, जातीत तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणारी काका नामक रक्तपिपासू व्यक्ती तरुणांना व्यसनाच्या आहारी लावून स्वतःचा उल्लू सिधा करण्यात धन्यता मानते आहे.

एमआयडीसी उद्योग सारथी झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात भाजपा कार्यकर्ता, खोटे जातीचे दाखले बनवून, निवडणूक लढवून नगरसेवक पद मिळवले व न्यालायातून दोषी ठरल्यानंतर महापालिकेने नगरसेवक पद काढून घेतलेले असतांना सुद्धा आमदारकीचे दिवास्वप्न पाहणाऱ्या महाचोरास कायदेशीर दंडित करण्याचे कर्तव्य सर्वांना मिळून निभावयाचे आहे.

निवडणूक आयोगासह समाजाची दिशाभूल करून निवडून आलेला, शासनाच्या प्रकल्पात दरोडा टाकून गडगंज झालेली परप्रांतीय औलादीची पिलावळ, भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून मूळ झोपडी धारकांच्या सदनिकेवर ताबा मिळवून झोपडपट्टी गुंडांच्या मदतीने घातलेले थैमान माजवणार्या महादलालांचे कट कारस्थान व प्रकल्पात टाकलेला दरोडा उघड केल्या शिवाय, या पांढर पेशी पोषाखातील गुजराती गुंडाचा लोकांच्या भावनेशी केलेला खेळ संपवल्याखेरीज गप्प बसणार नाही. असा निर्धारही यावेळी डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

गणेशवाडी, कोंट्विटा, आंबेडकर नगर परिसरात झोपडपट्टी सुधार योजनेतील इमारती उभ्या असून या इमारतीमधील शेकडो सदनिकेमध्ये विना लॉटरी सोडत घुसखोरी कशी झाली? कोणी केली? कर्ता-करविता कोण आहे? याचा छडा लागल्यास हा महादलाल कोण आहे हे उघडकीस येईल.

घुसखोरांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांचे तोंड उघडण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमावी व प्रकल्पातील खरे चोर मग ते एमआयडीसी चे अधिकारी असतील किंवा विकासकाचे अधिकारी असतील ते उघड होतील असा आशावाद प्रकट केला.

१ फेब्रुवारी २०२१ ला डॉ. राजन माकणीकर यांच्या नेतृत्वात, श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, भाई शिवा राठोड आयोजित, एमआयडीसी कार्यालयावर आकृती हब टावून विकासकाचा नामफलक लावून एमआयडीसी कार्यालयाचे नामकरण करत आहे,  शिवाय धडक मोर्चा ही घेण्यात येणार असल्याची माहाती डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.

येसीपी, डीसीपी व एमआयडीसी पोलीस ठाणे मॅनेज असून माझे विरुद्ध कोणतीही तक्रार घेतली जाणार नाही, तुमचे हातपाय तोडल्यास माझे काही कुणी वाकडे करू शकत नाही अश्या अविर्भावात फिरणाऱ्या माजी भामट्या चोर नगरसेवकाला कायद्याचा वचपा दाखवणारच असल्याचेही डॉ. माकणीकर यांनी कुणाचेही नाव घेता सांगीतले आहे.

सहकारी श्रावण गायकवाड, शिवा राठोड व स्वतःच्या परिवाराच्या जिवीताला धोका असून आमच्या पैकी कुणावरही बलात्कार, विनयभंग, धोका, चोरी, किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे आरोप झाल्यास ते सर्व खोटे असतील आणि जीविताला धोका निर्माण होईल या मागचा सूत्रधार हा विकासकाचा महादलाल म्हणून नावारूपाला आलेला महाठग असेल अश्या स्वरूपाची नोंद सुद्धा पोलीस प्रशासनासह समाज व प्रसिद्धी माध्यमांनी घेण्याची विनंती  त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे