Skip to main content

न्यूज अपडेट : सा. आजची उद्योग नगरी वृत्तपत्राच्या संपादिका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड नवी मुंबई ग्रुप ने दिली विशेष भेट:

न्यूज अपडेट : सा. आजची उद्योग नगरी वृत्तपत्राच्या संपादिका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड नवी मुंबई ग्रुप ने दिली विशेष भेट:

नवी मुंबई (बातमी/ संतोष शिरावले) :- आजची उद्योग नगरी साप्तहिक च्या संपादिका कु. रुपाली वाघमारे यांचा वाढदिवस होता. नवी मुंबईतील वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमीच सहभागी असतात स्वतःचं साप्ताहिक असल्याकारणाने परिसरातील महिलांचे व इतर सामाजिक घटकांचे प्रश्न समस्या त्या नेहमीच      आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. "पत्र नव्हे शस्त्र "या वाक्य नुसार वेळोवेळी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा त्या करतात त्यांचे स्वतःचे यूट्यूब न्यूज चैनल आणि जागरूक महाराष्ट्र या चैनल ला सुद्धा काम करत आहेत व तसेच दैनिक हिंदूसम्राट या वृत्तपत्रात पनवेल विभागाच्या प्रतिनिधी म्हणून देखिल काम करत आहेत.

विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या कार्याची प्रेरणा त्यांचे वडील श्री मोहन वाघमारे साहेब यांच्याकडून मिळाली आहे.

श्री मोहन वाघमारे साहेब हे अग्रलेखाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या "नवाकाळ" या वृत्तपत्राचे  संस्थापक "स्वर्गीय नीळकंठ खाडिलकर साहेब" यांच्यासोबतही  त्यांनी काही काळ पत्रकारितेचं काम केलेले आहे .नुकताच त्यांना पत्रकार संघाकडून "ज्येष्ठ पत्रकार " म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आताही ते "आजचा सातारा सांगली " हे  साप्ताहिक चालवत आहेत.

अशाप्रकारे एक उत्कृष्ट वातावरणात पत्र पत्रकारितेची आवड जोपासलेल्या रूपाली वाघमारे मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, शिवश्री मारुती शंकर (खुटवड, जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री जनार्दन चंद्रकांत (शिरावले, महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री संतोष किसन (शिरावले, जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री गणपत भिमाजी पोळ (जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई), शिवश्री संतोष सिंह परदेशी (जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई) आणि समाजसेविका कार्यकर्त्या सौ. सीमा पाटील उपस्थित होत्या.

याचवेळी रूपाली वाघमारे मॅडम यांनी या दिवसाचं औचित्य साधून आजची उद्योग नगरी हा दीपावली व नववर्ष 2021 चा अंक भेट दिला.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे