Skip to main content

न्यूज अपडेट : नेरूळ सेक्टर २० व २० अ तसेच नेरुळ गांव नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा;विरेंद्र म्हात्रे:

न्यूज अपडेट : नेरूळ सेक्टर २० व २० अ तसेच नेरुळ गांव नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा;विरेंद्र म्हात्रे:
नवी मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- नेरूळ सेक्टर २० व २० अ तसेच नेरुळगांव नोडमध्ये मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ पालिका विभाग अधिकारी दत्तात्रेय  नांगरे यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ९३ व ९५ मध्ये नेरूळ सेक्टर २० व २०अ  तसेच नेरुळ गांध नोडचा समावेश होतो. या ठिकाणी कोठेही बाह्य वर्दळींच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही पहावयास मिळत नाही. नेरूळ  सेक्टर विसमधील  तेरणा हास्पिटल ते नेरुळ सेक्टर विसमधील तलाव यादरम्यान  सकाळी व रात्री मोठ्या संख्येने मॉर्निग वॉकसाठी तसेच रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी  येत असतात. नेरुळ रेल्वे स्टेशन परीसरात रात्रीच्या वेळी मार्केट भरतो त्या मार्केट मध्ये रात्रीच्या वेळी भाजी व ईतर वस्तू घेण्यासाठी नागरिकांनची मोठ्या प्रमाणात गर्दी  असते. मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर वाहने विशेषत: दुचाकी सुसाट वेगाने जात असतात. अपघात झाल्यास सीसीटीव्ही नसल्याने काहीही अंदाज लागत नाही. अंर्तगत भागात वाटमारीच्याही घटना घडल्या आहेत. परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनाही झाल्यास आहेत. पोलिसांना आजही तपासात अडथळे येत असतात. 

तसेच, या परिसरात अंर्तगत व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि गुन्हा – अपघात घडल्यास पोलिसांनाही तपासात सहकार्य मिळून शोध लवकर लावण्यास मदत होईल. कायदा व सुव्यवस्थेच्या उपयुक्ततेसाठी समस्येचे गांभीर्य पाहता आपण या ठिकाणी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विरेंद्र म्हात्रे यांनी केली.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे