न्यूज अपडेट : बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके यांचे नवी मुंबई मधे वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचे मोठ्या थाटात उदघाटन सोहळा पार:
न्यूज अपडेट : बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके यांचे नवी मुंबई मधे वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचे मोठ्या थाटात उदघाटन सोहळा पार:
● बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके व सौ. अरुणा कटके यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे सिवुड मधे थाटामाटात उदघाटन सोहळा
●सौ. अरुणा कटके यांनी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम देखिल आयोजीत केला
● वंचित बहुजन आघाडीचा झेंडा महापालिकेवर फडकावून व महापौर आमचाच असेल; महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई ठाकूर
● नवी मुंबई महापालिका निवडणूक स्व बळावर सर्वजागा लढवणार
नवी मुबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात थोड्याच दिवसात सर्व समाजातील वंचित व तळागळात पोहचलेला व खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भुमिका वंचित समाज व बहुजनांचे लोकप्रिय ज्ञानवंत नेते मा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी घराघरात पोहचली आसुन शहर व गावोगावी नविन जनसंपर्क कार्यालय होत आहेत. यामधे नवी मुंबई ही मागे नसून सिवुड नेरूळ येथे अशोक सोनवणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ तसेच महाराष्ट्रात रणरागिनी म्हणून प्रसिध्द असलेल्या मा. रेखाताई ठाकूर (महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष) व आयु. गोविंद दळवी (महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते), नवी मुंबई निरीक्षक आयु. आनंद जाधव व नवी मुंबई निरीक्षक आयु. सुमेध कुशलवर्धन तसेच आयु. शिल्पाताई रणदिवे (महिलाअध्यक्ष नवी मुंबई जिल्हा) आदी मान्यवराच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात बेलापूर तालूका अध्यक्ष नैनेश कटके व सौ. अरुणा नैनेश कटके यांच्या कार्यालयाचे उदघाटन मान सौ. रेखाताई ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महिला वर्ग देखिल मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तसेच महिलांसाठी यावेळेस हळदी कुंकू कार्यक्रम देखील सौ. अरुणा कटके यांनी आयोजीत केला होता.
तसेच, सदर प्रसंगी मा. रेखाताई ठाकूर या म्हणाल्या की नवी मुंबई मधील सर्व जाती धर्म सत्तेपासून वंचित राहीलेला फार मोठा समाज वंचित आघाडीकडे येथ आहे तर महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकीत महाराष्ट्राने पाहीले आहे निकाला नंतर आमची ताकत कळेल. पुढे त्या म्हणाल्या आम्ही नवी मुंबई महापालिका निवडणूक स्व बळावर सर्वजागा लढवणार आसून यामधे ५१% जागेवर महिलाना उभेकरून लोकउभयुक्त सता जनतेचीच असेल हे नवे जन विचार घेउन आम्ही ॲड. मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मर्गदर्शनाखाली प्रचंड विजयी मिळवून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा महापालिकेवर फडकावून व महापौर आमचाच असेल असे देखिल त्या वेळेस म्हणाल्या.
तसेच यावेळी बेलापूर बेलापूर तालुका अध्यक्ष नैनेश कटके व सौ. अरुणा कटके हे देखील म्हणाले की वंचितचे आपले ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप स्ट्रॉन्ग नेतृत्व आहे, मी आपल्या लोकांन साठी आपल्या माणसांन साठी मला खूप काही करायचे आहे, ही जी इलेक्शन संधी आली आहे ती खूप मूल्यवान आहे माझ्यासाठी लोकांची समस्या आम्ही सोडवू व ईथे येणारा प्रत्येक माणूस हा आपला आहे आणि त्यांच्या ज्याही समस्या आहेत त्याला पाठींबा देवून नक्कीच पूर्ण करू पण त्या साठी जनतेने देखील पुढे येऊन आपल्या समस्या आमच्या समोर आणाव्यात आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत, तर सौ. अरुणा कटके म्हणाल्या की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष एका समाजाचा नसुन हा सर्व जाती धर्माचा पक्ष आहे, ईथे हिंदू ही आले मुस्लिम पण आले गुजराती मारवाडी मद्रासी सर्व धर्म आले, आपण जसा सर्वांशी संवाद साधणार जसा परिचय साधणार त्यावेळी लोक पक्षाकडे नाही व्यक्ति कडे बघितले जाणार व तसेच महिलांना १००% आरक्षण दिले तर महिला या सर्व गोष्टीत सगळ्या घडामोडीत पुढे निघून येतील.
तसेच सदर वेळी आयोजकांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले सदर कार्यक्रमाला विविध जाती-धर्मातील बांधवांनी व भगिनींनी आदरणीय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्याला प्रभावित होऊन प्रचंड संख्येने पक्ष प्रवेश केला. सदर कार्यक्रमाचे आयोजक वंचित नेते आयु. नैनेश कटके, बेलापूर तालुका अध्यक्ष यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पुढील वाटचालीस मान्यवरानी खूप खूप शुभेच्छा दिल्या या वेळी मोठया संख्येने लोकजन उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.