Skip to main content

न्यूज अपडेट : प्रभाग ९३-९५ मधील अंर्तगत भागातही रंगरंगोटी करून त्यावर आगरी - कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करा:

न्यूज अपडेट : प्रभाग ९३-९५ मधील अंर्तगत भागातही रंगरंगोटी करून त्यावर आगरी - कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करा:

नवी मुंबई (प्रतिनिधी/काशिनाथ नाईक) :- नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव परिसरातील अंर्तगत भागातही गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून  त्यावर आगरी व कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसकमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून नवी मुंबई शहरात सुशोभीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याअंर्तगत भिंतींची, पदपथाच्या खालील सिमेंटच्या ठोकळ्यांची, बाह्य भागातील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी सुरू आहे. त्यावर सुभाषिते तसेच वेगवेगळी चित्रे रंगविली जात आहेत.  प्रभागाचा बकालपणा घालविण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्वप्रथम  महापालिका आयुक्त व  महापालिका प्रशासनाचे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसकमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच  आभार मानले आहेत.

नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव मध्ये अधिकांश भाग हा साडेबारा टक्के व सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या स्वच्छता अभियानातंर्गत आतंर्गत मुख्य रस्त्यावरील गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून आपले कार्य थांबवू नये. तर प्रभागातील अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंती, सार्वजनिक मैदाने, उद्यानांच्या संरक्षक भिंतीची  रंगरंगोटी करून त्यावर आगरी कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र रंगविण्यात यावीत. रंगरंगोटी, सुभाषिते, रंगविली जाणारी छायाचित्रे याचा  दर्जाचा चांगला असावा, सुमार नसावा. अंर्तगत भागातही सुशोभीकरण, रंगरंगोटी व  आगरी-कोळी नागरिकांच्या सुभाषिते रंगविल्यास खऱ्या अर्थाने प्रभागात स्वच्छता अभियान सार्थकी लागल्याचे स्थानिक रहीवाशांना जवळून पहावयास मिळेल. स्वच्छता अभियान राबविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना आपण नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव परिसरातील अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या तसेच सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणाच्या संरक्षक भिंतीची  रंगरंगोटी  करून त्यावर सुभाषिते व चित्रे रंगविण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची  मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे