Skip to main content

न्यूज अपडेट : नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव..!!

न्यूज अपडेट : नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव..!!

पनवेल (प्रतिनिधी) :- स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९५ व्या जयंती निमित्त नवी मुबंई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव घेऊन तो सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात व ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. दि.बा.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंती निमित्त विद्यालयात ऑनलाईन वक्तृत्व  ,निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांची भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ या फेडरेशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते विद्यालयाच्या व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव करून सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्याकडे सुरेश पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी खासदार सुनील तटकरे व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

याप्रसंगी कामगार नेते महेंद्र घरत, कामगार नेते सुरेश पाटील, उद्योगपती चेतन साळवी, विजय शिरढोणकर, माजी सभापती नरेश घरत, जासई गाव अध्यक्ष यशवंत घरत, विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे,अविशेठ पाटील, मेघनाथ म्हात्रे, संजय ठाकूर, सुनिल घरत, अमृत ठाकूर, माणिक म्हात्रे, गोपीनाथ ठाकूर, सरपंच संतोष घरत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या,जासई ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग सर, उपमुख्याध्यापक खाडे सर, पर्यवेक्षक साळुंखे सर, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेखसर विद्यालयाचे सर्व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे