Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

ब्रेकिंग न्यूज: संजय राठोडा यांची मुख्यमंत्र्याकडे विनंती..राजीनामा देतो, चौकशी झाली की स्वीकारावा:

ब्रेकिंग न्यूज: संजय राठोडा यांची मुख्यमंत्र्याकडे विनंती..राजीनामा देतो, चौकशी झाली की स्वीकारावा:  ■ संजय राठोड 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. त्यावेळी राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजले आहे. नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव वाढत आहे. अधिवेशनाच्या आधी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिलाय. त्यामुळे आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा' वर मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली आणि राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि संजय राठोड यांच्यादरम्यान चर्चा सुरु आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित आहेत. आता संजय राठोड यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं

ब्रेकिंग न्यूज: आता...बसपा प्रमुख मायावतींना रामदास आठवलेंची खास ऑफर..!!

ब्रेकिंग न्यूज: आता...बसपा प्रमुख मायावतींना रामदास आठवलेंची खास ऑफर..!! ● जी लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे बसपा प्रमुख मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे २०२२ च्या आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत युती करेल. नवी मुंबई (बातमी/लखनौ) :– गेली अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लखनौ येथे बोलत होते, या कार्यक्रमात आठवलेंनी बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना थेट रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. आठवले 2 दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत, तत्पूर्वी आठवले यांनी उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक

ब्रेकिंग न्यूज: पूजा चव्हाणच्या बहिणीची भावनिक पोस्ट; आमच्या कुटुंबाला जीव द्यावा लागेल, बदनामी थांबवा:

ब्रेकिंग न्यूज: पूजा चव्हाणच्या बहिणीची भावनिक पोस्ट; आमच्या कुटुंबाला जीव द्यावा लागेल, बदनामी थांबवा: नवी मुंबई (बातमी/औरंगाबाद) :- पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेचे संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. राज्य पातळीवर मोठ्या हालचाली सुरू असताना मात्र मृत पूजाच्या कुटुंबीयांनाही मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागत आहेत. काही माध्यमांच्या दाव्यानूसार पूजा आणि संजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. शिवाय राठोड यांनी पूजाला अनेक महागडे गिफ्ट्सही दिले होते. यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत असे भावनिक आवाहन दियाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केले आहे. पोस्टमध्ये ती म्हणतेय की, ”वृत्तमाध्यमे सत्य लोकांसमोर यावे यासाठीच असतात ना? पंकजा मुंडे, प्रितम मुंडे त्यांच्यासोबतच्याही पूजाच्या पोस्ट आहेत. त्या का नाही कोणी व्हायरल करत? जर त्

न्यूज अपडेट: मराठी भाषा वाढली पाहिजे..ती टिकली पाहिजे..पण कशी..??

न्यूज अपडेट: मराठी भाषा वाढली पाहिजे..ती टिकली पाहिजे..पण कशी..?? नवी मुंबई (बार्शी/अनिल देशपांडे) :- आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत...सर्व सामान्य लोकांसाठी मराठी अजून उपलब्धच नाही हे या ठिकाणी खेदाने म्हणावे वाटते. एखादया मध्यमवर्गीय कुटूंबात ज्यावेळी मुल जन्मते त्यावेळी त्या नवराबायकोचा पहिला प्रश्न हा वासून उभा रहातो की आपल्याला बाळाला कोणत्या इंग्लिश मिडीयम मध्ये घालायचे? आणि इथूनच आपल्या मराठी भाषेची फरफड चालू होते.  उच्च शिक्षित, उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय या सर्वाचा प्रथम कल हा इंग्लिश माध्यमाच्या  शाळातून मुलांना शिक्षण देण्याकडे कल असतो, आणि ही मुले जशी जशी मोठी होत जातात तसे तसे पालकांना आणि मुलाना कळते की आपल्याला यातील काहीच आता येत नाही. मग आपली चूक झाली हे पालकांच्या लक्षात येते आणि त्यावेळी वेळ खूप पुढे जाऊन त्या बालकाचे नुकसान झालेलं असतं. बालकांना जो पर्यंत मातृभाषेतून १+१=२ हा कन्सेप्ट पक्का होत नाही तो पर्यंत त्याला जगातील कोणत्याच भाषेतून काही कळणार नाही...मराठी साठी आग्रह धरणारे फक्त गावातील दुकानाच्या पाट्या इंग्रजी च्या ऐवजी मराठी मध्ये करण्या

न्यूज अपडेट: मार खाऊन पोलिसात जाण्यापेक्षा मारून पोलिसात जा..; पँथर डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट: मार खाऊन पोलिसात जाण्यापेक्षा मारून पोलिसात जा..; पँथर डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी/नीलेश भोईर) :- जातीवादी बांडगुळाचा मार खाऊन पोलिसात जाण्यापेक्षा मारून पोलिसात जा, अश्या व्यक्तीला कायद्याचे संरक्षण देऊ, असा सल्ला वजा दिलासा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी अन्याय पीडितांना दिला. देशासह राज्यात जातीवादाच्या मानसिकतेतून असंख्य भ्याड हल्ले होत असून यात दलित मुस्लिम बौद्ध जाती जमातींना टार्गेट केलं जातं आहे, जाती जमातींच्या व्यक्तींना त्यांच्या वस्तीवर जाऊन तर घरात घुसून सामूहिक हल्ला केला जात आहे, ही बाब मानवतेला शोभणारी नाही.  अशा प्रसंगी अन्याय सहन न करता प्रतिउत्तर देणे महत्वाचे ठरते, माझा या तमाम जाती जमातींना सल्ला असेल की अजिबात मार खाऊ नका. तोडून फोडून टाका जातिवादाला. कायद्याची लढाई डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या बाजूने लढेल.  किती वर्षे पार्टी संघटना व संस्थेच्या माध्यमातून निषेध आंदोलने करायचे, आता बस्स..!  सर्व ताकदीनिशी प्रतिउत्तर महत्वाचे होय. वस्तीत ही लोक घुसतातच कशी? मग वस्तीतील

न्यूज अपडेट: तळोजा येथे भरदिवसा 30 ग्रॅम वजनाचे सोने घेवून महिला पसार:

न्यूज अपडेट: तळोजा येथे भरदिवसा 30 ग्रॅम वजनाचे सोने घेवून महिला पसार: तळोजा (प्रतिनिधी/दीपा वाघमारे) :- तळोजा पोलीस चौकीपासून अगदी काही अंतरावर आणि लोकांची ये जा असणार्‍या रस्त्यावर ज्वेलर्स दुकानातून एका बुरखा घातलेल्या महिलेने 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा दुकानदाराच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने व्यापारी वर्गाला चांगलाच धक्का बसला आहे. तर, संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहेत.      तळोजा वसाहती सेक्टर 10 मधील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर एका इमारतीत कैलाशचंद सोनी यांचे ज्वेलर्स दुकान आहे. बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास  सोने घेण्याचा बहाण्याने एक बुरखा घातलेली महिला दुकानात येवून दागिन्याचे मोल भाव करीत असताना विक्री साठी ठेवण्यात आलेले 30 ग्राम सोनसाखळी घेवून दुकाना बाहेर दुचाकी घेवून उभा असलेल्या दुचाकी चालकांसोबत तिथून पळ काढला.  या सोन्याची किंमत अंदाजे दीड लाखाच्या घरात असल्याचे समजले. विशेषतः ज्वेलर्सच्या दुकानाला लागून कटरली, मोबाईल शॉप आहे. तसेच बाहेरच चहा आणि फळ भाजी विक्रेते असतात. तसेंच दुकाना समोर

न्यूज अपडेट: कोमसाप युवाशक्तीचा ऑनलाईन भाषा दिन..!!

न्यूज अपडेट: कोमसाप युवाशक्तीचा ऑनलाईन भाषा दिन..!! नवी मुंबई (मुंबई- प्रतिनिधि/गुरुदत्त वाकदेकर) :- जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती या संस्थेने नवोदित कवींसोबत ऑनलाईन भाषा दिन साजरा करायचे ठरविले आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोमसाप युवाशक्तीनेही बालक, पालक, शिक्षक आणि युवावर्ग यांच्यासाठी साहित्यातील अनेक उत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले होते. "PENNED" हा उपक्रम खास युवा लेखकांसाठी घेतला गेला होता. मराठी भाषा दिनानिमित्त  "PENNED" या उपक्रमात आताच्या काळातील सकस काव्यलेखन करणार्‍या प्रथमेश पाठक, पवन नालट, अक्षय शिंपी यांच्या सोबत कविता, कवितासंग्रह याबाबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन कवींसोबत प्रणय चव्हाण संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना कोमसाप केंद्रीय युवाशक्ती प्रमुख दीपा ठाणेकर यांची आहे .  कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टाच्या फेसबुक पेजवर क्लिक करा: https://www.facebook.com/komsapyuvashakti /    हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम दर्शकांना पाहता येईल.  महत्त्वाची टीप : सर्व

न्यूज अपडेट: तर...अश्या प्रवृत्तींना आरपीआय डेमोक्रॅटिक घरात घुसून ठेचून काढेल:

न्यूज अपडेट: तर...अश्या प्रवृत्तींना आरपीआय डेमोक्रॅटिक घरात घुसून ठेचून काढेल: नवी मुंबई (प्रतिनिधी/काशिनाथ भोईर) :- संबंध देशात जातीव्यवस्था प्रस्थापित होत असून दलित मुस्लिम बौद्ध जाती व जमातींवर जीवघेणे हल्ले होत आहेत, सरकारने जातिवाद्यांना आवरले नाही तर आरपीआय डेमोक्रॅटिक अश्या प्रवृत्तींना घरात घुसून ठेचून काढेल असा इशारा पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.  नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शिवणी गावात धक्का लागल्याचे कारण सांगुन बौद्ध तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी मृत्युशी झुंज देत आहे, जखमीला औरंगाबाद येथील सरकारी हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  देश स्वातंत्र्य होऊन सत्तरी लोटली, तरीही इथली जातिव्यवस्था नष्ट होत नाही. जातीद्वेशातुन आजही कत्तली केल्या जात आहेत, इज्जती लुटल्या जात आहेत, दंगली घडविल्या जात आहेत. मानवतेला कालिंबा फासणाऱ्या घटना देशात सदैव घडत आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालुन वेळीच ठोस पाऊल उचलुन आरोपीवर कडक कारवाई करावी. अन्यथा रिपब्

न्यूज अपडेट: दक्ष नागरिक संस्थेच्या राष्ट्रीय महासचिव पदी प्रभूदास भोईर यांची नियुक्ती:

न्यूज अपडेट: दक्ष नागरिक संस्थेच्या राष्ट्रीय महासचिव पदी प्रभूदास भोईर यांची नियुक्ती: ● राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र पनवेल (प्रतिनिधी/प्रांजल नाथ) :- सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारी व मानवी न्याय हक्कासाठी लढणारी अशी जनसामान्यात ओळख असलेल्या दक्ष नागरिक संस्थेने संपूर्ण भारतातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रत्येक राज्यात नवीन कार्यकारणी बनवण्याचे काम सुरू आहे. अनेक विभाग संस्थेने सुरु केले आहेत त्यात  महिला, युवा, अल्पसंख्याक, रोजगार, ट्रान्सपोर्ट, कामगार, पत्रकार, चित्रपट आदी विभागांचा समावेश केला आहे. कळंबोली येथील समाजसेवक प्रभूदास भोईर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून यांची राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर  यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. संस्था वाढवण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे तसेच नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे मत प्रभूदास भोईर यांनी व्यक्त केले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्

न्यूज अपडेट: रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा २०२१:

न्यूज अपडेट: रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा २०२१: उरण (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन, उरण यांच्या विद्यमाने २० वा युवा महोत्सव २०२१ अंतर्गत बुधवार दिनांक ३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, ता. उरण, जि. रायगड येथे काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. तसेच विषयाचे बंधन नाही. परंतु विषय राजकीय तेढ निर्माण करणारा, कुणाच्या भावना दुखावणारा आणि अश्‍लील नसावा. कविता स्वरचित व मराठीत असावी. स्पर्धक रायगड जिल्ह्यातील असावा. कविता सादरीकरणाची वेळ फक्त साडे तीन मिनिटे असेल.  बक्षिसे - प्रथम- रू.१५००/-  द्वितीय- रू.१३००/-  तृतीय- रू.११००/- आणि, उत्तेजनार्थ - प्रथम- रू. ५५०/-  द्वितीय- रू.४५०/-  तृतीय- रू. ३५०/-  आणि सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या नंबर पैकी फक्त एका नंबरशी संपर्क साधून आपले नाव दिनांक २ मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदवावे. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण लगेचच होईल अश

न्यूज अपडेट: Zee News च्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा धडक मोर्चा:

न्यूज अपडेट: Zee News च्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा धडक मोर्चा: नवी मुंबई (मुंबई- प्रतिनिधी/अशोक वाघमारे) :- टाईम्स मॅगॅझीन ने जाहीर केलेल्या जागतिक उभरत्या शंभर नेत्यांच्या यादीत चंद्र शेखर आजाद (Chandra Shekhar Aazad) यांचे नाव आल्याने खवळलेल्या जातीयवादी zeenews ने आझाद भाईंचा फोटो दाखवत आपण यांना ओळखता का म्हणून आपल्या काही चिंधी पत्रकांरांकरवे एक न्युज चालवली. ही चंद्रशेखर आझाद यांची बदनामीच जागतिक स्तरावर एखाद्या भारतीय नेत्याची ओळख होणे ही खरंतर गर्वाची बाब पण केवळ तो नेता मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्यांची अशी बदनामी करण्याची घाई झी न्यूज चॅनल ने केली आणि वैश्विक स्तरावर भारतीय मिडिया ही किती खालच्या स्तरावर उतरू शकते याचं प्रदर्शन मांडले. एकप्रकारे भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न या चॅनल ने केला. या यादीत इतरही काही भारतीय वंशाच्या नेत्यांची नावे जाहीर झाली परंतु केवळ ते उच्चवर्णीय होते म्हणून त्यांच्या विरोधात "आपण यांना ओळखता का" असं कॅम्पेन चालवावंसं झी न्यूज ला वाटलं नाही. मग सरळसरळ जातीयवादी चेहरा घेऊन जर झी न्यूज समोर येत असेल तर आझाद सम

न्यूज अपडेट: "साहित्यवेदी" संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण..!!

न्यूज अपडेट: "साहित्यवेदी" संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण..!! नवी मुंबई (मुंबई- प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून चार उच्च माध्यमिक अध्यापकांच्या संकल्पनेतून विकसित केलेल्या "साहित्यवेदी" ह्या संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद व नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास, कोशसंपदा, सुलेखनकला व्यवसाय, युवा साहित्यकार आढावा, सर्व वाङमयीन नियतकालिकांची ओळख व कार्य, महाराष्ट्र बोलींचे नमुने व परिचय, महाराष्ट्रातील शताब्दी ग्रंथालयांचे एकत्रित दालन, अनेक साहित्यकारांच्या निवासभेटीची परिक्रमा अशा अनोख्या विषयांनी साहित्याचा यज्ञ संपन्न करण्यासाठी सज्ज "साहित्यवेदी" असलेले हे पहिलेच व नावीन्यपूर्ण असे संकेतस्थळ आहे. यावेळी बोलतांना मा. भाषामंत्री सुभाष देसाई म्हणाले, “साहित्यवेदी या संकेतस्थळामुळे मराठी भाषा व साहित्य यांची सर्व अंगे एकत्रित मिळती

न्यूज अपडेट: "ऐक्यम्" शॉर्ट फिल्म देत आहे सामाजिक मन:स्वास्थ्य जाणण्याचे माध्यम:

न्यूज अपडेट: "ऐक्यम्" शॉर्ट फिल्म देत आहे सामाजिक मन:स्वास्थ्य जाणण्याचे माध्यम: ● शॉर्ट फिल्म "ऐक्यम्" मध्ये धर्म,जात,पंथ,भाषा यांनी विभिन्न असलो तरी आपण एक आहोत असा वेगळा संदेश लोकांना दिला आहे. ● आपल्याला संविधानाने हा सर्वोच्च सन्मान आपल्याला बहाल केला आहे. नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- आज या बदलत्या काळात मुलांच्या व मोठ्यांच्या हाती मोबाईलच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात जगाचे ज्ञान आले आहे. हल्ली तरुण वर्ग हा मोठ्या पडद्यापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्यास जास्त आवडते. युवकांच्या याच सवयीला दिशा देण्याचा प्रयत्न "ऐक्यम्" या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून केला असून, या विषयावर सामाजिक भान जनजागृत करण्याकडे नेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्थरावरील 185 सेकंदाची ही शॉर्ट फिल्म करण्यात आली आहे. ऐक्यम् या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजाला एक चांगला सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. या शॉर्ट फिल्म मध्ये अभिनेते रोहित नाईक यांच्या वेग वेगळ्या भूमिका रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. याचे कथानक संवादापेक्षाही चित्रीकरणच बरेच काही सांगून गेले आह

न्यूज अपडेट: मनोज मेहेर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले निर्देश; ग्रामस्थांच्या घरी शौचालय बांधण्यास अनुदान द्या:

न्यूज अपडेट: मनोज मेहेर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले निर्देश; ग्रामस्थांच्या घरी शौचालय बांधण्यास अनुदान द्या:  नवी मुंबई (नेरुळ- प्रतिनिधी/काशिनाथ नाईक) :- नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील झोपडपट्टीधारकांना गेली अनेक वर्षापासून घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला निवासी पर्याय म्हणून राज्य सरकारने शासकीय गरजेपायी नवी मुंबई शहर विकसित केले आहे. येथील स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांनी तसेच अन्य ग्रामस्थांनी आपली भातजमिन तसेच अन्य जागेचा भुसंपादनासाठी सहकार्य करताना सरकारला मदत केली आहे. सुरूवातीला जिल्हा परिषद व आता त्यानंतर महानगरपालिका प्रशासन  येऊनही गावा-गावात विकासाच्या नावाने बोंबाबोंब असल्याने कॉलनी परिसर विकसित होत गेला व गावठाण परिसर प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बकालच राहीला आहे.  तसेच आजही गावातील अनेक ग्रामस्थांच्या घरामध्ये शौचालय नसल्याने त्यांना महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागत आहे. महापालिका प्रशासन घरामध्ये शौचालय उभारणीसाठी झोपडपट्टी परिसर, स्लम एरिया, चाळीतील र

न्यूज अपडेट: नवी मुंबईतील नाल्यांमध्ये आढळून आली मगर, वनविभागानं घेतल ताब्यात केली सुटका..।।

न्यूज अपडेट: नवी मुंबईतील नाल्यांमध्ये आढळून आली मगर, वनविभागानं घेतल ताब्यात केली सुटका..।। ● महानगर पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत मगर आढळून आल्यानं  मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तर शेवटी ही मगर मंगळवारी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. नवी मुंबई (बेलापूर-प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- महानगर पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत मगर (Crocodile) आढळून आल्यानं  मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तर सदर मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग दुर्लक्ष करीत असल्यानं भविष्यात जर कुठला अनुचित प्रकार घडला त्यास जबाबदार कोण असा सवाल स्थानिकांनी केला होता. अशात अखेर ही मगर मंगळवारी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. विशेष बाब म्हणजे ही मगर गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत होती. अशात अखेर वनविभागानं मंगळवारी तिची सुटका केली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच खाडीत एक मगर आढळून आली होती. यानंतर मगरीला पकडून इतरत्र स्थलांतरीत करावं अशी मागणी बेलापूर गावातील स्थानिक ना

न्यूज अपडेटे: कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार : आ. प्रशांत ठाकूर !!

न्यूज अपडेटे: कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार : आ. प्रशांत ठाकूर !! ● विस्तारित कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन   पनवेल (बातमी/रुपाली वाघमारे) :- कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते, त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्र येथे केले. ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की, तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये माथाडी, ट्रान्सपोर्ट, जनरल असे विविध प्रकारचे कामगार गणले जातात. या सर्व कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची गरज लागते. मला नक्की खात्री आहे नंदकुमार म्हात्रे त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितपणे चांगले नेतृत्व देती

न्यूज अपडेट: ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे निधन !!

न्यूज अपडेट: ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे निधन !! > ठाणे शहराच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. तीन वेळा ठाण्याचं महापौरपद भूषवणारे अनंत तरे यांचे आज येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ● ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे निधन. ● गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात सुरू होते उपचार. ● कोळी समाजाच्या न्यायहक्कांसाठी उभारली होती अनेक आंदोलने. नवी मुंबई (ठाणे/प्रतिनिधी) :-  ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे आज ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. अनंत तरे यांच्यावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, सतत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. तरे यांच्या निधनाने ठाण्याच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन महिने ते उपचार घेत होते. त्यातच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटि

न्यूज अपडेट: आता लॉकडाऊन नको, कडक निर्बंध व उपाययोजना महत्वाच्या; डॉ राजन माकणीकर:

न्यूज अपडेट: आता लॉकडाऊन नको, कडक निर्बंध व उपाययोजना महत्वाच्या; डॉ राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी) :-  कोरोना संक्रमण राज्यात फोफावत असून आता लॉकडाऊन कारण्यापेक्षा कडक निर्बंध व उपाययोजना कराव्यात असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले. सप्टेंबर पासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने या महिन्यात पुन्हा डोके वर काढले आहे, फेब्रुवारीपासून दररोज शेकडोने संख्या वाढत आहे, की फार चिंतेची बाब आहे. पुन्हा जर लॉकडाऊन झाला तर गरिबांचे फार मोठया प्रमाणात भूकबळी होऊन देशात मृत्यूचे तांडव उभारेल, गोर गरिबांच्या चुली थंडावल्या आहेत, हाताला पूर्वपणे काम नाही, खिसा फाटका झाला आहे, महागाई वाढली असून पोटाची खळगी कशी भरावी याचा प्रश्न आजही सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कर्जावर घेतलेले दुचाकी चारचाकी वाहनांची हप्ते अजून थकीत आहेत, बँका कडून सक्तीची वसुंली केली जात आहे, प्रसंगी वाहने ओढून घेतली जात आहेत, शेतकरी तर पारचा बुडाला आहे, हातावर पोट असलेल्याचे फार बेहाल झालेले आहेत, लॉक डाऊन चे आर्थिक व भौतिक परिणाम

न्यूज अपडेट: ऐरोलीत विजेचा झटका लागून एकाचा लहान मुलांचा जागीच मृत्यू..!!

न्यूज अपडेट: ऐरोलीत विजेचा झटका लागून एकाचा लहान मुलांचा जागीच मृत्यू..!! नवी मुंबई (ऐरोली-प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- ऐरोली सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा २ येथील इमारतीच्या बाहेर लेन्सकार्ट दुकानासमोर कामानिमित्त लोखंडी परांची ठेवण्यात आली होती. त्या परांचीची तिची उंची सुमारे २५ फुटाहुन अधिक असल्याने वरून जाणाऱ्या विद्युत मेन लाईनला परांची चिटकल्याने त्या परांची मध्ये करंट उतरला आणि तेथील सिग्नल वर पिशव्या विकणाऱ्या एका लहान मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.  तर हा विजेचा झटका इतका भयानक होता की, १० मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले. सदर घटना सकाळी ८.३० वाजता घडली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन व एमएसइबी चे कर्मचारी हजर झाले. याबाबत सदर सोसायटीने काम करण्यापूर्वी कोणतीही परवानगी न घेतल्याचे एमएसइबी चे अधिकारी जाधव यांनी सांगितले. तसेच याबाबत आम्ही सदर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसइबी चे अधिकारी बोधनकर यांनी सांगितले तर पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुर

न्यूज अपडेट: युवासेनेची विद्यार्थी हितासाठी मागणी; दहावी व बारावी परीक्षेच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवणार..!!

न्यूज अपडेट: युवासेनेची विद्यार्थी हितासाठी मागणी; दहावी व बारावी परीक्षेच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवणार..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे बंद असलेले शाळा-कॉलेज त्यात बाहेरून बसणाऱ्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता आले नाही त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या युवासेनेकडे तक्रारी येत होत्या त्याची दखल घेत युवासेनेचे स्वप्नील सूर्यकांत मढवी ऐरोली उपविधानसभा अधिकारी यांनी नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, बोर्डाचे अध्यक्ष श्री के बी पाटील साहेब तसेच सहाय्यक सचिव श्री भोज सर, प्रशासकीय  अधिकारी श्रीमती सुमन मॅडम ह्यांना भेटून चर्चा केली विषयाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असल्या कारणाने त्वरित मान्यता घेणार असे देखील आश्वासन दिले आहे. यावेळेस सोबत युवासेनेचे श्री किसन सावंत, युवासेना मुंबई समन्वयक,  श्री राज सोनावणे, श्री मितेश लोटलीकर ,ऐरोली विधानसभा समन्वयक श्री सुरजजी नाईकरे ,ऐरोली उपविधानसभा अधिकारी श्री नरेश सकपाळ उपस्थित होते. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा,

न्यूज अपडेट: नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकला; मनोज मेहेर:

न्यूज अपडेट: नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकला; मनोज मेहेर: नवी मुंबई (नेरुळ- प्रतिनिधी/नीलेश भोईर) :- राज्यात कोरोनाचा पुन्हा होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबई महानगरपालिकेची  सहावी सार्वत्रिक निवडणूक चार-सहा महिने पुढे ढकलण्याची लेखी मागणी सारसोळेचे ग्रामस्थ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी लेखी निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक उच्चांक आपल्या महाराष्ट्र राज्यातच झालेला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने केलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत. राज्य सरकारचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी पायाला भिंगरी लावून परिश्रम केले आहेत. कोरोना कमी झाला असे वाटत असतानाच कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याचे राज्यात पहावयास मिळू लागले आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी होवू लागल्याने मास्कविना फिरणे, गर्दीत मिसळणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकार वाढीस लागले आहेत.  त्यातच महापालिकेच्या सहाव्या सार्वत

न्यूज अपडेट: धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, लग्न समारंभ, मोर्चांवर बंदी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे:

न्यूज अपडेट: धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, लग्न समारंभ, मोर्चांवर बंदी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे: नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार जनतेशी संवाद साधला. यात लोकांनी अनलॉकच्या टप्प्यात घातलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही परिस्थिती ओढावली असून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तविली आहे. यामुळे एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ‘राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच “राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल” असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- > कोरोना लसीचे साइड इफेक्ट्स नाही > सामान्यांसाठी लवकरच लस उपलब्ध होणार > कोरोना विरुद्ध लढायचे असेल तर मास्क हीच आपली ढाल आहे त्यामुळे मास्क वापरणे अनिवार्य आहे > कोरोनाची दुसरी

न्यूज अपडेट: नवी मुंबई भूषण लावणी सम्राटचा किताब पटकावला श्री. आशिमिक आनंद कामठे यांनी..।।

न्यूज अपडेट: नवी मुंबई भूषण लावणी सम्राटचा किताब पटकावला श्री. आशिमिक आनंद कामठे यांनी..।। नवी मुंबई (प्रतिनिधी) :- देश विदेशात लावणीची कला सादर करून अनेक रसिक प्रेक्षकांचे मन जिंकणारा तसेच नवी मुबई येथील लावणी सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. आशिमिक आनंद कामठे या तरुणाने नवीमुंबई भूषण लावणी सम्राट चा मानकरी ठरला आहे.  जाणून घेऊयात आशिमिक बद्दल थोडक्यात..!! लावणीचा प्रवास- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे अंतर्गत संत शिरोमणी कलामंच्यातून श्रीहरी पवळे यांच्या तालमीतून गेली १४ वर्षे अभिनयाची शिकवण ही आशिमिक यांनी घेतली आहे . त्यात त्याला बाल कलाकार पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, युवा सन्मान अश्या अनेक  पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परदेशातील कशी मिळाली संधी- चौरंग निर्मित अशोक हांडे दिग्दर्शित. आवाज की दुनिया,मंगलगाणी दंगलगाणी , आजादी ६० , गाणे सुहाने , माय मराठीच्या लेकी आणि मराठी बाणा या जगप्रसिद्ध कार्यक्रमात गेली १० वर्षे नर्तक म्हणून काम करत आहेत. याच कार्यक्रमा अंतर्गत विदेशी (अमेरिका) दौरा करून स्वतःच्या लावणीची कला ही परदेशात देखील आशिमिक ला रसिकांसमोर दाखवायला मिळाली. गि

न्यूज अपडेट: श्री साई देवस्थान वहाळ ला भेट दिल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटतय खासदार सुनिल तटकरे..!!

न्यूज अपडेट: श्री साई देवस्थान वहाळ ला भेट दिल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटतय  खासदार सुनिल तटकरे..!! ● श्री रविंद्र पाटील यांच्या हस्ते सुनिल तटकरे यांचा श्री साई सन्माना ने गौरव. उरण (प्रतिनिधी/सुनील ठाकुर) :- शिवजयंती चे  औचित्य साधुन रायगड चे खासदार श्री सुनिल तटकरे यानी श्री साई देवस्थान साई नगर वहाळ येथील साई मंदीरा ला भेट दिली यावेळी देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री रविंद्र पाटील यानी त्यांचे उतस्फूर्त स्वागत केले खासदार सुनिल तटकरे यानी या श्री साई बाबांचे मनोभावे दर्शन घेतले श्री साई देवस्थान च्या वतीने  श्री रविंद्र पाटील यानी खासदार सुनिल तटकरे यांना  साई सन्माना ने गौरविण्यात आले श्री साई देवस्थान वहाळला आल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटते असे गौरदगार यावेळी काढले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस श्री प्रशांत पाटील उरण विधान सभा अध्यक्षा, भावना घाणेकर पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, देवस्थान चे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील, श्री शिरिष कडू (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड), श्री अरुण दापोलकर मा. जि. प. सदस्या सौ पार्वती ताई पाटील, जगन शेठ पाटील, डी के पाटील सुयोग खरे, विश्व

न्यूज अपडेट: वहाळ येथील एकायन हॉस्पिटल चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन:

न्यूज अपडेट: वहाळ येथील एकायन हॉस्पिटल चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन: उरण (सुनिल ठाकुर) :- नुकताच शिव जयंतीच्या शुभ मुहुर्ता वर वहाल येथील एकायन या सुसज्य हॉस्पिटल चे उद्घाटन रायगड चे खासदार मा,श्री सुनिल जी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले की आज शिव जयंती चे औचित्य साधुन शिवाजी महाराजा ना अभिवादन करण्याचे भाग्य मिलाले ते पुढे म्हणाले की शिवाजी महाराजानी रयतेचे राज्य तयार केले आणि रयतेची कालजी घेणारे जानता राजा म्हणून छत्रपती शिवरायां चे नाव लौकिक तुमच्या आमच्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर अलौकिक पद्धतीने उभे आहे जगा मध्ये अलेक झांड़र नेपिलियन हे शुर योद्धे गणले गेले या पेक्षा शुर योद्धा म्हणून शिवाजी महाराजां ची नोंद इतिहासात झाली आहे शिवाजी महाराजां चे आदर्श उद्या च्या तरुण पीढीला रयतेच्या  माध्यमातुंन निश्चित मिलेल यावेळी सर्व सुविधा युक्त असे एकायन हॉस्पिट ची निर्मिती केलेले आरोग्य सेवेचा वसा घेतलेले डॉ राहूल वंजारी व डॉ दिपाली गोडघाटे याना धन्यवाद दिले. यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ राहूल वंजारी म्हणाले की गे

न्यूज अपडेट: वहाळ गावात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी:

न्यूज अपडेट: वहाळ गावात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी: उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकूर) :- दर वर्षी  वहाळ गावात  शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यावर्षी या  कार्यक्रमास मां श्री. सुनिल तटकरे साहेब मा.मंत्री व रायगड चे खासदार यांची प्रमुख उपस्थीती लाभली.  संध्याकाळी ५:०० वाजता वहाळ बस स्टाॅप  येथून गावातील शिवाजी महाराज पुतल्या पर्यंत शालेय विध्यार्थ्या नी गणवेशात ढोल ताशे व लेझिम्ं मध्ये मिरवनुक काढ ण्यात आली यावेळी खासदार सुनिल तटकरे  सह पाहुण्यांनी शिवाजी महाराजा च्या पुतस पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  सदर कार्यक्रमासाठी  खासदार सुनिल तटकरे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, श्री प्रशांत पाटील उरण विधान सभा अध्यक्षा, भावना घाणेकर पनवेल जिल्हा अध्यक्ष, सतीश पाटील विश्वनाथ शेठ पाटील (जेष्ठ नेते शेकाप), राजेंद्र पाटील (संचालक मुंबई कृ ऊ बा समिती), माधव पाटील (जेष्ठ पत्रकार), संदीप पाटील (मा नगराध्यक्ष), श्री रविंद्र पाटील(जि प सदस्य), भरत बालू पाटील, महादेव बाळू पाटील, रमेश बाळू पाटील, सुरेश बाळू पाटील मा सरपंच, नारा

न्यूज अपडेट: शिवसेना युवासेना अवजड वाहतूक सेना खोपटे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव साजरा:

न्यूज अपडेट: शिवसेना युवासेना अवजड वाहतूक सेना खोपटे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव साजरा: उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर):- शिवसेना युवासेना अवजड वाहतूक सेना खोपटे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा झाला.  यावेळी श्री.बी एन डाकी तालुका संघटक अवजड वाहतूक सेना रायगड उपाध्यक्ष सौ.भावना म्हात्रे (महिला तालुका संघटक), सौ. विशाखा ठाकूर (सरपंच), सौ.जागृती घरत (महिला शाखाप्रमुख), नंदकांत ठाकूर (शाखाप्रमुख), अनंत ठाकूर (सचिव अवजड वाहतूक सेना), विश्वनाथ पाटील (ग्राम अध्यक्ष), सुजित म्हात्रे (उपसरपंच), कैलास म्हात्रे, अजित ठाकूर, अतुल ठाकुर, रितेश ठाकूर, सचिन ठाकूर, जयेश भोईर, अच्युत ठाकूर, देवानंद पाटील ,जोगेंद्र पाटील, सौ,भावना पाटील, मच्छिंद्र ठाकूर, रवि ठाकूर ,लक्ष्मण ठाकूर, संजय ठाकूर, अशोक ठाकूर, रमणिक म्हात्रे, दिपक म्हात्रे, कपिल ठाकूर, प्रेमनाथ पाटील, देविदास ठाकूर, करणं घरत, लक्ष्मण घरत, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पाडा अध्यक्ष शिवसेना पदाधिकारी सातपाडा अध्यक्ष शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्स

न्यूज अपडेट: उलवे नोड येथे महिलां साठी भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न:

न्यूज अपडेट: उलवे नोड येथे महिलां साठी भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न: उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उलवे व प्रशांत पाटील मित्र मंडळ उलवे  यांच्या तर्फे महिलां साठी उलवे सेक्टर-२० येथे भव्य दिव्य अशा हळदी कुंकू समारंभा चे आयोजन करण्यात आले होते. उलवे नोड ची स्थापना झाल्या पासुन प्रशांत पाटील यानी महिलां साठी विविध उपक्रम राबविले गेले.याचीच पोच पावती म्हणून या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माघी गणेशोत्सव निमित्त येथे भजना चा कार्यक्रम झाला.यावेळी बहुसंख्येने महिलानी गणेशाचे दर्शन घेउन हळदी कुंकू समारंभात हजेरी लाऊन वहाण घेतले. सदर कार्यक्रमाला मा.जि.प.सदस्या सौ.सुरेखा पाटील.सरपंच सौ.पुजा समीर पाटील.ग्रा.प.सदस्या सौ. शैला गणेश पाटील, सौ.सोनाली खोत, सौ.शुभागी (सामाजिक कार्यकर्त्या) या सोबत मुंबई कृ.ऊ.बा.स.संचालक श्री राजेंद्र पाटील तरघरचे मा.सरपंच, विजय शिरढोणकर.मा.सरपंच वहाळ व सदस्य तथा शेकाप अध्यक्ष उलवे श्री प्रशांत पाटील आदर्श शिक्षक, मो.का.मढवी मा. उपसरपंच, गणेश पाटील, श्री दत्तात्रेय कोळी (मा.मुख्याध्यापक वहाळ )

न्यूज अपडेट: नवोदित साहित्यिक, कलाकारांना लाभले हक्काचे नाविन्यपूर्ण व्यासपीठ:

न्यूज अपडेट: नवोदित साहित्यिक, कलाकारांना लाभले हक्काचे नाविन्यपूर्ण व्यासपीठ: मुंबई (विशेष प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- प्रेम म्हटले की आपल्या समोर उभे राहते राधा कृष्णाचे निस्सीम प्रेम. अशा ह्या निस्सीम, पवित्र प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. हाच दृष्टिकोन, ह्याच भावना शब्दात उतरवण्यासाठी "भावना तुमच्या मनातल्या" हा विशेष उपक्रम  युवा साहित्यसंपदा आणि अखिल भांडुप कलाकार कट्टा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन माईकच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.  विशेष बाब म्हणजे  कोणत्याही साहित्य प्रकाराचे बंधन नव्हते सदर कार्यक्रमास नव्हते. कलाकारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी व्यासपीठावर देण्यात आली. सदर कार्यक्रमात सादरीकरण झालेल्या कलाकृतीतून प्रेम फक्त प्रेयसी किंवा प्रियकर ह्यांच्या पुरतं मर्यादित न राहता प्रेमाची व्यापक व्याप्ती मांडली गेली. कार्यक्रमाची सुरवात समीर नार्वेकर ह्यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. सदर प्रसंगी प्रमुख निमंत्रित म्हणून अनुपमा पाटील (असिस्टंट कमिशनर ऑफ फूड अँड ड्रग्स अडमिनीस्ट्रेशन, मुंब

न्यूज अपडेट: न्यू पनवेल क्रिकेट अकॅडेमी एकेडेमीचे उदघाटन...!!

न्यूज अपडेट: न्यू पनवेल क्रिकेट अकॅडेमी एकेडेमीचे उदघाटन...!! पनवेल (विशेष प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- मैदानी खेळ तन आणि मन प्रसन्न ठेवत असतात. आरोग्याचे जतन करत असतात. त्यात क्रिकेटसारखा खेळ योग्य तंत्र आणि मार्गदर्शनाखाली शिकल्यास खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले नाव कोरू शकतो. ह्याच जाणिवेतून सरकारी वसाहतीचे सदस्य राजन जोशी, शेखर सावंत आणि अकॅडेमी बनविण्यासाठी मेहनत घेतलेले प्रशिक्षक सुहास हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये "न्यू पनवेल क्रिकेट अकॅडेमी एकेडेमी"चे उदघाटन करण्यात आले.  याप्रसंगी सुरेश म्हात्रे, राजेश शिंदे आणि सचिन हिरवे तसेच अकॅडेमीचे सर्व खेळाडू तसेच रायगड जिल्ह्याचा १९ वर्षाखालील संघाचे राज्याचे प्रतिनिधित्व करणारा आदित्य कदम उपस्थित होता. ह्या एकडेमी मध्ये २ पिच असून प्रशस्त  मैदान उपलब्ध झाले त्याबद्दल खेळाडूंनी प्रशिक्षक सुहास हिरवे यांचे आभार मानले व अभिनंदन केले. नवीन पनवेल किंवा पनवेल मध्ये असे नेट क्रिकेट सराव पिच नसताना हिरवे सरांनी हा एक आदर्श घालून दिला हे वाखानण्याजोगे आहे, असे मत यावेळी राजन जोशी आणि शेखर सावंत यांनी व्यक

न्यूज अपडेट : "जाणीव" चा वर्धापनदिन जोषात संपन्न..!!

न्यूज अपडेट : "जाणीव" चा वर्धापनदिन जोषात संपन्न..!! पालघर (विशेष प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- "जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट" च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त "जिल्हा परिषद शाळा, भारोळ, जिल्हा पालघर" या आदिवासी पाड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस १२ व १३ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अवकाश दर्शन हा कार्यक्रम शैलेश संसारे आणि आदित्य देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालला, यात ५वी ते ९वी इयत्तेतील ७०पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. अवकाश दर्शनाबद्दल प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीमुळे व प्रत्यक्ष अवकाश दर्शनामुळे सर्व विद्यार्थी खूप आनंदली होती. एक आगळावेगळा कार्यक्रम पाहिल्याची भावना जाणवत होती.  करीयर मार्गदर्शन हा कार्यक्रम गौरांग राजवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत घेण्यात आला. या कार्यक्रमात ७वी ते ९वी इयत्तेतील मुले मुली उपस्थित होती. मार्गदर्शकांनी मुलांना शिक्षणाचे महत्व, शिक्षण का घ्यावे, शिक्षणातून होणारी प्रगती

न्यूज अपडेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश; कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा:

न्यूज अपडेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश; कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा: > मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. > जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा, नियम पाळत नसतील तर हॉल्स, सभागृहांचे परवाने रद्द करा . नवी मुंबई (प्रतिनिधी/मुंबई) :- कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. कोविड-19 विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली.  या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत- ● लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधां