न्यूज अपडेट: तळोजा येथे भरदिवसा 30 ग्रॅम वजनाचे सोने घेवून महिला पसार:
तळोजा (प्रतिनिधी/दीपा वाघमारे) :- तळोजा पोलीस चौकीपासून अगदी काही अंतरावर आणि लोकांची ये जा असणार्या रस्त्यावर ज्वेलर्स दुकानातून एका बुरखा घातलेल्या महिलेने 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा दुकानदाराच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने व्यापारी वर्गाला चांगलाच धक्का बसला आहे. तर, संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहेत.
तळोजा वसाहती सेक्टर 10 मधील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर एका इमारतीत कैलाशचंद सोनी यांचे ज्वेलर्स दुकान आहे. बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास सोने घेण्याचा बहाण्याने एक बुरखा घातलेली महिला दुकानात येवून दागिन्याचे मोल भाव करीत असताना विक्री साठी ठेवण्यात आलेले 30 ग्राम सोनसाखळी घेवून दुकाना बाहेर दुचाकी घेवून उभा असलेल्या दुचाकी चालकांसोबत तिथून पळ काढला.
या सोन्याची किंमत अंदाजे दीड लाखाच्या घरात असल्याचे समजले. विशेषतः ज्वेलर्सच्या दुकानाला लागून कटरली, मोबाईल शॉप आहे. तसेच बाहेरच चहा आणि फळ भाजी विक्रेते असतात. तसेंच दुकाना समोरील रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ ये जा ही सुरू असते. शिवाय भर दिवसा एका महिलेने दागिने घेवून पसार झाल्याने व्यापारी वर्गात आता चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.