Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबई भूषण लावणी सम्राटचा किताब पटकावला श्री. आशिमिक आनंद कामठे यांनी..।।

न्यूज अपडेट: नवी मुंबई भूषण लावणी सम्राटचा किताब पटकावला श्री. आशिमिक आनंद कामठे यांनी..।।

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- देश विदेशात लावणीची कला सादर करून अनेक रसिक प्रेक्षकांचे मन जिंकणारा तसेच नवी मुबई येथील लावणी सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. आशिमिक आनंद कामठे या तरुणाने नवीमुंबई भूषण लावणी सम्राट चा मानकरी ठरला आहे. 

जाणून घेऊयात आशिमिक बद्दल थोडक्यात..!!

लावणीचा प्रवास-

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे अंतर्गत संत शिरोमणी कलामंच्यातून श्रीहरी पवळे यांच्या तालमीतून गेली १४ वर्षे अभिनयाची शिकवण ही आशिमिक यांनी घेतली आहे . त्यात त्याला बाल कलाकार पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, युवा सन्मान अश्या अनेक  पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

परदेशातील कशी मिळाली संधी-

चौरंग निर्मित अशोक हांडे दिग्दर्शित. आवाज की दुनिया,मंगलगाणी दंगलगाणी , आजादी ६० , गाणे सुहाने , माय मराठीच्या लेकी आणि मराठी बाणा या जगप्रसिद्ध कार्यक्रमात गेली १० वर्षे नर्तक म्हणून काम करत आहेत. याच कार्यक्रमा अंतर्गत विदेशी (अमेरिका) दौरा करून स्वतःच्या लावणीची कला ही परदेशात देखील आशिमिक ला रसिकांसमोर दाखवायला मिळाली.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नावाची दखल-

आशिमिक यांनी  लगातार १ तास ३८मिनिटे नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली .आणि याच कलेमुळे विराग व आशिमिक यांना "गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड " तर्फे सन्मानीत करण्यात आले. 

चला हवा येऊद्या मधील आशिमिकची भूमिका-

झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधे भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यांची पारंपरिक वेशभूषा (डिजाइन ) आशिमिक स्वतः करतात. 

त्याच बरोबर सू प्रसिद्ध सिनेमासृष्टीतील कलाकार नेहा पेंडसे, दिपाली सय्यद, मिरा मोदक, शर्मिष्ठा राऊत अश्या अनेक कलाकारांचे मेकअप व कॉस्ट्यूम हे आशिमिक स्वतः करतात तसेच रंगभूषा वेशभूषा ही  ते करतात.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे