न्यूज अपडेट: श्री साई देवस्थान वहाळ ला भेट दिल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटतय खासदार सुनिल तटकरे..!!
न्यूज अपडेट: श्री साई देवस्थान वहाळ ला भेट दिल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटतय खासदार सुनिल तटकरे..!!
● श्री रविंद्र पाटील यांच्या हस्ते सुनिल तटकरे यांचा श्री साई सन्माना ने गौरव.
उरण (प्रतिनिधी/सुनील ठाकुर) :- शिवजयंती चे औचित्य साधुन रायगड चे खासदार श्री सुनिल तटकरे यानी श्री साई देवस्थान साई नगर वहाळ येथील साई मंदीरा ला भेट दिली यावेळी देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री रविंद्र पाटील यानी त्यांचे उतस्फूर्त स्वागत केले खासदार सुनिल तटकरे यानी या श्री साई बाबांचे मनोभावे दर्शन घेतले श्री साई देवस्थान च्या वतीने श्री रविंद्र पाटील यानी खासदार सुनिल तटकरे यांना साई सन्माना ने गौरविण्यात आले श्री साई देवस्थान वहाळला आल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटते असे गौरदगार यावेळी काढले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस श्री प्रशांत पाटील उरण विधान सभा अध्यक्षा, भावना घाणेकर पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, देवस्थान चे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील, श्री शिरिष कडू (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड), श्री अरुण दापोलकर मा. जि. प. सदस्या सौ पार्वती ताई पाटील, जगन शेठ पाटील, डी के पाटील सुयोग खरे, विश्वास पाटील श्री मो. का. मढवी, श्री सचिन घरत (उप सरपंच गव्हाण), श्री वितेश म्हात्रे (सदस्य ग्रामपंचायत वहाल), श्री निलेश म्हात्रे (माजी सेनिक), श्री सचिन मोरे, श्री निलेश सोनवणे, श्री अजय दापलोकर, श्रीकांत मुंबईकर आदी सह साई भक्त यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.