न्यूज अपडेट: "ऐक्यम्" शॉर्ट फिल्म देत आहे सामाजिक मन:स्वास्थ्य जाणण्याचे माध्यम:
● शॉर्ट फिल्म "ऐक्यम्" मध्ये धर्म,जात,पंथ,भाषा यांनी विभिन्न असलो तरी आपण एक आहोत असा वेगळा संदेश लोकांना दिला आहे.
● आपल्याला संविधानाने हा सर्वोच्च सन्मान आपल्याला बहाल केला आहे.
नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- आज या बदलत्या काळात मुलांच्या व मोठ्यांच्या हाती मोबाईलच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात जगाचे ज्ञान आले आहे. हल्ली तरुण वर्ग हा मोठ्या पडद्यापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्यास जास्त आवडते. युवकांच्या याच सवयीला दिशा देण्याचा प्रयत्न "ऐक्यम्" या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून केला असून, या विषयावर सामाजिक भान जनजागृत करण्याकडे नेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्थरावरील 185 सेकंदाची ही शॉर्ट फिल्म करण्यात आली आहे.
ऐक्यम् या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजाला एक चांगला सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. या शॉर्ट फिल्म मध्ये अभिनेते रोहित नाईक यांच्या वेग वेगळ्या भूमिका रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. याचे कथानक संवादापेक्षाही चित्रीकरणच बरेच काही सांगून गेले आहे. प्रेक्षकांपर्यंत आपला संदेश खूप उत्तम रीत्या पोचवण्याचे काम दिग्दर्शक राजेश मयेकर यांनी केले आहे. आज लोकांना आपले अधिकार व कर्तव्य यांचे भान नाही. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सामाजिक भान जागृत करण्याचा अतिशय सुंदर असा संदेश समाजाला दिला आहे.
या शॉर्ट फिल्मची आशय समर्थपणे मोजक्याच शब्दात मांडण्यात आले आहे. अभिनेते रोहित नाईक, आनंद खंडागळे, एडिटर योगेश मोरे, डीओपी सुमित सहगल, सहाय्यक दिग्दर्शक कल्पेश भोसले, आकाश भोसले, प्रिंस प्रजापति तसेच राजेश मयेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्म "ऐक्यम्" करण्यामागचा उद्देश असा आहे की, आपण जरी धर्म, जात, पंथ, भाषा यांनी विभिन्न असलो तरी सुद्धा आपण एक आहोत आणि आपल्या सर्वांना संविधानाने हा सर्वोच्च सन्मान बहाल केला आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.