Skip to main content

न्यूज अपडेट: धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, लग्न समारंभ, मोर्चांवर बंदी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे:

न्यूज अपडेट: धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, लग्न समारंभ, मोर्चांवर बंदी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे:

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार जनतेशी संवाद साधला.

यात लोकांनी अनलॉकच्या टप्प्यात घातलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही परिस्थिती ओढावली असून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तविली आहे. यामुळे एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ‘राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच “राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल” असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

> कोरोना लसीचे साइड इफेक्ट्स नाही

> सामान्यांसाठी लवकरच लस उपलब्ध होणार

> कोरोना विरुद्ध लढायचे असेल तर मास्क हीच आपली ढाल आहे त्यामुळे मास्क वापरणे अनिवार्य आहे

> कोरोनाची दुसरी लाट आली आहे की नाही हे येत्या 10-15 दिवसांत कळेल.

> उद्यापासून धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा,  मोर्चांवर बंदी

> उद्यापासून जिथे वाटेल तिथे बंधनं घाला असे जिल्हाधिका-यांना आदेश

> लग्न सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉल मालकावर कारवाई होणार

> महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

> गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गर्दी करणे टाळा.

> ऑफिसच्या वेळा बदला. वर्क फ्रॉम होम वर भर द्या.

> अर्धे कर्मचारी ऑफिसात अर्धे वर्क फ्रॉम होम अशी योजना आखा

> लॉकडाऊन हवा की नको हे पुढील 8 दिवसांत कळेल

> ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी नियमांचे उल्लंघन करतील, ज्यांना नको ते नियम पाळतील.

> सोशल डिस्ंटस, वारंवार हात धुणे, मास्क लावणे या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

> उद्यापासून राज्यातील सर्व राजकीय बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील.

> राज्यात आपण काही दिवसांपूर्वी ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अशी मोहिम राबवली होती. ती बदलून आताची परिस्थिती पाहून ‘मी जबाबदार’ अशी नवी मोहिम आपण सर्वांनी मिळून राबवूया असे त्यांनी सांगितले.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे