न्यूज अपडेट: वहाळ गावात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी:
उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकूर) :- दर वर्षी वहाळ गावात शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यावर्षी या कार्यक्रमास मां श्री. सुनिल तटकरे साहेब मा.मंत्री व रायगड चे खासदार यांची प्रमुख उपस्थीती लाभली.
संध्याकाळी ५:०० वाजता वहाळ बस स्टाॅप येथून गावातील शिवाजी महाराज पुतल्या पर्यंत शालेय विध्यार्थ्या नी गणवेशात ढोल ताशे व लेझिम्ं मध्ये मिरवनुक काढ ण्यात आली यावेळी खासदार सुनिल तटकरे सह पाहुण्यांनी शिवाजी महाराजा च्या पुतस पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सदर कार्यक्रमासाठी खासदार सुनिल तटकरे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, श्री प्रशांत पाटील उरण विधान सभा अध्यक्षा, भावना घाणेकर पनवेल जिल्हा अध्यक्ष, सतीश पाटील विश्वनाथ शेठ पाटील (जेष्ठ नेते शेकाप), राजेंद्र पाटील (संचालक मुंबई कृ ऊ बा समिती), माधव पाटील (जेष्ठ पत्रकार), संदीप पाटील (मा नगराध्यक्ष), श्री रविंद्र पाटील(जि प सदस्य), भरत बालू पाटील, महादेव बाळू पाटील, रमेश बाळू पाटील, सुरेश बाळू पाटील मा सरपंच, नारायण शेठ घरत (शेकाप पनवेल ता. चिटणीस), पूजा समीर पाटील (सरपंच), श्री प्रशांत पाटील (मा. सरपंच) सीताराम नाईक (तंटामुक्त अध्यक्ष), श्री विजय शिरढोणकर (मा. सरपंच तरघर), श्री मो का मढवी गणेश पाटील (मा. उपसरपंच) आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.