न्यूज अपडेट: कोमसाप युवाशक्तीचा ऑनलाईन भाषा दिन..!!
नवी मुंबई (मुंबई- प्रतिनिधि/गुरुदत्त वाकदेकर) :- जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती या संस्थेने नवोदित कवींसोबत ऑनलाईन भाषा दिन साजरा करायचे ठरविले आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोमसाप युवाशक्तीनेही बालक, पालक, शिक्षक आणि युवावर्ग यांच्यासाठी साहित्यातील अनेक उत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले होते. "PENNED" हा उपक्रम खास युवा लेखकांसाठी घेतला गेला होता.
मराठी भाषा दिनानिमित्त "PENNED" या उपक्रमात आताच्या काळातील सकस काव्यलेखन करणार्या प्रथमेश पाठक, पवन नालट, अक्षय शिंपी यांच्या सोबत कविता, कवितासंग्रह याबाबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन कवींसोबत प्रणय चव्हाण संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना कोमसाप केंद्रीय युवाशक्ती प्रमुख दीपा ठाणेकर यांची आहे .
कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टाच्या फेसबुक पेजवर क्लिक करा:
https://www.facebook.com/komsapyuvashakti/
हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम दर्शकांना पाहता येईल.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.