Skip to main content

न्यूज अपडेट: तर...अश्या प्रवृत्तींना आरपीआय डेमोक्रॅटिक घरात घुसून ठेचून काढेल:

न्यूज अपडेट: तर...अश्या प्रवृत्तींना आरपीआय डेमोक्रॅटिक घरात घुसून ठेचून काढेल:

नवी मुंबई (प्रतिनिधी/काशिनाथ भोईर) :- संबंध देशात जातीव्यवस्था प्रस्थापित होत असून दलित मुस्लिम बौद्ध जाती व जमातींवर जीवघेणे हल्ले होत आहेत, सरकारने जातिवाद्यांना आवरले नाही तर आरपीआय डेमोक्रॅटिक अश्या प्रवृत्तींना घरात घुसून ठेचून काढेल असा इशारा पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला. 

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शिवणी गावात धक्का लागल्याचे कारण सांगुन बौद्ध तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी मृत्युशी झुंज देत आहे, जखमीला औरंगाबाद येथील सरकारी हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

देश स्वातंत्र्य होऊन सत्तरी लोटली, तरीही इथली जातिव्यवस्था नष्ट होत नाही. जातीद्वेशातुन आजही कत्तली केल्या जात आहेत, इज्जती लुटल्या जात आहेत, दंगली घडविल्या जात आहेत. मानवतेला कालिंबा फासणाऱ्या घटना देशात सदैव घडत आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालुन वेळीच ठोस पाऊल उचलुन आरोपीवर कडक कारवाई करावी. अन्यथा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने उग्र स्वरूपाच आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

शिवराय फुले शाहू बसव अण्णा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि रिपब्लिकन जनता असे आघात व प्रहार मुळीच सहन करणार नाही, वेळीच सरकारने अश्या प्रवृत्ती वर रोक नाही लावल्यास डेमोक्रॅटिक पक्षाचे पँथर्स अश्या जातिवाद्यांना घरात घुसून अद्दल घडवतील मग उद्भवणाऱ्या पडसादाला कायदा व सुव्यवस्थेला सरकार जवाबदार असेल असा गंभीर इशारा ही पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

पक्षप्रमुख कनिष्क कांबले यांच्या नेतृत्वात डॉ राजन माकणीकर, राज्य महासचिव श्रावण गायकवाड, राजेश पिल्ले, मूनवर अली, मनीष यादव असे एक शिष्टमंडळ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भेट देऊन या प्रकरणाला थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे सांगितले आहे.

मात्र: हे सरकार कुचकामी ठरले जात आहे, पोलीस यंत्रणा पण कारवाई साठी निपक्षपणे काम करत नाही. 

आंबेडकरी रिपब्लिकन जनतेची सुरक्षा करण्यास सरकार असमर्थ असेल तर तसे सांगावे डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रत्येक बौद्ध दलित व वंचित समूहाचे रक्षण करेल व अश्या जातीवादी प्रवृत्तीचा फडश्या पाडेल याची नोंद घेण्याचाही इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे