Skip to main content

न्यूज अपडेटे: कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार : आ. प्रशांत ठाकूर !!

न्यूज अपडेटे: कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार : आ. प्रशांत ठाकूर !!

● विस्तारित कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन  

पनवेल (बातमी/रुपाली वाघमारे) :- कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते, त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्र येथे केले. ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की, तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये माथाडी, ट्रान्सपोर्ट, जनरल असे विविध प्रकारचे कामगार गणले जातात. या सर्व कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची गरज लागते. मला नक्की खात्री आहे नंदकुमार म्हात्रे त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितपणे चांगले नेतृत्व देतील आणि त्यांना राजकुमार म्हात्रे व सहकारी कामगारांच्या उन्नतीसाठी ताकद देतील, असा विश्वास व्यक्त करून या परिसरामध्ये कामगारांचे शोषण-पिळवणूक होऊ नये, यासाठी ही संघटना काम करेल आणि त्यासाठी त्यांना लागेल ते सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.  

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे - 

पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, जीएसटी मुंबई विभाग आयुक्त राजेंद्र सरवदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक संतोष भोईर, नगरसेवक विष्णू जोशी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, साक्षी इन्टरप्रायझेसचे सतीश म्हात्रे, राजू चव्हाण, वलप सरपंच भोलानाथ पाटील, माजी सरपंच गोविंद गायकर, किरण दरे, दीपक बोन्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तळोजा मजकूर माजी सरपंच संतोष पाटील, सुनील गोवारी यांच्यासह अनेक उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे राजकुमार म्हात्रे आणि भाजपचे प्रभाग क्रमांक १ चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी स्वागत केले. 








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे