न्यूज अपडेट: मनोज मेहेर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले निर्देश; ग्रामस्थांच्या घरी शौचालय बांधण्यास अनुदान द्या:
न्यूज अपडेट: मनोज मेहेर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले निर्देश; ग्रामस्थांच्या घरी शौचालय बांधण्यास अनुदान द्या:
नवी मुंबई (नेरुळ- प्रतिनिधी/काशिनाथ नाईक) :- नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील झोपडपट्टीधारकांना गेली अनेक वर्षापासून घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला निवासी पर्याय म्हणून राज्य सरकारने शासकीय गरजेपायी नवी मुंबई शहर विकसित केले आहे. येथील स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांनी तसेच अन्य ग्रामस्थांनी आपली भातजमिन तसेच अन्य जागेचा भुसंपादनासाठी सहकार्य करताना सरकारला मदत केली आहे. सुरूवातीला जिल्हा परिषद व आता त्यानंतर महानगरपालिका प्रशासन येऊनही गावा-गावात विकासाच्या नावाने बोंबाबोंब असल्याने कॉलनी परिसर विकसित होत गेला व गावठाण परिसर प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बकालच राहीला आहे.
तसेच आजही गावातील अनेक ग्रामस्थांच्या घरामध्ये शौचालय नसल्याने त्यांना महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागत आहे. महापालिका प्रशासन घरामध्ये शौचालय उभारणीसाठी झोपडपट्टी परिसर, स्लम एरिया, चाळीतील रहीवाशांना अनुदान देवून आर्थिक मदत करत असते. त्याप्रमाणे महापालिका प्रशासनाने गावागावात घरामध्ये शौचालय नसणाऱ्या ग्रामस्थांना आर्थिक मदत म्हणून त्यांना अनुदान देवून त्यांच्या राहत्या घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील ग्रामस्थांना घरामध्ये शौचालय बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत म्हणून अनुदान योजना लवकरात लवकर जाहिर करावी अशी मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी नवी मुंबई महापालिका केली आहे व प्रशासनाला तातडीने याचे निर्देश द्यावेत अशी देखील विनंती त्यांनी केली आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.