न्यूज अपडेट: ऐरोलीत विजेचा झटका लागून एकाचा लहान मुलांचा जागीच मृत्यू..!!
नवी मुंबई (ऐरोली-प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- ऐरोली सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा २ येथील इमारतीच्या बाहेर लेन्सकार्ट दुकानासमोर कामानिमित्त लोखंडी परांची ठेवण्यात आली होती. त्या परांचीची तिची उंची सुमारे २५ फुटाहुन अधिक असल्याने वरून जाणाऱ्या विद्युत मेन लाईनला परांची चिटकल्याने त्या परांची मध्ये करंट उतरला आणि तेथील सिग्नल वर पिशव्या विकणाऱ्या एका लहान मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर हा विजेचा झटका इतका भयानक होता की, १० मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले. सदर घटना सकाळी ८.३० वाजता घडली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन व एमएसइबी चे कर्मचारी हजर झाले. याबाबत सदर सोसायटीने काम करण्यापूर्वी कोणतीही परवानगी न घेतल्याचे एमएसइबी चे अधिकारी जाधव यांनी सांगितले. तसेच याबाबत आम्ही सदर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसइबी चे अधिकारी बोधनकर यांनी सांगितले तर पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.