Skip to main content

न्यूज अपडेट: "साहित्यवेदी" संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण..!!

न्यूज अपडेट: "साहित्यवेदी" संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण..!!

नवी मुंबई (मुंबई- प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून चार उच्च माध्यमिक अध्यापकांच्या संकल्पनेतून विकसित केलेल्या "साहित्यवेदी" ह्या संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद व नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.

मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास, कोशसंपदा, सुलेखनकला व्यवसाय, युवा साहित्यकार आढावा, सर्व वाङमयीन नियतकालिकांची ओळख व कार्य, महाराष्ट्र बोलींचे नमुने व परिचय, महाराष्ट्रातील शताब्दी ग्रंथालयांचे एकत्रित दालन, अनेक साहित्यकारांच्या निवासभेटीची परिक्रमा अशा अनोख्या विषयांनी साहित्याचा यज्ञ संपन्न करण्यासाठी सज्ज "साहित्यवेदी" असलेले हे पहिलेच व नावीन्यपूर्ण असे संकेतस्थळ आहे.

यावेळी बोलतांना मा. भाषामंत्री सुभाष देसाई म्हणाले, “साहित्यवेदी या संकेतस्थळामुळे मराठी भाषा व साहित्य यांची सर्व अंगे एकत्रित मिळतील. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठीतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे व जगातील सर्व मराठी भाषिकांना जोडणे त्यामुळे शक्य होईल. भाषा मंत्रालयातर्फे जागतिक मंच तयार केला जात आहे, त्याच्याशी हे संकेतस्थळ जोडून घेता येईल.

हे संकेतस्थळ शालेय स्तर ते संशोधक-अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त होणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला उज्ज्वल परंपरा आहे. एक दिवस भाषादिन साजरा करून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यापेक्षा वर्षभर ते सतत दृष्टिक्षेपात राहावे, या हेतूने www.sahityavedi.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.  

मराठी भाषेविषयीचे डॉ. गणेश देवी, डॉ. नीलिमा गुंडी, हरी नरके, डॉ. विद्या देवधर यांच्यासह अनेकांचे अभ्यासपूर्ण लेख तसेच  विविध विषयांचा अंतर्भाव दृक्‌श्राव्य फितींसह यात केला आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अध्यापकांनी केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे