Skip to main content

न्यूज अपडेट: Zee News च्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा धडक मोर्चा:

न्यूज अपडेट: Zee News च्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा धडक मोर्चा:

नवी मुंबई (मुंबई- प्रतिनिधी/अशोक वाघमारे) :- टाईम्स मॅगॅझीन ने जाहीर केलेल्या जागतिक उभरत्या शंभर नेत्यांच्या यादीत चंद्र शेखर आजाद (Chandra Shekhar Aazad) यांचे नाव आल्याने खवळलेल्या जातीयवादी zeenews ने आझाद भाईंचा फोटो दाखवत आपण यांना ओळखता का म्हणून आपल्या काही चिंधी पत्रकांरांकरवे एक न्युज चालवली. ही चंद्रशेखर आझाद यांची बदनामीच

जागतिक स्तरावर एखाद्या भारतीय नेत्याची ओळख होणे ही खरंतर गर्वाची बाब पण केवळ तो नेता मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्यांची अशी बदनामी करण्याची घाई झी न्यूज चॅनल ने केली आणि वैश्विक स्तरावर भारतीय मिडिया ही किती खालच्या स्तरावर उतरू शकते याचं प्रदर्शन मांडले. एकप्रकारे भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न या चॅनल ने केला.

या यादीत इतरही काही भारतीय वंशाच्या नेत्यांची नावे जाहीर झाली परंतु केवळ ते उच्चवर्णीय होते म्हणून त्यांच्या विरोधात "आपण यांना ओळखता का" असं कॅम्पेन चालवावंसं झी न्यूज ला वाटलं नाही. मग सरळसरळ जातीयवादी चेहरा घेऊन जर झी न्यूज समोर येत असेल तर आझाद समाज पार्टी ही या जातीवादी मिडियाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

झी न्यूज चॅनलच्या परेल येथील कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकार्याला जाब विचारत आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा (महिला आघाडी) आदरणीय नेहा शिंदे ताई, महाराष्ट्र प्रदेश संघटक (महिला आघाडी) दर्शना जाधव ताई, महाराष्ट्र प्रदेश सचिव(महिला आघाडी) वृषाली कांबळे तसेच 

मुंबई प्रदेश संघटक विकी शिंगारे, मुंबई प्रदेश महासचिव अतुल खरात, महाराष्ट्र महासचीव  कैलासजी जैस्वाल, घाटकोपर पश्चिम तालुकाध्यक्ष नरेंद्र शिरसाट, घाटकोपर पुर्व तालुकाध्यक्ष नितीन जाधव, नितीन पायाळ, योगेश अहिरे. इत्यादी पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यालयाला धडक मोर्चा नेत दोन दिवसांचा अवधी दिला आहे. दोन दिवसांमध्ये जर त्यांनी जाहीरपणे माफी मागितली नाही तर, संपूर्ण भारतभर त्यांच्या कार्यालयांवर आझाद समाज पार्टी चे कार्यकर्ते हे हल्लाबोल करतील आणि आक्रमक आंदोलन करतील असा निर्वाणीचा इशारा त्यांना दिलेला आहे.

यावेळी झी न्यूज चॅनल तर्फे त्यांचे अधीकारी (Administrative Manager) रामदास ससाणे यांनी दोन दिवसांमध्ये माफीनामा जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे