Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

न्यूज अपडेट: शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करण्याचे निर्देश;आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले:

न्यूज अपडेट: शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करण्याचे निर्देश;आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले: पनवेल (प्रतिनिधी) :- कोव्हीड-१९ मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून ३१ मार्च तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळानी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी केले आहे. कोरानाचा प्रादुर्भाव  वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावे. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान, गाणे, नाटक, असे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.  शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबिर

न्यूज अपडेट : कर्जत-नेरळ रोडवर कार-रिक्षाची धडक; CNG टाकीचा स्फोट झाल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू:

न्यूज अपडेट : कर्जत-नेरळ रोडवर कार-रिक्षाची धडक; CNG टाकीचा स्फोट झाल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू: कर्जत-नेरळ रोडवर डिकसळ येथे कार आणि रिक्षाच्या धडकेत सीएनजीचा मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. पनवेल (कर्जत- प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- कर्जत-नेरळ रोडवर डिकसळ येथे कार आणि रिक्षाच्या धडकेत सीएनजीचा मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच खोपोली नगरपरिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दोन्ही वाहनांची पेट घेतल्यामुळे दुर्देवाने स्थानिक नागरिकांना मदत करता आली नाही. तात्काळ मदत मिळाली असते तर जीव वाचवता आला असता, असे मत घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-नेरळ रोडवर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हुंडाई कार (Hyundai Car) आणि रिक्षामध्ये (CNG Auto Riksha) जोरदार धडक झाली आहे. या धडकेत सीएनजी टाकीचा मोठा स्फोट झाला. या

न्यूज अपडेट: दिघोडे येथे पारंपारिक व साधे पणाने होळी चा सण साजरा..।।

न्यूज अपडेट: दिघोडे येथे पारंपारिक व साधे पणाने होळी चा सण साजरा..।। उरण (सुनिल ठाकुर) :- दरवर्षी होळी चा सण देश भरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो .मात्र आज देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटा चा परिणाम साजरे होणारे  सणां वर दिसून येत आहे .तरी पण येणारे प्रत्येक सण धुमधडाक्यात साजरे न करता शासनाच्या नियमांचे पालन करत आपली सणांची परपरा जपत सण साजरे करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दिघोडे गावात सुद्धा दरवर्षी होळी चा सण मोठ्या धुम धडाक्यात साजारा होत आसतो मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी आगदी साधे पणाने शासनांच्या नियमां चे पालन करत आपली सणांची परंपरा जोपासत होळीचा आनंद लुटला.  यावेळी दिघोडे येथील स्मारक येथे होळी चे पूजन अश्विन काशिनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच सौ. सोनिया मयूर घरत, उपसरपंच सौ. कविता शिवदास म्हात्रे, सदस्य सौ. शारदा कासकर, सौ. उर्मिला नरेश कोळी, सौ.पुजा अभिजित पाटील, काशिनाथ पाटील, रमण कासकर, मा.शाखा प्रमुख अनिल पाटील, वसंत पाटील, बलाराम पाटील. प्रल्हाद कासकर, पांडूरंग म्हात्रे, काशिनाथ कासकर, अरुण पाटील, मयूर माळी, संतोष पाटील, विनोद म्हात्रे,

न्यूज अपडेट: मैत्री कट्टयावर बसून घ्यावी क्षणभर विश्रांती आणि थोडासा विसावा...!!

न्यूज अपडेट: मैत्री कट्टयावर बसून घ्यावी क्षणभर विश्रांती आणि थोडासा विसावा...!! सारडे-वशेणी मार्गावर फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ येथील बस स्टॉप वर बसायला दिली खुर्ची-बेंच त्यावर कुणीतरी वाटसरू येऊन निवांत बसावा..! उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- पिरकोन गावातील फणसवाडी सेक्टर ११ या सारडे-वशेणी मार्गावर फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ येथील बस स्टॉप वर  येणारया  प्रवाश्यांच्या सोयीकरीता आणि थकल्या भागल्या वाटसरूनां क्षणभर विश्रांती करितां सोबतच फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ च्या सर्व मित्र मंडळींच्यां संवाद आणि विचार- मंथनाच्या चर्चा रंगण्याकरीता तसेच जेष्ठ नागरिकांनां निवांत क्षणी कट्टयावर बसून अराम करण्या करीता रायगड भूषण श्री राजू मुंबईकर यांनी आपल्या औदार्यातून उत्तम प्रकारचे आणि आकर्षक असे आरामदायी बेंच (अराम खुर्च्या) पिरकोन, फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ येथे मोठ्या मनानं भेंट म्हणून दिल्या. श्री.राजू मुंबईकर यांनी भेंट म्हणून दिलेल्या बेंच (खुर्च्याचां) अनावरण सोहळा अर्थात खरं सांगायचं तर ह्या सुंदर भेटींबद्दल त्यांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आज 'फणसवाडी मैत्री कट्टा&

न्यूज अपडेट: सिडकोला लॉजिस्टिक हब प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध:

न्यूज अपडेट: सिडकोला लॉजिस्टिक हब प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध: उरण (प्रतिनिधी/ सुनिल ठाकुर) :- बैलोंडाखार प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक संस्था आठगाव कमिटीने आयोजित केलेल्या दिघोडे येथील बैठकीत संमती पत्र द्वारे जमीन संपादनास तीव्र विरोध केला आहे. या बैठकीचे आयोजन आठगाव कमिटीचे आध्यक्ष रमण कासकर यांनी दिनांक २७ मार्च २०२१ रोजी दिघोडे ग्रामस्थांचे वतीने केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शामशेट मुंबईकर होते. आठगाव कमिटीचे सेक्रेटरी  रविंद्र कासूकर यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी संमतीने होणार जमिनीचे संपादनाबाबत शेतकरी वर्गात जनजागृती करणेसाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले. किसान सभेचे सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी सिडकोने शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेले संमतीपत्र ही प्रक्रीया  जमीन संपादनास आयोग्य असल्याचे स्पष्ट केले. या संमती पत्रात "भूमि  संपादन अधिनियम १८९४ तसेच नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ अथवा इतर कोणत्याही कायद्याखाली कोणत्याही न्यायालयात/प्राधिकरणाकडे भूमि संपादन संदर्भ अथवा दावा दाखल करणार नाही" हे  संमतीपत्रातील विधान शेतकरी वर्गाचे योग्य पुनर्

न्यूज अपडेट: करुया मदत पोळीसाठी आदिवासी बांधवांच्यां होळी साठी..!!!

न्यूज अपडेट: करुया मदत पोळीसाठी आदिवासी बांधवांच्यां होळी साठी..!!! होळी सणासाठी आदिवासी बांधवांना "केअर ऑफ़ नेचर" संस्थेचा मदतीचा हात उरण (प्रतिनिधी/ सुनिल ठाकुर) :- नेहमीच आदिवासी बांधवांच्या सुख दुखात सामील होणारे केअर ऑफ़ नेचर संस्था वेश्वी चे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण राजु मुंबईकर हे दरवर्षी सणाच्या वेळी आदिवासी बांधवांच्या घरात सुद्धा गोड धोड पदार्थ बनविले जावे व त्यानी सुद्धा सण आनंदाने साजरा करावा या उद्देशाने होळी सणासाठी केअर ऑफ़ नेचर संस्थे तर्फे रानसई, खोंड़याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, खेर काठी, पुनाडे वाडी, येथील आदिवासी बांधवांना पुरण पोळीच सामान व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री राजू मुंबईकर ह्यांच्या औदार्यतुन साकारलेल्या ह्या सुंदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दर्शविली ती कर्नाळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी आर.एफ.ओ.श्री प्रदिप चव्हाण, श्री बी.आर.जाधव, रा.जि.प.सदस्य श्री ज्ञानेश्वर  घरत, रानसईच्या सरपंच सौ.संगिता ताई भगत, कॉन संस्थेचे उपाध्यक्ष श्री संदेश घरत, विलास ठाकुर, पत्रकार श्री सुनिल ठाकूर, सुयश क्लासेस चे निवास गावंड सर, स

न्यूज अपडेट: पनवेलमधील रेस्टाँरंट, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू; आयुक्त सुधाकर देशमुख:

न्यूज अपडेट: पनवेलमधील रेस्टाँरंट, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू; आयुक्त सुधाकर देशमुख: पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेस्टाँरंट, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, बार आदींना शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येईल. तसेच अन्य दिवशी या सेवा ५० टक्के क्षमतेसह रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील, असे निर्देश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दिले. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी आस्थापना व मॉल्ससहीत सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंतच सुरू राहतील. यातून अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या आस्थापना तसेच दुकानांना या प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढत असलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजिले आहेत. यापुर्वी अनेक निर्बंध लावले आहेत. यापुर्वी दिलेले निर्देश लागू असून या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येत आह

न्यूज अपडेट: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा..!!

न्यूज अपडेट: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा..!! पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी इथल्या शेतकऱ्यांनी आपली पिढी शेती राहते घर देशाच्या विकासासाठी अर्पण केले सिडकोने इथल्या शेतकऱ्यांना देशातील सर्वोत्तम पुनर्वसन करून देऊ असं आश्वासन दिलं आणि थोड्या फार प्रमाणात त्याने पुनर्वसन केलं सुद्धा परंतु दहा गावातील मोजक्याच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न शिल्लक राहिलेल्या आहेत आणि सिडको प्रशासनाने जर मनावर घेतला तर ते प्रश्नही लगेच सुटतील. गेल्या तीन वर्षापासून हे शेतकरी सिडको ऑफिस समोर आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन, मोर्चे करून शासनाला आपले न्याय हक्क मिळावे म्हणून लढत आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या- ● शुन्य पात्रता/कमी पात्रता /ओटे/शेड. ● चिंचपाडा तळावपाळी तीनपट भुखंड व इतर लाभ. ● मंदिरे व खाजगी मंदीरे यांना पुर्नवसन पॅकेज लागु करावे. ● ड्रेनेज स्किम / टाटा पावर लाईन / देवस्थान व ट्रस्टीच्या जमिनीचे १२.५०% व २२.५०% टक्के विकसीत भुखंड प्रकल्पग्रस्त शेतक-्यांना देण्यात यावे. ● महीला मंडळे व

न्यूज अपडेट: नवी मुंबई नेरुळ प्रभाग क्रमांक 92 मधील गटारे व पदपथ दुरुस्त करा..!!

न्यूज अपडेट: नवी मुंबई नेरुळ प्रभाग क्रमांक 92 मधील गटारे व पदपथ दुरुस्त करा..!! ● राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांची मागणी  उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- नवी मुंबई प्रभाग क्रमांक 92 सेक्टर 21 मधील गटारे तुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत यामुळे वाहनचालक याना देखील वाहन चालविणे कठीण झाले  आहे रस्त्यावरील पदपथ यावर खड्डे पडले आहेत यामुळे जेष्ठ  नागरिक महिला व लहान मुलांना त्रास होत आहे  यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तरी गटारे व पदपथ यांची तातडीने दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांना सुखकर होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांनी नवी मुंबई चे आयुक्त अभिजित बांगर यांजकडे निवेदन देऊन केली आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: २५० पात्र झोपडी धारकांचे भाडे गिळणार्या विमल शहावर ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवा:

न्यूज अपडेट: २५० पात्र झोपडी धारकांचे भाडे गिळणार्या विमल शहावर ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवा: २५० पात्र झोपडी धारकांचे भाडे गिळणार्या विमल शहावर ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवा अशी मागणी डेमोक्रॅटिक आरपीआय महासचिव डॉ. माकणीकर यांनी केली. नवी मुंबई (मुंबई-प्रतिनिधी/काशिनाथ नाईक) :- अंदाजे २५० पात्र झोपडी धारकांचे मागील ३ वर्षांपासूनचे थकीत भाडे गिळणार्या आकृती हब टाऊन विकासक विमल शहा व त्याचा साथीदार मुरजी पटेल यांचेवत ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे. एमआयडीसी अंधेरी पूर्व झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत शासनाच्या प्रकल्पात आकृती हब टाऊन सोबत करार झाल्याने विकासक विमल शहा याच्या वर विश्वास ठेवून गरीब पात्र झोपडीधारकांनी स्वतःची झोपडी तोडून दिली आहे. "त्या" गरीब झोपडीधारकांचे प्रकल्पाला भरीव समर्थन असतांना आज २० वर्ष उलटली परंतु आज देखील त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात आला तर नाहीच मात्र: घरभाडे सुद्धा देण्यात येत नाही हो गोर गरीब जनतेची फसवणूक आहे. या गोष्टीवर पायबंद करणे अत्यावश्यक आहे. ही पी

न्यूज अपडेट: 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय..???

न्यूज अपडेट: 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय..??? ● 10 वी व 12 वी परीक्षेबाबत बोर्डाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. बोर्डाची लेखी, प्रॅक्टिकल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सूचना महत्वाच्या आहेत नवी मुंबई (प्रतिनिधी) :- बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षेबाबत काही महत्वाचे निर्णय बोर्डाने घेतले आहेत. लेखी परीक्षा- 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधीमध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल. परीक्षा केंद्रे- कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल . परीक्षेची वेळ- दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दि

न्यूज अपडेट: शॉपींग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी कोविडचे नवे नियम बंधनकारक आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश:

न्यूज अपडेट: शॉपींग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी कोविडचे नवे नियम बंधनकारक आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश: पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी  महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपींग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद करण्याचा इशाराही, आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी नव्या आदेशाद्वारे दिला आहे.  पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त श्री.देशमुख विविध घटकांशी सातत्याने संपर्कात राहून कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन करीत आहेत.  विशेषतः शॉपींग मॉल्स आणि डी मार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे- शॉपींग मॉल्स आणि डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान तपासूनच प्रवेश दिला जावा, ताप किंवा तापसदृश्य लक्षणे आढळल्यास प्रवेश देऊ नये, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर प

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण काळात भारतातातील क्षयरोग रुग्णांकडे दुर्लक्ष:

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण काळात भारतातातील क्षयरोग रुग्णांकडे दुर्लक्ष: कोरोनाबाधितांना क्षयरोग होण्याचा धोका कायम - जगातील टीबीचे साधारण एक चतुर्थांश रुग्ण भारतामध्ये. नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- भारतातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये वाढलेल्या आयुर्मानासोबत वाढते आजारांचे ओझे  वाढत असून सर्व प्रकारच्या नव्या-जुन्या, संसर्गजन्य व जीवनशैलीने होणाऱ्या आजारांची व्याप्ती वाढताना दिसत आहे. यामध्ये अ‍ॅनेमियापासून कॅन्सर तर डायरियापासून एड्स व आता कोरोना सारख्या माहामारीचा सुद्धा समावेश आहे. कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून टीबी या रोगाकडे दुर्लक्ष होतां दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतो त्यावेळी तो विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. क्षयरोग हा देखील फुफ्फुसाचाच आजार आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर क्षयरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आजमितीला याचे प्रमाण अथवा टक्केवारी उपलब्ध नाही परंतु दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना झालेल्या रुग्णांना क्षयरोग म्हणजेच टीबी होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गेल्या जागतिक क्षयरोग दिनाला "

न्यूज अपडेट: गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा पनवेल महापालिका आयुक्तांचे निर्देश:

न्यूज अपडेट: गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा पनवेल महापालिका आयुक्तांचे निर्देश: पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे सण साजरे करतानाही कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. गुड फ्रायडे व इस्टर संडेला चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्तांनी विशेष मार्गदर्शक सूचना सूचनाजारी केल्या आहेत. चर्चमधील जागेनुसार प्रार्थना सभेच्या उपस्थितीचे नियमन करणे बंधनकारक आहे. मोठा चर्च असल्यास ५०  तर लहान चर्चमध्ये  १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा आयोजित करण्यात याव्यात.  सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी  चार ते पाच खास सभांचे आयोजन करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. चर्चच्या व्यवस्थापकांनी ऑनलाईन सभेची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्याची माहिती सामाजिक माध्यमांद्वार प्रसारित करावी. चर्चबाहेर अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे. गर्दी आकिर्षित करेल, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम,

न्यूज अपडेट: आर. एफ. ओ. दीपाली चव्हाण यांनी अमरावतीच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या..।।

न्यूज अपडेट: आर. एफ. ओ. दीपाली चव्हाण यांनी अमरावतीच्या  शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या..।। बेलदार समाजातील महिला अधिकार्‍याची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ; स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या अमरावती (प्रतिनिधी) :- अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत  आर. एफ. ओ. ( परिक्षेत्र अधिकारी ) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रेंजर असोसिएशन व शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या आर. एफ. ओ.  दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून आर.

न्यूज अपडेट: ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंची मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली गंभीर दखल:

न्यूज अपडेट: ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंची मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली गंभीर दखल: मुंबई (प्रतिनिधी) :- भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गंभीर दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड  रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत तेथील अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: चिंचपाडा गावातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा आक्रमक लढा:

न्यूज अपडेट: चिंचपाडा गावातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा आक्रमक लढा: पनवेल (प्रतिनिधी) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोचे अतिक्रमण पथक पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील काही राहिलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी दिनांक 25 मार्च 2021 रोजी गेले होते. परंतु चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी आधी घरांचा मोबदला द्या आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत अतिक्रमण पथकाला मोठ्या प्रमाणात विरोध केला. यावेळी सिडकोच्या अतिक्रमण पथकाला विरोध करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेत पनवेल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी जमलेल्या महिलांसह लहान मुलांवर अमानुष हल्ला करून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मागण्या पूर्ण न केल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात अडथळा ठरणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना वडघर, करंजाडे या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या ग्रामस्थांना सिडकोने जागा दिली असली तरी तिथे अद्याप कोणत्याही सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत. सिडकोने केवळ मोकळ्या भूखंडावर प्रत्येकाला जागा आखून दिली आह

न्यूज अपडेट: सरकारची PF बाबतची मोठी घोषणा; करमुक्त मर्यादा दुप्पट, पाच लाखांपर्यंत करमुक्त:

न्यूज अपडेट: सरकारची PF बाबतची मोठी घोषणा; करमुक्त मर्यादा दुप्पट, पाच लाखांपर्यंत करमुक्त: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- निर्वाह निधीबाबत सरकारने मोठी घोषणा केलीय. आता पीएफ खात्यात 5 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त करण्यात आलीय.1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, पीएफ खात्यातील अडीच लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त राहील. त्यापलीकडे पैसे जमा केल्यास अतिरिक्त रकमेवरील व्याज करपात्र असणार आहे. परंतु आता ही मर्यादा दुप्पट करण्यात आलीय. म्हणजेच जर आपण एका वर्षात 5 पीएफ खात्यात पाच लाखांपर्यंतची रक्कम जमा केली तर व्याज पूर्णपणे करमुक्त होणार आहे. सेवानिवृत्ती निधीमध्ये मालकाचे कोणतेही योगदान नसल्यास हा नियम लागू होणार आहे. वित्त विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत पीएफ मर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.  लोकसभेच्या वित्त विधेयकास मान्यता मिळाल्यानंतर अर्थसंकल्पाच्या घोषणेस 1 फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर कर

न्यूज अपडेट: दोस्ती यारी रेस्टॉरंट मालकाचा मुजोरपणा "तथागत भगवान गौतम बुद्ध"यांच्या पूर्णकृती पुतळा रेस्टॉरंट च्या बाहेर गेट वरती पहारे करी प्रमाणे बसवला:

न्यूज अपडेट: दोस्ती यारी रेस्टॉरंट मालकाचा मुजोरपणा "तथागत भगवान गौतम बुद्ध"यांच्या पूर्णकृती पुतळा रेस्टॉरंट च्या बाहेर गेट वरती पहारे करी प्रमाणे बसवला: ● सदर कृत्य मुळे विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी आक्रमक नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- दिनांक २२ मार्च २०२१ रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुंबई प्रदेश महासचिव सिद्धार्थ काळे हे पी उत्तर मनपा वॉर्ड ल जात असताना त्यांची अचानक नजर दोस्ती यारी रेस्टॉरंट च्या गेटवर गेली असता त्यांना संताप जनक अवस्थेत तथागत भगवान गौतम बुद्ध याची पूर्ण कृती पुतळा हा 4 ते 5 फूट उंच पुतळा आढळून आला सदर भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा हा हॉटेल मध्ये जे गेटवर दरबारी, वाॅचमेन (Watchman) असतात त्या पद्धतीने ठेवण्यात आला होता. सिद्धार्थ काळे हे पेशाने पत्रकार व तथागत भगवान गौतम बुद्ध याचे उपासक या नात्याने त्यांना हा प्रकार सहन झाला नाही त्या मुळे त्यांनी सदर रेस्टॉरंट मॅनेजर यांना सदर बाबतीत त्यांना सदर पुतळा त्या ठिकाणावरून हटवून चांगल्या जाग्यावर बसवण्यास विनंती केली परंतु सदर रेस्टॉरंट चे कर्मचारी व मालक व त्याचे सहकारी यांनी सिद्धार्थ काळे या

न्यूज अपडेट: अनाधिकृत आकृती सेंटर पॉईंट इमारत पाडून बाळ गोपालांसाठी करमणुकीचे मैदान मोकळे करा: डॉ. राजन माकणीकर।।

न्यूज अपडेट: अनाधिकृत आकृती सेंटर पॉईंट इमारत पाडून बाळ गोपालांसाठी करमणुकीचे मैदान मोकळे करा: डॉ. राजन माकणीकर।।  नवी मुंबई (प्रतिनिधी/नीलेश भोईर) :- अंधेरी एमआयडीसी सेंट्रल रोडवरील आकृती सेंटर पॉईंट इमारत तोडून नियोजित बाळ गोपालांसाठी असलेले करमनूकीचे मैदान मोकळे करा अन्यथा सेंटर पॉइंटचा ताबा घेऊ. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे. विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल स्वतःला फार मोठे चतुर समजत असून राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे आमचे कोनि काहीही करू शकत नाही अश्या अविर्भावात प्रकल्पात चोरी करत असून १० हजार हजार करोड रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला असल्याचे मत डॉ. राजन माकनीकर यांनी मांडले आहे. नियमानुसार ८ % जागा ही करमणुकीच्या मैदानासाठी द्यायची असतांना आकृती हब टाऊन विकासक व महादलाल मुरजी पटेल यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून खेळाचे मैदानाची जागा गिलंकृत केली आहे. सदरची जागा मैदान स्वरूपात देण्याऐवजी दोन इमारतीत सामायिक अंतराच्या तुकड्या तुकड्यात देऊन खेळाच्या

न्यूज अपडेट: नवी मुंबईत विशेष दक्षता पथकांची धडाकेबाज कारवाई 3 दिवसात 3 लाख 48 हजार दंड वसूल:

न्यूज अपडेट: नवी मुंबईत विशेष दक्षता पथकांची धडाकेबाज कारवाई 3 दिवसात 3 लाख 48 हजार दंड वसूल: ● नवी मुंबईत विशेष दक्षता पथकांची धडाकेबाज कारवाई 3 दिवसात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1120 जणांकडून वसूल केला 3 लक्ष 48 हजार दंड  ● 10 ऑगस्टपासून 31364 जणांवरील कारवाईतून 1 कोटी 33 लाखाहून अधिक दंडवसूली नवी मुंबई (प्रतिनिधी) :- 10 मार्चपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत असून कोव्हीड 19 प्रतिबंधासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार 'मिशन ब्रेक द चेन' च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्ये टेस्टींग वाढीप्रमाणेच लसीकरण वाढीवरही भर देण्यात येत आहे. तसेच दुस-या बाजूला आरोग्य सुविधांमध्येही आवश्यकता लक्षात घेऊन वाढ केली जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संरक्षक ढालीसारखे काम करणा-या मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे नागरिकांकडून काटेकोर पालन करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून याविषयी नागरिकांना विविध माध्यमांतून जागरूक करण्यासोबतच या स

न्यूज अपडेट: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई करांसाठी नि‍यमावली जाहीर:

न्यूज अपडेट: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई करांसाठी नि‍यमावली जाहीर: ● कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार यांच्यासाठी नवी नि‍यमावली जाहीर नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मागील काही दि‍वसांपासून कोव्हीड-19 बाधि‍त रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ लक्षात घेऊन कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालि‍केच्या वतीने पुन्हा अधि‍क प्रभावीपणे “मि‍शन ब्रेक द चेन” राबवि‍ण्यात येत आहे. यादृष्टीने वि‍वि‍ध उपाययोजना करताना महापालि‍का आयुक्त श्री. अभि‍जीत बांगर यांनी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठि‍काणी कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रति‍बंध व्हावा यासाठी नवीन नि‍र्बंध जाहीर केले आहेत. शॉपींग मॉल्सच्या प्रत्येक प्रवेशव्दारावर (Entry Point) दर शुक्रवारी सायंकाळी 4.00 नंतर तसेच शनि‍वार आणि‍ रवि‍वार पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक अभ्यागताची कोव्हीड चाचणी (Rapid Antigen Test) करणे बंधनकारक असणार आहे. कोव्हीड चाचणीचा अहवाल नि‍गेटीव्ह अस

न्यूज अपडेट: जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठीचे पॅटर्न ठरणार..!!

न्यूज अपडेट: जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठीचे पॅटर्न ठरणार..!! पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी कोविड लसीकरण केंद्राचे लसीकरण व्यवस्थापक (सेशन मॅनेजर) यांची पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने बैठक घेण्यात आली. नगरसेवक मा.डॉ. अरूणकुमार भगत आणि पालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे.  खाजगी कोविड लसीकरणांमध्ये जेष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न( लसीकरणाबाबतचे नियोजन)  तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्यात आल्या. लसींचा साठा, वेस्टेज दर कमी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मा. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जेष्ठ नागरिकांच्या लसीकरण केंद्राबाबत केलेल्या सुचनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकिस वैद्यकिय आरोग्य विभागाच्या डॉ. मनिषा चांडक, पालिका क्षेत्रात कोविड लसीकरण सुरू केलेल्या शासकिय आणि खाजगी लसीकरणकेंद्राचे व्यवस्थापक उपस्थि

न्यूज अपडेट: शहीद दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेत अभिवादन:

न्यूज अपडेट: शहीद दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेत अभिवादन:  पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिकेतील मुख्यालयात शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेवक गणेश कडू, यावेळी अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, मुख्य वैद्यकिय आरोग्य डॉ. आनंद गोसावी,  पालिकेतील विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग, कर्मचारी  वर्ग उपस्थित होते. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: मुळेखंड येथे आंगण वाडी व जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुला केंद्र यांचे भूमिपूजन:

न्यूज अपडेट: मुळेखंड येथे आंगण वाडी व जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुला केंद्र यांचे भूमिपूजन:   उरण (प्रतिनिधी/ सुनील ठाकुर) :- उरण मुळेखंड येथे आंगणवाडी व जेष्ठ  नागरिक यांच्यासाठी  विरंगुला  केंद्राचे भूमिपूजन उरणचे सभापती ऍड सागर कडू यांचे हस्ते झाले. यावेळी सागर कडू यांनी सांगितले की मुळेखंड गावातील नागरिकांच्या मागणी नुसार ही कामे होत आहेत. आमदार विवेक पाटील यांनी प्रयत्न करून जिल्हा नियोजन यांच्या तुन ही विकासकामे उरण तालुक्यात आली आहेत. या भूमिपूजन समारंभासाठी मधुकर म्हात्रे , महिला आघाडी प्रमुख सीमा घरत, शहर चिटणीस शेखर पाटील, मा उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, गटविकास अधिकारी गाडे मॅडम, राकेश म्हात्रे, जयराज म्हात्रे, उज्वला म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, चंद्रशेखर पाटील,  निलेश म्हात्रे, सचिन पाटील, रोशन मांडलेकर, सतीश म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, मोरेश्वर कोळी, राजेंद्र म्हात्रे, नथुराम म्हात्रे, पांडुरंग तांबोळी, ईश्वर म्हात्रे, प्रीतम पाटील, कल्पना म्हात्रे, वंदना म्हात्रे, सविता म्हात्रे, पंचायत समिती अधिकारी किशोर उमटे, हरेश देवांग मुळेखंड गावातील ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक हजर होते. म

न्यूज अपडेट: पाचवी ते अकरावी चे वर्ग पुर्णत: बंद..।।

न्यूज अपडेट: पाचवी ते अकरावी चे वर्ग पुर्णत: बंद..।। पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेले काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे.  खबरदारी  घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी  महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिका क्षेत्रातील महाविद्यालये, शाळांसाठी  निर्देश जारी केले आहेत. हे निर्देश 31मार्च पर्यत असणार आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा (इयत्ता 10 वी 12 वी चे वर्ग व त्यांचे खाजगी क्लासेस वगळता) महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी  शिकवणी वर्ग या काळात पुर्णत: बंद राहतील.  इयत्ता 5 वी ते इयत्ता 11 वी चे वर्ग ऑनलाईन पध्दतीने संबधित शिक्षकांमार्फत चालू ठेवले जातील. विद्यापीठे किंवा परिक्षा बोर्डाचे वेळापत्रकानुसार आयोजित परिक्षांचे आयोजन तसेच शासकीय व निमशासकिय सेवेसाठीच्या भरती प्रक्रिया यांचे आयोजकाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून कार्यवाही करता येईल. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी

न्यूज अपडेट: नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन' ची अंमलबजावणी: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश:

न्यूज अपडेट: नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन' ची अंमलबजावणी: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश: ● पुन्हा'मिशन ब्रेक द चेन'ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे विशेष बैठकीत निर्देश. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत असून या कोरोनाच्या  संभाव्य दुस-या लाटेचा वेग ब-याच अंशी जास्त आहे. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीड 19 शी संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेत कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली व आदेश निर्गमित केले.  सध्या कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन 'मिशन ब्रेक द चेन' ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेट या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीवर अधिक भर देण्याचे सूचित करीत आयुक्तांनी टेस्टींग वाढीसाठी सर्व नागरी आरोग्य केंद्

न्यूज अपडेट: उद्याने-मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटी रूपये मंजूर:

न्यूज अपडेट: उद्याने-मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटी रूपये मंजूर: पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिकेची महासभा आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पनवेल, कळंबोली, खारघर, येथील उद्याने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिडको कडून हस्तांतरण झालेल्या भूखंडावर उद्याने आणि मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटींची विकास कामे करण्याबाबत चर्चा करून त्यांना मंजूरी देण्यात आली. सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी तसेच नगरसेवक निलेश बाविस्कर,आरती नवघरे, प्रवीण पाटील, मनोज भूजबळ, एकनाथ जाधव, चारूशिला घरत, सीताताई पाटील, डॉ. अरूणकुमार भगत, हरेश केणी, अनिता पाटील अरविंद म्हात्रे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली विभागातील सेक्टर 6ई, प्लॉट क्रमांक 2 मधील उद्यान भूखंडाचा विकास आय.जी.पी.एल कंपनीच्या सीईआर फंडातून करण्याबाबत जे पत्र मिळाले आहे, या पत्राचा विचार करून निर्णय घेण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला. या महासभेत महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ मधील विविध गावांमध्ये विका

न्यूज अपडेट: अफगाणिस्तानातील १० वर्षाच्या मुलावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर येथे जीवघेण्या आजारावर यशस्वी उपचार:

न्यूज अपडेट: अफगाणिस्तानातील १० वर्षाच्या मुलावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर येथे जीवघेण्या आजारावर यशस्वी उपचार:   नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- गेल्या वर्षभरात कोरोना संक्रमणामुळे अनेक नागरिक भारतात उपचारासाठी येऊ शकले नाही तसेच अनेक रुग्णांना भारतात उपचारासाठी येण्याची इच्छा असून त्यांना व्हिसासाठी लागणारी कागदांची पूर्तता, कोरोना संक्रमणामुळे करावे लागणारे विलीगकरण अशा समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने एका काबुल येथील दहा वर्षाच्या मुलाच्या दुर्मिळ आजारावर योग्य वेळी उपचार उपलब्ध झाले. काबुल अफगाणिस्तान येथे राहणाऱ्या रशिदवर (नाव बदलेले आहे) हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीयोसाइटोसिस (Hemophagocytic lymphohistiocytosis) या अत्यंत दुर्मिळ आजारावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर (HCG Cancer Center), इथे यशस्वी उपचार करून त्याला जीवनदान मिळाले आहे. हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीयोसाइटोसिस (Hemophagocytic lymphohistiocytosis) हा जीवघेणा सिन्ड्रोम (तापाचा प्रकार) असून यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होत जाऊन  फक्त ५ टक्के वाचण्याची आशा असत

न्यूज अपडेट: कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद..!!

न्यूज अपडेट: कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद..!! पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरानाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये खारघर नोड मध्ये कोरानाची रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरानाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.  खारघर येथील सेंट्रल पार्क हे सुमारे १०० एकर परिसरात पसरलेले भव्य असे उद्यान आहे. या ठिकाणी रोज नवी मुंबई, कामोठे, कळंबोली येथील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रोज ये-जा होत असते. खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.