Skip to main content

न्यूज अपडेट: उद्याने-मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटी रूपये मंजूर:

न्यूज अपडेट: उद्याने-मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटी रूपये मंजूर:

पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिकेची महासभा आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पनवेल, कळंबोली, खारघर, येथील उद्याने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिडको कडून हस्तांतरण झालेल्या भूखंडावर उद्याने आणि मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटींची विकास कामे करण्याबाबत चर्चा करून त्यांना मंजूरी देण्यात आली. सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी तसेच नगरसेवक निलेश बाविस्कर,आरती नवघरे, प्रवीण पाटील, मनोज भूजबळ, एकनाथ जाधव, चारूशिला घरत, सीताताई पाटील, डॉ. अरूणकुमार भगत, हरेश केणी, अनिता पाटील अरविंद म्हात्रे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली विभागातील सेक्टर 6ई, प्लॉट क्रमांक 2 मधील उद्यान भूखंडाचा विकास आय.जी.पी.एल कंपनीच्या सीईआर फंडातून करण्याबाबत जे पत्र मिळाले आहे, या पत्राचा विचार करून निर्णय घेण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला.

या महासभेत महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ मधील विविध गावांमध्ये विकास कामे करण्याचा विषय मंजूर करण्यात आला तसेच पडघे गावामध्ये बौध्दवाडा येथे समाजमंदिर बांधून मिळणेबाबतचा विषय मंजूर करण्यात आला

प्रभाग समिती ‘अ’ खारघर गावांमधील एकत्रित मुलभूत सुविधांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाण्याची टाकी, पाईपलाईन अशी  पाणीपुरवठा विषयक कामे तसेच मलनिस्सारण, रस्ते, पावसाळी गटार, विद्युत वाहिन्या भूमिगत करणे अशा 11 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली.

आयुक्त सुधाकर देशमुख यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येविषयी नगरसेवकांना अवगत करून, नागरिकांना कोराना विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याची विनंती केली. तसेच गर्दीवर नियंत्रण राखणे, आणि मास्क,सॅनिटायझर, सामाजिक अंतर या कोरोनाच्या त्रिसूत्री नागरिकांनी पाळावी यासाठी नगरसेवकांनी आवाहन करावे अशी  विनंती केली.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे