Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन' ची अंमलबजावणी: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश:

न्यूज अपडेट: नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन' ची अंमलबजावणी: आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश:

● पुन्हा'मिशन ब्रेक द चेन'ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे विशेष बैठकीत निर्देश.

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत असून या कोरोनाच्या  संभाव्य दुस-या लाटेचा वेग ब-याच अंशी जास्त आहे. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीड 19 शी संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेत कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली व आदेश निर्गमित केले.

 सध्या कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन 'मिशन ब्रेक द चेन' ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेट या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीवर अधिक भर देण्याचे सूचित करीत आयुक्तांनी टेस्टींग वाढीसाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोव्हीड टेस्टींग सेंटर तसेच फ्ल्यू ओपीडी सुरू करण्याचे निर्देशित केले.

त्याचप्रमाणे 5 पेक्षा जास्त रूग्ण आढळतात अशा सोसायट्या व त्याच्या आसपासच्या सोसायट्यांमध्ये तसेच मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळताहेत अशा वसाहतींमध्ये टेस्टींग करण्यासाठी 'कोव्हीड टेस्टींग मोबाईल व्हॅन' पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

● टेस्टींग प्रमाणेच सध्याची वाढती रूग्णसंख्या विचारात घेता रूग्ण उपचारासाठी सध्या उपलब्ध असलेल्या 1200 बेड्स क्षमतेच्या 'सिडको एक्झिबिशन सेंटर' व्यतिरिक्त साधारणत: 800 ते 1000 बेड्स उपलब्ध होतील अशाप्रकारे तात्पुरती बंद केलेली कोव्हीड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याविषयी त्वरित कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

● त्यामध्ये प्रत्येक परिमंडळात 1 अशाप्रकारे महिलांसाठी राखीव दोन कोव्हीड केअर सेंटर्स* सुरू करावीत तसेच करोनाबाधित गरोदर महिला व प्रसूती झालेल्या माता यांच्याकरिता कार्यान्वित बेलापूर येथील माता बाल रूग्णालयामध्ये बेड्सची संख्या वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

● कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना कोव्हीड लसीकरणाचेही प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत सध्या महापालिका रूग्णालयात ज्याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस लसीकरण होते त्याचप्रणाणे नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरणही 5 दिवसाऐवजी रविवारसह सातही दिवस ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले.

● महानगरपालिकेमार्फत होणारे कोव्हीड टेस्टींग आणि लसीकरण सध्याची कोव्हीड प्रभावित स्थिती लक्षात घेता कोणतीही सुट्टी न घेता आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.

● महानगरपालिकेच्या स्वत:च्या आरटी-पीसीआर लॅबमधून दररोज 2 हजार इतक्या आरटी - पीसीआर टेस्ट्सचे रिपोर्ट प्राप्त होत आहेत. आता *टेस्टींगची संख्या अधिक वाढवून सीएसआरच्या माध्यमातून खाजगी मान्यताप्राप्त लॅबमार्फत टेस्ट्स रिपोर्ट उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.

● रूग्णसेवेची उपलब्धता वाढविण्याप्रमाणेच रूग्णवाहिकांचे नियोजन, रूग्णालयातील बेड्स उपलब्धतेचा डॅशबोर्ड अद्ययावतीकरण, गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठीच्या उपाययोजना, कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष दक्षता पथकांची कार्यवाही अशा विविध बाबींबाबत या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.

● कोव्हीड विषयक सर्व सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणेबाबातची कार्यवाही तसेच इतर अनुषांगिक बाबींची पूर्तता तत्परतेने करण्याचे आरोग्य विभागास आदेशित करतानाच आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांनीही कोरोना विषाणूपासून स्वत:चा व संपर्कातील इतरांचा बचाव करण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात धुणे वा सॅनिटायझर वापरणे या सुरक्षा त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे