न्यूज अपडेट: शहीद दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेत अभिवादन:
पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिकेतील मुख्यालयात शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेवक गणेश कडू, यावेळी अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, मुख्य वैद्यकिय आरोग्य डॉ. आनंद गोसावी, पालिकेतील विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.