Skip to main content

न्यूज अपडेट: दोस्ती यारी रेस्टॉरंट मालकाचा मुजोरपणा "तथागत भगवान गौतम बुद्ध"यांच्या पूर्णकृती पुतळा रेस्टॉरंट च्या बाहेर गेट वरती पहारे करी प्रमाणे बसवला:

न्यूज अपडेट: दोस्ती यारी रेस्टॉरंट मालकाचा मुजोरपणा "तथागत भगवान गौतम बुद्ध"यांच्या पूर्णकृती पुतळा रेस्टॉरंट च्या बाहेर गेट वरती पहारे करी प्रमाणे बसवला:

● सदर कृत्य मुळे विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी आक्रमक

नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- दिनांक २२ मार्च २०२१ रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुंबई प्रदेश महासचिव सिद्धार्थ काळे हे पी उत्तर मनपा वॉर्ड ल जात असताना त्यांची अचानक नजर दोस्ती यारी रेस्टॉरंट च्या गेटवर गेली असता त्यांना संताप जनक अवस्थेत तथागत भगवान गौतम बुद्ध याची पूर्ण कृती पुतळा हा 4 ते 5 फूट उंच पुतळा आढळून आला सदर भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा हा हॉटेल मध्ये जे गेटवर दरबारी, वाॅचमेन (Watchman) असतात त्या पद्धतीने ठेवण्यात आला होता.

सिद्धार्थ काळे हे पेशाने पत्रकार व तथागत भगवान गौतम बुद्ध याचे उपासक या नात्याने त्यांना हा प्रकार सहन झाला नाही त्या मुळे त्यांनी सदर रेस्टॉरंट मॅनेजर यांना सदर बाबतीत त्यांना सदर पुतळा त्या ठिकाणावरून हटवून चांगल्या जाग्यावर बसवण्यास विनंती केली परंतु सदर रेस्टॉरंट चे कर्मचारी व मालक व त्याचे सहकारी यांनी सिद्धार्थ काळे यांच्याशी वाद घातल,आणि सदर महिला मालक ही भारतीय जनता पक्षाचे महिला पदाधिकारी असल्याचे सांगत होती व सदर मूर्तीचे फोटो काढले म्हणून त्याच्या मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न देखील केला ते सदर परिस्थिती लक्षात घेता त्यांनी समाजबांधव याच्याशी संपर्क साधला व तेव्हा विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी त्या ठिकाणी धावत आले.

सदर बाब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र सरचिटणीस संजय बोर्डे हे त्या ठिकाणी आले त्यांनी सदर घटना लक्षात घेता त्यांनी १०० नंबर वर पोलिसात तक्रार केली व त्या ठिकाणी विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी जमा होत होते तेव्हा पोलिसांनी सदर हॉटेल मालक यांना मालाड पोलीस ठाण्यात बोलवले तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक  याच्याशी सविस्तर चर्चा केली व सदर हॉटेल मालक यांच्यविरोधत गुन्हा दाखल करून घेण्यास सांगितले.

परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला व सदर रेस्टॉरंट मालक यांना सदर मूर्ती रेस्टॉरंट च्या गेट समोरून हटवण्यास सांगितले.

या वेळी प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव,पत्रकार संरक्षण समिती मुंबई प्रदेश महा सचिव सिद्धार्थ काळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र व्यापार आघाडी चे महाराष्ट्र सरचिटणीस संजय बोर्डे, रिपब्लिकन उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष संजय सकपाळ, मालवणी वॉर्ड अध्यक्ष राजेश साळवे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन खंदारे, सुरेश वाघमारे इत्यादी शेकडो विविध पक्ष व संघटनेचे  पदाधिकारी उपस्थित होते.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे