न्यूज अपडेट: पाचवी ते अकरावी चे वर्ग पुर्णत: बंद..।।
पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेले काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिका क्षेत्रातील महाविद्यालये, शाळांसाठी निर्देश जारी केले आहेत. हे निर्देश 31मार्च पर्यत असणार आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा (इयत्ता 10 वी 12 वी चे वर्ग व त्यांचे खाजगी क्लासेस वगळता) महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्ग या काळात पुर्णत: बंद राहतील.
इयत्ता 5 वी ते इयत्ता 11 वी चे वर्ग ऑनलाईन पध्दतीने संबधित शिक्षकांमार्फत चालू ठेवले जातील. विद्यापीठे किंवा परिक्षा बोर्डाचे वेळापत्रकानुसार आयोजित परिक्षांचे आयोजन तसेच शासकीय व निमशासकिय सेवेसाठीच्या भरती प्रक्रिया यांचे आयोजकाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून कार्यवाही करता येईल.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.