न्यूज अपडेट: पनवेलमधील रेस्टाँरंट, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू; आयुक्त सुधाकर देशमुख:
न्यूज अपडेट: पनवेलमधील रेस्टाँरंट, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू; आयुक्त सुधाकर देशमुख:
पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेस्टाँरंट, कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, बार आदींना शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येईल. तसेच अन्य दिवशी या सेवा ५० टक्के क्षमतेसह रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील, असे निर्देश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दिले. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी आस्थापना व मॉल्ससहीत सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंतच सुरू राहतील. यातून अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या आस्थापना तसेच दुकानांना या प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढत असलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजिले आहेत. यापुर्वी अनेक निर्बंध लावले आहेत. यापुर्वी दिलेले निर्देश लागू असून या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.