Skip to main content

न्यूज अपडेट: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई करांसाठी नि‍यमावली जाहीर:

न्यूज अपडेट: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई करांसाठी नि‍यमावली जाहीर:

● कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार यांच्यासाठी नवी नि‍यमावली जाहीर

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मागील काही दि‍वसांपासून कोव्हीड-19 बाधि‍त रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ लक्षात घेऊन कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालि‍केच्या वतीने पुन्हा अधि‍क प्रभावीपणे “मि‍शन ब्रेक द चेन” राबवि‍ण्यात येत आहे. यादृष्टीने वि‍वि‍ध उपाययोजना करताना महापालि‍का आयुक्त श्री. अभि‍जीत बांगर यांनी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठि‍काणी कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रति‍बंध व्हावा यासाठी नवीन नि‍र्बंध जाहीर केले आहेत.

शॉपींग मॉल्सच्या प्रत्येक प्रवेशव्दारावर (Entry Point) दर शुक्रवारी सायंकाळी 4.00 नंतर तसेच शनि‍वार आणि‍ रवि‍वार पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक अभ्यागताची कोव्हीड चाचणी (Rapid Antigen Test) करणे बंधनकारक असणार आहे. कोव्हीड चाचणीचा अहवाल नि‍गेटीव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल किंवा मॉलमध्ये येणाऱ्या अभ्यागताने मागील 72 तासांमधील कोव्हीड चाचणी (RT-PCR) अहवाल नि‍गेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशि‍वाय मॉलमध्ये प्रवेश दि‍ला जाणार नाही.

शॉपींग मॉलमध्ये योग्य सामाजि‍क अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50,000/- इतका दंड मॉल व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व ति‍सऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे नि‍दर्शनास आल्यास शॉपिंग मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

डि‍ मार्ट, रि‍लायन्स फ्रेश, स्टार बाजार यांसारख्या Convenience Stores / Departmental Stores मध्ये एका वेळी कि‍ती अभ्यागत स्टोअरमध्ये उपस्थि‍त राहू शकतील याचा आराखडा तयार करुन त्यानुसार टोकन प्रणाली सुरु करण्यात यावी.

या स्टोअर्समध्ये योग्य सामाजि‍क अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50,000/- इतका दंड संबंधित स्टोअर्सच्या व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व ति‍सऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे नि‍दर्शनास आल्यास स्टोअर पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

कोव्हीड-19 वि‍षाणूचा प्रसार रोखण्यासाठी उद्यानांमधील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहि‍त्य हे पूर्णत: बंद राहतील व त्यांचा वापर करता येणार नाही.

त्याचप्रमाणे सर्व उद्याने सकाळी 5.30 ते सकाळी 10.00 या वेळेव्यतिरिक्त इतर संपूर्ण वेळ बंद राहतील.

दैनंदिन व आठवडी बाजारामध्ये मास्क, सुरक्षि‍त अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन केले जाणे अनि‍वार्य आहे.

10 मार्च 2021 पासून कोव्हीड बाधि‍त रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दि‍सत आहे. मॉल, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स किंवा उद्याने अशा ठिकाणी होणारी गर्दी व नागरि‍कांकडून मास्क, सुरक्षि‍त अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे होणारे उल्लंघन यामुळे रुग्णवाढीचा दर अधि‍क वाढू शकतो.

 त्यातही शनि‍वारी, रवि‍वारी मॉलमध्ये होणारी गर्दी पहाता सुरक्षि‍त अंतराच्या नि‍यमाचे पालन होताना दि‍सून येत नाही. वास्तवि‍कत: मॉलमध्ये शनिवार, रविवार अशा आठवड्याच्या अखेरच्या दिवशी होणारी गर्दी आठवड्यातील इतर दिवशी विखुरली जाणे अपेक्षित आहे, जेणेकरून मॉलमधील उपस्थितीचे योग्य नियोजन होऊन सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन होईल. 

त्याचप्रमाणे सार्वजनि‍क बगीचे, उद्याने, पार्क यामध्ये वि‍शेषत्वाने संध्याकाळी अनेक कुटूंबे मास्कशि‍वाय वावरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामध्येही लहान मुलांना खेळणी, व्यायाम साहि‍त्य यांच्या वारंवार हाताळणीमुळे कोव्हीड संसर्ग होण्याचा धोका अधि‍क होऊ शेकतो. त्यामुळे सदर नि‍र्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

यापेक्षा अधि‍क तीव्र नि‍र्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरि‍काने घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत न चुकता मास्कचा वापर करावा व प्रत्येक ठि‍काणी सुरक्षि‍त अंतराचे भान राखावे तसेच शक्य होईल ति‍तक्या वेळा हात धुवावेत अथवा सॅनि‍टायझरचा वापर करावा असे आवाहन महापालि‍का आयुक्त श्री. अभि‍जीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे